CM Eknath Shinde: "लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना...", एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घणाघात
CM Eknath Shinde Press Conference : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी केलं मोठं विधान
"ऐतिहासिक विजयासीठी साष्टांग दंडवत..."
एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
CM Eknath Shinde Press Conference : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातला हा ऐतिहासिक दिवस आणि विजय आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणुका आपण पाहिल्या. पण ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली, अशाप्रकारची होती. लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला. कारण लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, या सर्व घटकांनी यावेळी महायुतीवर प्रेम दाखवलं. लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला आहे. आम्ही म्हणालो होत, सावत्र भावांना जोडा दाखवा. मी सर्व मतदारांना मनापासून धन्यवाद देतो. या ऐतिहासिक विजयासीठी साष्टांग दंडवत घालतो, अशाप्रकारचं काम मतदारांनी केलं आहे", असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीसह विरोधकांचा समाचार घेतला.
ADVERTISEMENT
शिंदे पुढे म्हणाले, "आम्ही जे निर्णय घेतले, ते आतापर्यंतचे न भुतो न भविष्यतो आहे. महाविकास आघाडीने आतापर्यंत जे स्वीडब्रेकर टाकले होते, ते स्टे आम्ही सर्व काढले. कामं सुरु झाली. त्यानंतर अटल सेतू, कोस्टल, मेट्रो, कारशेडही झालं. कामाला आम्ही प्राथमिकता दिली. विकासाला आम्ही प्राधान्य दिलं. या राज्याचा सर्वांगिण विकास हेच आमच्या डोळ्यासमोर होतं. अडीच वर्षात जी काम त्यांनी थांबवली होती, ती किती वेगाने आम्ही सुरु केली, याचा समाधान आणि आनंद आहे.
हे ही वाचा >> Balasaheb Thorat Lost Elections : काँग्रेस हादरली, बाळासाहेब थोरात यांचा पराभव, तो जायंट किलर कोण?
कल्याणकारी योजना राबविल्या. यामध्ये लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, युवा प्रशिक्षण, तीन गॅसलाईनची योजना दिली. शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं. शेतकऱ्यांच्या योजनांसाठी 45 हजार कोटी रुपये दिले. या राज्याला पुढे न्यायचं, या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा, हेच आमचं ध्येय होतं. मोदी साहेब आणि केंद्र सरकार आमच्या बाजूने ताकदीने उभे राहिले. आमचे प्रस्ताव मान्य केले. दोन अडीच वर्षात आम्हाला लाखो कोटी रुपयांचं सहकार्य केलं. डबल इंजिनचं वेगवाग आणि गतिमान सरकार आहे, असंही शिंदे म्हणाले.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Maharashtra Elections Exit Poll : कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय? अख्खी यादी आली समोर
शिंदे योजनांबाबत बोलताना म्हणाले, लाडकी बहीण योजनेसह शासन आपल्या दारी सुरु केलं. लोकांनी विश्वास ठेवला. हे देणारं सरकार आहे. हे बोलणारं सरकार नाही. आचारसंहिता लागण्याआधी आम्ही नोव्हेंबरचे पण पैसे दिले. एकंदरीत या राज्यात सर्वसामान्यांचं सरकार कायतरी करतंय, ही भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. सामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवून त्यांना सुपरमॅन करायचं, असं आम्ही ठरवलंय. लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं. लोकसभेत फेक नरेटिव्ह केलं. तरीही प्रधानमंत्री मोदीच झाले. सरकार पडणार असं रोज बोलायचे. आम्ही आरोपाला कामातून उत्तर दिलं. ते काम लोकांना भावलं. घरी बसून फेसबुकवरून सरकार चालवता येत नाही. म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. 2014 ला जे सरकार स्थापन व्हायलं पाहिजे होतं. ते झालं नाही. लोकांनी विकासाला महत्त्व दिलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT