Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: पराभवनंतर राज ठाकरेंच्या लेकाची पोस्ट, म्हणाले "कदाचित जनतेला..
Maharashtra Election Result 2024 LIVE Updates: राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? हा एकच सवाल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. अशातच आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
LIVE Maharashtra Assembly Election Results: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर आज (23 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. सध्या समोर आलेल्या कलांनुसार राज्यात महायुती आघाडीवर दिसते आहे. 100 पेक्षा जास्त जागांवर आता महायुती पुढे आल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT
सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही तासातच राज्याचा नेमका निकाल काय हे स्पष्ट होईल. यंदाच्या निवडणुकीत नेमकं कोणाला बहुमत मिळेल याबाबत बराच संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी राज्यातील जनतेने नेमका कोणाला कौल दिला आहे याकडेच आता सगळंचे डोळे लागून राहिले आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024 : Maharashtra Elections Exit Poll : कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय? अख्खी यादी आली समोर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचे क्षणाक्षणाचे संपूर्ण अपडेट आपल्याला या लाइव्ह ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील.
हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024 : राज्यात महायुतीचा झेंडा फडकणार! MVA ला फक्त 'इतक्या' जागा मिळणार, 'Chanakya Exit Poll'ने उडवली खळबळ
याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील निकाल आणि इतर सगळ्या घडामोडी Mumbaitak.in या आमच्या वेबसाइटवर तुम्हाला मिळतील.
ADVERTISEMENT
Amit Thackeray | Nawab Malik | Aditya Thackeray | Varun Sardesai | Mumbai Assembly Election
ADVERTISEMENT
- 04:08 PM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : विजयानंतर पहिली पत्रकार परिषद, काय म्हणाले शिंदे?
"महाराष्ट्रातला हा ऐतिहासिक दिवस आणि विजय आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणुका आपण पाहिल्या. पण ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली, अशाप्रकारची होती. लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला. कारण लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, या सर्व घटकांनी यावेळी महायुतीवर प्रेम दाखवलं. मी सर्व मतदारांना मनापासून धन्यवाद देतो. या ऐतिहासिक विजयासीठी साष्टांग दंडवत घालतो, अशाप्रकारचं काम मतदारांनी केलं आहे. आम्ही जे निर्णय घेतले, ते आतापर्यंतचे न भुतो न भविष्यतो आहे. महाविकास आघाडीने आतापर्यंत जे स्पीडब्रेकर टाकले होते, ते स्टे आम्ही सर्व काढले. कामं सुरु झाली. त्यानंतर अटल सेतू, कोस्टल, मेट्रो, कारशेडही झालं. कामाला आम्ही प्राथमिकता दिली."
- 03:48 PM • 23 Nov 2024
Balasaheb Thorat : शिंदेंचा शिलेदार, विखेंची फिल्डिंग... बाळासाहेब थोरात यांची विकेट
बाळासाहेब थोरात यांचं आतापर्यंत संगमनेर मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व होतं. पण एकनाथ शिंदे यांचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या गडाला सुरूंग लावला आहे. त्यामुळे अमोल खताळ हे जायंट किलर ठरले आहेत. बाळासाहेब थोरात हे नवव्या वेळेस यंदा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात होते. तर त्यांच्या विरोधात असलेले अमोल खताळ हे एक नवखे तरुण म्हणून त्यांच्यासमोर होते. अमोल खताळ यांच्या विजयाची कारणं जाणून घेताना विखेंबद्दलही बोलणं अपरिहार्य ठरतं. कारण अमोल खताळ यांच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे यांनी मोठी ताकद लावून मायक्रो प्लॅनिंग केल्याचं दिसलं होतं. त्यामुळे या परभवात पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे विखे विरुद्ध थोरात असा लढा पाहायला मिळाला.
- 02:10 PM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : गुलाबी प्रचारानंतर विजयाचा गुलाल, अजितदादांना गुलाबी बुके देणारैा कोेण?
अजित पवार यांनी राष्ट्रवादीला मिळालेल्या यशानंतर आपल्या एस्क हँडलवर खास फोटो शेअर करत महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला असं म्हटलं आहे. त्यांच्या या यशस्वी प्रचाराच्या मागे असलेले नरेश अरोरा हे देखील या फोटोमध्ये दिसत आहेत. (Naresh Arora meets Ajit Pawar)
- 02:02 PM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : महायुतीचे राजू नवघरे मतांनी 26353आघाडीवर
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates
- 22 व्या फेरीच्या अखेर महायुतीचे राजू नवघरे मतांनी 26,353 आघाडीवर
- महायुतीचे राजू नवघरे यांना 99,218 मतं
- महाविकास आघाडीचे जयप्रकाश दांडेगावकर 72865 मते.
- राजू घरे हे विजयाच्या जवळ
- 01:53 PM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे हादरे
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला असून, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणही आता पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. राज्याच्या इतिहासात यंदाचा भाजपचा विजय हा अत्यंत मोठा विजय म्हणून पाहिला जाऊ शकतो.
- 01:41 PM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : आता लक्ष मुख्यमंत्रीपदावर, बहुमत मिळाल्यावर शिंदे काय म्हणाले?
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मी महाराष्ट्रातल्या मतदारांचे आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. त्यांचं अभिनंदन करतो. महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळतंय. लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ, या समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला भरभरून मतदान केलं. गेले अडीच वर्ष या काळात महायुतीने जे काम केलं, त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळाली. आम्ही सर्वसामान्यांचा सरकार म्हणतो. सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काय करू शकतं, हे आम्ही अनेक योजनांच्या आणि विकासाच्या माध्यमातून दाखवून दिलं. सरकारची प्रामाणिक इच्छा असेल, तर अशाप्रकारच्या योजना सुरु करु शकते. म्हणूनच सर्वसामान्यांच्या भल्यासाठी हे सरकार आलं आहे.
- 12:38 PM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates:शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा?
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 58 उमेदवार सध्याआघाडीवर असून, काही उमेदवारांच्या फक्त विजयाची घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. कारण दुसरीकडे भाजपलाही तब्बल 120 पेक्षा जास्त उमेदवारांनी विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच होणार काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
- 12:10 PM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: विजयानंतर जल्लोष, श्रीकांत शिंदे मुख्यमंत्रीपदाबद्दल काय म्हणाले?
लाडकी बहीन योजनेनं चमत्कार घडवला. आमच्या विकासाच्या मुद्द्याला जनादेश देऊन जनेते खोटारडेपणाला नाकारलं आहे अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार कोण हे आज जनतेने दाखवून दिलं आहे. त्यामुळे आता खरी शिवसेना कोण, हे पुढच्या वेळी कुणी विचारू नये असा टोलाही श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. तुम्ही पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याला विचारा, प्रत्येकजण म्हणेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत. सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील असा विश्वासही श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. - 12:02 PM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: नागपूरमध्ये नितीन राऊत 4 हजार मतांनी आघाडीवर, फडणवीसांचा...
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates
१. नागपूर दक्षिण पश्चिम
देवेंद्र फडणवीस 12,329 मतांनी आगाडीवर(विजयी)२. मध्य नागपूर
प्रवीण दटके 2952 मतांनी आघाडीवर३. पश्चिम नागपूर
विकास ठाकरे 4600 मतांनी आघाडीवर4: उत्तर नागपूर
नितीन राऊत 4600 मतांनी आघाडीवर५. दक्षिण नागपुर
मोहन मते 9030 मतांनी आघाडीवर६. पूर्व नागपूर
कृष्णा खोपडे 6020 मतांनी आघाडीवर - 11:49 AM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: "देवेंद्रजी, देवेंद्रजी आणि देवेंद्र...", चित्रा वाघ यांचा जल्लोष
Maharashtra Assembly Election 2024 Result LIVE: "देवेंद्र जी ….देवेंद्रजी आणि देवेंद्र जी… चप्पा चप्पा भाजपा…. माझ्या राज्यातील सगळ्या लाडक्या बहीणीचें आभार…आभार ..आभार" असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या लाभार्थींचे आभार मानले आणि महायुतीला मिळालेल्या विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
- 11:36 AM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: नागपूर दक्षिण पश्चिममधून फडणवीस विजयी
Maharashtra Assembly Election 2024 Result LIVE: नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस हे विजयी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. गिरीश महाजन यांच्यानंतर हा राज्यातला दुसरा निकाल असणार आहे. त्यामुळे एकीकडे भाजप महायुतीला राज्यात यश मिळत असताना त्यांना मिळालेलं हे यश भाजपसाठी जल्लोषाचं कारण ठरणार आहे.
- 11:33 AM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates:गिरीश महाजन जामनेरमधून विजयी, राज्यातला पहिला निकाल
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates
- गिरीश महाजन जामनेरमधून विजयी, राज्यातला पहिला निकाल
- बारामतीमध्ये अजित पवार 15000 मतांनी आघाडीवर
- श्रीवर्धन आदिती तटकरेकर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आघाडीवर
- 11:21 AM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: बारामतीत अजितदादांच्या समर्थकांचा जल्लोष
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: निवडणूक आयोगाच्या अधिकृत ट्रेंडनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री बारामती विधानसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार 15,382 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष सुरू केला आहे. दरम्यान, महायुतीने राज्यात 145 जागांचा बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार महायुतीमध्ये भाजपला 118, शिवसेनाला 56, राष्ट्रवादीला 37 जागांवर आघाडीचं मतदान आहे.
- 11:15 AM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: संभाजीनगरमध्ये शिंदेंचे उमेदवार आघाडीवर, वाचा यादी
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE
संभाजीनगर पश्चिम : ९ वी फेरी-संजय शिरसाट यांची ९ हजार २८६ मतांची आघाडी
कन्नड : 8 वी फेरी- संजना जाधव 8418 मतांनी पुढे
गंगापूर : 11 वी फेरी- सतीश चव्हाण ४८३ मतांनी आघाडीवर
संभाजीनगर मध्य : जैस्वाल दुसऱ्या फेरी अखेर 3342 मतांनी आघाडीवर
फुलंब्री : अनुराधा चव्हाण पाचव्या फेरीत 11721 मतांची आघाडी
परळी : धनंजय मुंडे 50 हजार मतांनी आघाडीवर
गंगाखेड : विशाल कदम (शिवसेना उबाठा) आघाडी:- 8932
घनसावंगी : 2 फेरी हिकमत उढाण २ हजारांनी आघाडीवर...
वैजापूर :12 वी फेरी रमेश बोरनारे 22,000 हजार मतांनी आघाडीवर..
सिल्लोड : अब्दुल सत्तार ७ वी फेरीनंतर ३७०५ आघाडी
औसा : 5 वी फेरी अभिमन्यू पवार 9580 मतांनी आघाडीवर
जालना : अर्जुन खोतकर चौथ्या फेरी अखेर 9 हजार 157 मतांनी आघाडीवर
भूम-परांडा : तानाजी सावंत 69 आघाडी
भोकरदन : संतोष दानवे 3278 मतांनी आघाडीवर
बदनापूर : भाजपाचे नारायण कुचे 10 हजार 86 मतांनी पुढे
औरंगाबाद पूर्व : 7 फेरी जलीलांची 47 हजार 649 आघाडी
लातूर शहर : 6 फेरी अर्चना पाटील चाकूरकर 460 मताने आघाडीवर - 11:00 AM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: माहिममध्ये राज ठाकरेंचा लेक पडणार? महेश सावंत आघाडीवर
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: माहिममध्ये राज ठाकरेंचा लेक अमित ठाकरे पडणार असल्याचे चिन्ह आहेत. या मतदारसंघात महेश सावंत हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे अमित ठाकरे हे तब्बल तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचं दिसतंय.
- 10:52 AM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: विदर्भात कुणाचे किती आमदार आघाडीवर?
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates
१) चंद्रपूर - भाजप ५, शेतकरी संघटना १
२) अमरावती - भाजप ४, कॅाग्रेस १, ठाकरे गट १ युवा स्वाभिमान १, अजित पवार १
३) यवतमाळ- भाजप - २, कॅाग्रेस २, अजित पवार - १, शिंदे - १ उबाठा १
४) गोंदिया - भाजप ४ आघाडीवर५) भंडारा - कॅाग्रेस १, शिंदे सेना १, अजित पवार १
६) अकोला - भाजप ३, महाविकास आघाडी २
७) वर्धा - भाजप ३, कॅाग्रेस १
८) बुलडाणा- भाजप ४, शिंदे ३
९) नागपुर जिल्हा भाजप ८, काँग्रेस - ३, अपक्ष - १
१०) गडचिरोली - भाजप २, अजित पवार १
११) वाशिम भाजप २, शिंदेंची शिवसेना १
- 10:42 AM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये जलील यांची आघाडीवर
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्व मतदारसंघात इम्तियाज जलील हे आघाडीवर असल्याचं दिसतं आहे. मंत्री अतूल सावे यांच्या विरोधात ते एमआयएमकडून मैदानात होते. या भागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदान असून, त्या मतदानाची मोजणी सुरू असल्याचाच अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्यामळे या मतदारसंघाच्या अपडेट शेवटपर्यंत पाहाव्या लागणार आहेत.
- 10:07 AM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: अजित पवार बारामतीमधून तब्बल 15 हजार मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 LIVE: अजित पवार बारामतीमधून तब्बल 15 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे अजित पवार यांचा विजय आता जवळपास निश्चित असल्याचं चर्चा सध्या बारामतीमध्ये सुरू आहे.
- 09:58 AM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: महाविकास आघाडीमध्ये बडे नेते पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 LIVE: राज्यात सुरूवातीला समोर आलेल्या कलांनुसार महायुती आघाडीवर असल्याचं दिसते आहे. पिछाडीवर असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचंही नाव आहे. त्या तिवसामधून काँग्रेसकडून निवडणूक लढत होत्या.
- 09:56 AM • 23 Nov 2024
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: यशोमती ठाकूर तिवसामधून पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 LIVE
- सना मलिक अणुशक्तीनगर इथून पिछाडीवर
- नवाब मलिक शिवाजीनगर मानखुर्द इथून पिछाडीवर
- कांदिवलीतून अतुल भातखळकर आघाडीवर
- यशोमती ठाकूर तिवसामधून पिछाडीवर
- भिवंडी पूर्वत सपाचे रईस शेख आघाडीवर
- शिवडीतून अजय चौधरी आघाडीवर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT