ADVERTISEMENT
विधानसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक
महाराष्ट्र
मतदानाची तारीख:
20 नोव्हेंबर 2024
मोजणीची तारीख:
23 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र विधानसभा 2024 वेळापत्रक
288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीसारख्या मोठ्या आघाड्यांशिवाय इतर पक्षही विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी महायुतीचे मित्रपक्ष भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि त्यांचे इतर मित्र पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचवेळी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासह विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी निवडणूक लढवत आहेत. याशिवाय 135 जागांवर राज ठाकरेंच्या मनसेचे उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्रातील माहीम आणि वरळी विधानसभेच्या निवडणुका अतिशय रंजक झाल्या आहेत. या जागांवर राज ठाकरे यांची मनसे, शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात चुरशीची लढत आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी एकूण 4,140 उमेदवार रिंगणात आहेत. नंदुरबारच्या शहादा मतदारसंघात सर्वात कमी, फक्त 3 आणि बीडच्या माजलगावमध्ये सर्वाधिक 34 उमेदवार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
ADVERTISEMENT