Balasaheb Thorat Lost Elections : काँग्रेस हादरली, बाळासाहेब थोरात यांचा पराभव, तो जायंट किलर कोण?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण या निकालातून महाविकास आघाडीच्या वाट्याला अत्यंत कमी जागा आल्या असून, महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बाळासाहेब थोरात यांचा पराभव
कोण आहे अमोल खताळ?
Balasaheb Thorat Lost Against Amol Khatal : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सध्या जाहीर होत असून, जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. आतापर्यंतच्या निकालाच्या आकड्यांमधून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, काही अपवाद वगळता, थेट राज्यात सुपडा साफ झाल्याचं चित्र आहे. मात्र या सर्व पराभवामध्ये काही जागांची चर्चा जास्त होते आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून झालेला पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो आहे. बाळासाहेब थोरात यांचं आतापर्यंत संगमनेर मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व होतं. पण एकनाथ शिंदे यांचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या गडाला सुरूंग लावला आहे. त्यामुळे अमोल खताळ हे जायंट किलर ठरले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: गुलाबी प्रचारानंतर विजयाचा गुलाल, अजितदादांना गुलाबी बुके देणारा कोेण?
संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला असून, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणही आता पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. राज्याच्या इतिहासात यंदाचा भाजपचा विजय हा अत्यंत मोठा विजय म्हणून पाहिला जाऊ शकतो.
बाळासाहेब थोरात हे नवव्या वेळेस यंदा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात होते. तर त्यांच्या विरोधात असलेले अमोल खताळ हे एक नवखे तरुण म्हणून त्यांच्यासमोर होते. त्यामुळे अमोल खताळ हे जायंट किलर ठरलेले आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Balasaheb Thorat Lost Elections : काँग्रेस हादरली, बाळासाहेब थोरात यांचा पराभव, तो जायंट किलर कोण?
अमोल खताळ यांच्या विजयाची कारणं जाणून घेताना विखेंबद्दलही बोलणं अपरिहार्य ठरतं. कारण अमोल खताळ यांच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे यांनी मोठी ताकद लावून मायक्रो प्लॅनिंग केल्याचं दिसलं होतं. त्यामुळे या परभवात पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे विखे विरुद्ध थोरात असा लढा पाहायला मिळाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT