लाइव्ह

Uttarkashi Tunnel Rescue Live Updates: आनंदाची बातमी, मृत्यूवर मात करत बोगद्यात अडकलेले 41 कामगार आले बाहेर!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

uttarkashi tunnel rescue live updates 41 trapped workers came out of the tunnel site rescue operation completed after 17 days
uttarkashi tunnel rescue live updates 41 trapped workers came out of the tunnel site rescue operation completed after 17 days
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 09:33 PM • 28 Nov 2023

    बोगद्यात अडकलेल्या मजुरांना उद्या एक लाख रुपयांची आर्थिक रक्कम मिळणार आहे

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, आमच्या सरकारने मजुरांना 1 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या कामगारांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी NHIDCL ला या कामगारांसाठी योग्य व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
  • 09:31 PM • 28 Nov 2023

    बोगद्याच्या बाहेर बाबा बोखनागचे मंदिर बांधले जाईल - सीएम धामी

    सीएम धामी यांनी सांगितले की, आम्ही निर्णय घेतला आहे की आता या बोगद्याच्या बाहेर बाबा बोखनागचे मंदिर बांधले जाईल.
  • 09:30 PM • 28 Nov 2023

    कामगारांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा काय होता प्लॅन?

    आपली योजना स्पष्ट करताना सीएम धामी म्हणाले की, सर्वात तरुण मजुरांना आधी बोगद्यातून बाहेर काढण्यात आले. यानंतर इतर लोकांना बाहेर काढण्यात आले. 5-5 जणांच्या गटात कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे.
  • 09:28 PM • 28 Nov 2023

    रॅट मायनर्सचं महत्त्वाचे योगदान- सीएम धामी

    सीएम धामी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जनरल व्हीके सिंग यांचेही आभार मानले आहेत. ते म्हणाले की, येथे पीएमओचे अनेक अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री धामी यांनी या वेळी सांगितले की, आपण स्वत: खाण कामगारांची नुकतीच भेट घेतली आहे. या ऑपरेशनच्या यशामध्ये गोरखपूर आणि दिल्लीच्या खाण कामगारांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
  • ADVERTISEMENT

  • 09:12 PM • 28 Nov 2023

    बचाव मोहिमेचे यश हा भावनिक क्षण: पीएम मोदी

    सिल्क्यरा ऑपरेशनमध्ये यश मिळाल्यानंतर पीएम मोदींनी ट्विट केले. त्यांनी लिहिले की, 'उत्तरकाशीतील आमच्या कामगार बांधवांच्या बचाव कार्याचे यश सर्वांनाच भावूक करणारं आहे. बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य इच्छितो. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आपले हे मित्र आता आपल्या प्रियजनांना भेटणार आहेत ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे कौतुक करता येणार नाही. या बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांच्या कामाला मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि जिद्दीने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी दिली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकीचा आणि टीमवर्कचा एक अद्भुत उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.
  • 09:06 PM • 28 Nov 2023

    बोगद्यातून बाहेर आलेल्या कामगारांचं गळ्यात हार घालून स्वागत

    गेले 17 दिवस बोगद्यात अडकलेले 41 कामगार हे अखेर बोगद्यातून बाहेर आले आहेत. बोगद्यातून बाहेर येताच या सर्व कामगारांचं प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्या गळ्यात गळ्यात हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
  • ADVERTISEMENT

  • 09:04 PM • 28 Nov 2023

    आनंदाची बातमी.. सर्व 41 कामगार बोगद्यातून आले बाहेर

    सर्व 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या सीएम धामी आणि केंद्रीय मंत्री व्हीके सिंह कामगारांच्या भेटी घेत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत.
  • 08:53 PM • 28 Nov 2023

    आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरून केलं कौतुक

    प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, 'ही कृतज्ञतेची वेळ आहे. या 41 मौल्यवान जीवांना वाचवण्यासाठी गेल्या 17 दिवसांत अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचे आभार. कोणत्याही खेळातील विजयापेक्षा तुम्ही देशाचे मनोबल उंचावले आहे आणि आशेने आम्हाला एकत्र केले आहे. आपण आम्हाला आठवण करून दिली आहे की, कोणत्याही बोगद्यातून बाहेर पडणे कठीण नाही.. कोणतेही कार्य अशक्य नाही. जेव्हा आमची कृती आणि प्रार्थना सहकारी आणि सामूहिक असतात.
  • 08:47 PM • 28 Nov 2023

    आतापर्यंत 18 कामगार आले बोगद्यातून बाहेर

    आतापर्यंत 18 मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. यावेळी कामगारांचे नातेवाईक गरम चहा आणि थंडीचे काही कपडे सोबत घेऊन गेले आहेत. जेणेकरून ते त्यांना देता येतील
  • 08:43 PM • 28 Nov 2023

    सीएम धामी यांनी बचाव पथकाचे केले कौतुक

    मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बोगद्यात अडकलेल्या कामगारांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंह हेही तिथे उपस्थित होते. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बचाव कार्यात गुंतलेल्या कामगार आणि जवानांच्या मनोबलाचे आणि धैर्याचे कौतुक केले. बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांचे नातेवाईकही तिथेच आहेत. बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांचे प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण बोगद्यात बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या वैद्यकीय शिबिरात केले जात आहे.
  • 08:35 PM • 28 Nov 2023

    9 मजुरांना बोगद्यातून बाहेर काढले, सीएम धामी आणि केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी केले स्वागत

    उत्तरकाशीतील बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ९ मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. सीएम धामी आणि केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी त्या कामगारांचे स्वागत केले.
follow whatsapp

ADVERTISEMENT