Raj Thackeray MNS Candidate List : राज ठाकरेंनी मुलगा अमित ठाकरेला 'या' मतदार संघातून दिलं तिकीट

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra assembly election 2024 raj thackeray declare second list candidates amit thackeray mahim constituency  bala nandgaonkar vidhan sabha election
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने (MNS)आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंनी दुसरी यादी केली जाहीर

point

मनसेने 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

point

राज ठाकरेंनी कोणाकोणाला दिली संधी?

Maharashtra Assembly Election 2024 MNS 2nd Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने (MNS)आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीत 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सूपूत्र अमित ठाकरे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे नेमक्या कोणत्या मतदार संघातून विधानसभा लढवणार? हे जाणून घेऊयात. (maharashtra assembly election 2024 raj thackeray declare second list candidates amit thackeray mahim constituency  bala nandgaonkar vidhan sabha election)  

राज ठाकरेंचे सुपूत्र वरळी मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. या वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे विधानसभा लढवतात. मात्र ठाकरे विरूद्ध ठाकरे निवडणूक टाळण्यासाठी आता अमित ठाकरे यांना माहिम मतदारसंघ देण्यात आला आहे. त्यामुळे अमित ठाकरे आता माहिम मतदारसंघातून विधानसभा लढवणार आहेत. 

हे ही वाचा : Raj Thackeray MNS Candidate List: मनसेची यादी जाहीर, राज ठाकरेंनी घेतला प्रचंड मोठा निर्णय

आतापर्यंत माहीम या मतदारसंघातून राज ठाकरेंचं विश्वासू समजले जाणारे नितीन सरदेसाई हे निवडणूक लढवत होते. 2009 विधानसभा निवडणुकीत ते याच मतदारसंघातून निवडून देखील आले होते. ज्यांनी शिवसेनेच्या आदेश बांदेकरांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये नितीन सरदेसाईंना यश मिळवता आलं नव्हतं. त्यामुळे आता या मतदारसंघातून खुद्द अमित ठाकरेंनाच उमेदवारी देऊन राज ठाकरेंनी एक नवा डाव खेळला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मनसेला सलग 10 वर्ष अपयश 

2009 विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा झंझावात पाहायला मिळाला होता. त्यावेळी मनसेने आपल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 13 आमदार निवडून आणले होते. मात्र त्यानंतरच्या सलग दोन्ही विधानसभा या मनसेसाठी अत्यंत वाईट निकाल देणाऱ्या ठरल्या. कारण महाराष्ट्रातील जनतेने त्यांना सपशेल नाकारलं. ज्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी मनसे सोडून इतर पक्षांची वाट धरली.

हे ही वाचा : NCP : एक मिनिट... यादी नाही थेट AB फॉर्मच दिले, अजितदादांचा पॅटर्नच वेगळा!

दरम्यान जरी राज ठाकरेंनी वरळीतून ठाकरे विरूद्ध ठाकरे निवडणूक टाळली असली तरी त्या मतदार संघातून त्यांनी एक तगडा उमेदवार उभा केला आहे. राज ठाकरेंनी वरळी मतदार संघातून संदीप देशपांडे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत आता वरळी विधानसभा मतदार संघात पाहायला मिळणार आहे. 

ADVERTISEMENT

मनसेची यादी जाहीर 

1. कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) रतन पाटील
2. माहीम - अमित राज ठाकरे
3. भांडुप पश्चिम - शिरीष सावंत
4. वरळी - संदीप देशपांडे
5. ठाणे शहर - अविनाश जाधव
6. मुरबाड - संगिता चेंदवणकर
7. कोथरूड - किशोर शिंदे 
8. हडपसर - साईनाथ बाबर
9. खडकवासला - मयुरेश वांजळे
10. मागाठाणे - नयन कदम
11. बोरीवली - कुणाल माईणकर
12. दहिसर - राजेश येरुणकर
13. दिंडोशी - भास्कर परब
14. वर्सोवा - संदेश देसाई
15. कांदिवली पूर्व - महेश फरकासे
16. गोरेगाव - वीरेंद्र जाधव
17. चारकोप - दिनेश साळवी
18. जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे 
19. विक्रोळी - विश्वजीत ढोलम
20. घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल 
21. घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे
22. चेंबूर - माऊली थोरवे 
23. चांदिवली - महेंद्र भानुशाली
24. मानखुर्द-शिवाजीनगर - जगदीश खांडेकर
25. ऐरोली - निलेश बाणखेले
26. बेलापूर - गजानन काळे
27. मुंब्रा-कळवा - सुशांत सूर्यराव
28. नालासोपारा - विनोद मोरे
29. भिवंडी पश्चिम - मनोज गुळवी
30. मिरा-भाईंदर - संदीप राणे
31. शहापूर - हरिश्चंद्र खांडवी
32. गुहागर - प्रमोद गांधी
33. कर्जत-जामखेड - रवींद्र कोठारी
34. आष्टी - कैलास दरेकर
35. गेवराई - मयुरी म्हस्के
36. औसा - शिवकुमार नागराळे
37. जळगाव शहर - अनुज पाटील
38. वरोरा - प्रवीण सूर
39. सोलापूर दक्षिण - महादेव कोगनुरे
40. कागल - रोहन निर्मळ
41. तासगांव - कवठे महाकाळ - वैभव कुलकर्णी 
42. श्रीगोंदा - संजय शेळके 
43. हिंगणा - विजयराम किनकर 
44. नागपूर दक्षिण - आदित्य दुरूगकर
45. सोलापूर शहर-उत्तर - परशुराम इंगळे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT