Baramati Constituency Results: बारामती अजितदादांचीच, युगेंद्र पवारांचा 'एवढ्या' मतांनी पराभव
Ajit Pawar Baramati Constituency Election Results 2024: विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. ज्याचा निकाल आता समोर आला आहे. पाहा बारामतीत कोणते पवार ठरलेत विजयी.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बारामती विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर
पाहा बारामतीत नेमका कोणाला विजय मिळला
बारामतीकरांनी कोणत्या पवारांच्या पारड्यात टाकलं आपलं मत?
Baramati Vidhan Sabha Results: बारामती: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा होती. कारण इथे काका विरुद्ध पुतण्या म्हणजेच पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली. पाहा अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या सामन्यात नेमकी कोणी बाजी मारली.
ADVERTISEMENT
बारामती मतदारसंघातून अजित पवारांचा विजय
हाती आलेल्या निकालानुसार, बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित पवार यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या निकालाने बारामती विधानसभा मतदारसंघात कोणाचं वर्चस्व आहे हे सिद्ध झालं आहे.
हे ही वाचा>> Ajit Pawar Baramati : लोकसभेला एकटा होतो, पण आता माझी आई, बहिणींची साथ... अजितदादा कडाडले
लोकसभा निवडणुकीत बारामतीत मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता. ज्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला होता. तर आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असाच सामना बारामतीकरांना पाहायला मिळाला.
हे वाचलं का?
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आलं होतं. पण असं असलं तरी बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी वर्चस्वाची लढाई रंगली होती. ज्यामध्ये अजितदादा यांनी बाजी मारली आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Election 2024 Live: कराळे मास्तरांना मारहाण, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप, वर्ध्यामध्ये तुफान राडा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवार यांच्याकडे गेलं होतं. तर शरद पवार यांना नवं नाव आणि चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं होतं. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं होतं. पण विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची अक्षरश: धूळधाण झाली आहे. त्यांच्या पक्षाला केवळ 10 जागांवरच विजय मिळवता आला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा 288 मतदारसंघांचा निकाल पाहण्यासाठी https://www.mumbaitak.in/ या लिंकवर क्लिक करा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT