Maharashtra Cabinet Expansion LIVE: फडणवीसांचं जम्बो मंत्रिमंडळ, महायुतीच्या 39 मंत्र्यांनी घेतली शपथ
महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडला. आज (15 डिसेंबर) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी अनेक नेते हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळाचा शपथविधी हा 4 वाजता विधानसभेच्या प्रांगणात होणार आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल हा 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा 5 डिसेंबरला पार पडला. पण त्यानंतर अनेक दिवस मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचीच चर्चा सुरू होती. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून आज (15 डिसेंबर) नागपुरात संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
- 09:28 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update : फडणवीस सरकारचा शपथविधी संपला! पण खातेवाटप कधी?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच आज नागपूरच्या राजभवनात महायुतीच्या एकूण 39 नेत्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून खातेवाटपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. "दोन तीन दिवसात मुख्यमंत्री महोदय सर्वांचे खातेवाटप करतील आणि कामाला गती आल्याचं आपणा सर्वांना पाहायला मिळेल", असं अजित पवार म्हणाले.
- 06:04 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: योगेश कदम यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Yogesh Kadam: शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
- 06:01 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: इंद्रनील नाईक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Indranil Naik: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
- 05:59 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: मेघना बोर्डिकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Meghna Bordikar: भाजपच्या आमदार मेघना बोर्डिकर यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
- 05:57 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: पंकज भुयार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Pankaj Rajesh Bhoyar: भाजपचे ज्येष्ठ आमदार पंकज भुयार यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
- 05:56 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: आशिष जैस्वाल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Ashish Jaiswal: शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आशिष जैस्वाल यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
- 05:54 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: माधुरी मिसाळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Madhuri Misal: भाजपच्या ज्येष्ठ आमदार माधुरी मिसाळ यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
- 05:51 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: प्रकाश आबिटकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Prakashrao Abitkar: शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार प्रकाश आबिटकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- 05:49 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: बाबासाहेब पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Babasaheb Mohanrao Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- 05:46 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: आकाश फुंडकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Akash Pandurang Fundkar: भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- 05:44 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: नितेश राणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Nitesh Rane: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- 05:43 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: मकरंद पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Makarand Laxmanrao Jadhav Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मकरंद पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- 05:40 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: भरतशेठ गोगावले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Bharatshet Gogawale: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भरतशेठ गोगावले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- 05:38 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: प्रताप सरनाईक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Pratap Sarnaik: शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- 05:36 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: संजय शिरसाट यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Sanjay Shirsat: शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार संजय शिरसाट यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- 05:33 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: संजय सावकारे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Sanjay Savkare: भाजपचे ज्येष्ठ आमदार संजय सावकारे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- 05:31 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: नरहरी झिरवाळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Narhari Zirwal: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- 05:29 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: जयकुमार गोरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Jaykumar Gore: भाजपचे ज्येष्ठ आमदार जयकुमार गोरे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- 05:26 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: माणिकराव कोकाटे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Manikrao Kokate: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- 05:25 PM • 15 Dec 2024
Maharashtra Cabinet Expansion LIVE Update: शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Shivendrasinh Abhaysinhraje Bhosale: भाजपचे ज्येष्ठ मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ