Devendra Fadnavis : फडणवीसच मुख्यमंत्री होणार, शपथविधीची तारीख ठरली, 2029 पर्यंत फडणवीसच...भाजप नेत्याची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शपथविधीची तारीख ठरली?

point

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार

point

भाजप नेते अतुल सावे काय म्हणाले?

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून या एकाच मुद्द्यावर सर्व चर्चा फिरताना दिसत आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून, लवकरच नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीची तारीखही आता महायुती सरकारचे माजी मंत्री आणि भाजप नेते अतुल सावे यांनी सांगितली आहे. देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रिपद मिळणार असून, येत्या 2 तारखेला शपथविधी पार पडणार असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच शपविधी सोहळ्याची लगबग सुरू होईल अशी शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Waqf Board Fund : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर, सरकारचा मोठा निर्णय, GR मध्ये काय म्हटलंय?

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या गेल्या होत्या. मात्र महायुतीमधील पक्षांना मिळालेल्या आकड्यानंतर आता बरीच समीकरणं बदलली आहेत. गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात बडे नेते म्हणून समोर आलेले मुख्यमंत्री शिंदे आता मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती आहे. अतुल सावे यांनी  यावर बोलताना सांगितलं की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार याचा आम्हाला आनंद आहे, कारण 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्राने प्रगती केली, तशीच प्रगती आता 2024 ते 2029 मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात होईल असं म्हणत सावेंनी फडणवीसच 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असंही सूचवलं आहे. अतुल सावे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना ही माहिती दिली आहे.

 

हे वाचलं का?

दिल्लीतील बैठकीत काय ठरलं? 



दिल्लीमध्ये काल याच तिढ्यावर बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याची माहिती आहे. यामध्ये कुणाला किती खाती मिळणार यावर चर्चा झाली. मात्र कोणती खाती मिळणार यावर चर्चा न झाल्याची माहिती आहे. त्यानुसार सर्वात जास्त म्हणजे जवळपास 20 खाती भाजपकडे असू शकतात, तर त्याखालोखाल खाती शिंदेंकडे असतील. तसंच सर्वात कमी खाती अजित पवार यांच्या पदरात पडणार आहेत. मात्र केंद्रीय मंत्रिपदावरुनही सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT