Maharashtra New CM LIVE : एकनाथ शिंदेंच्या बैठका रद्द! श्रीकांत शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाबाबत केला मोठा खुलासा
Maharashtra New CM News Live : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, याचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे स्पष्ट झालं की, मुख्यमंत्री भाजपचाच होणार. आता फक्त नावावर शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. या चर्चेत आता अनेक नावं समोर आली आहेत. आजपासून याबद्दलच्या घडामोडींना वेग येणार आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra New CM LIVE Updates : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा उलटून गेला आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण असणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. एकीकडे महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत जाऊन आलेत. या बैठकीत अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं स्पष्ट सांगितलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी नावं समोर आली आहेत. मात्र आता भाजपकडून सांगण्यात आलेली शपथविधीसाठीची 5 डिसेंबर ही तारीख जवळ येतेय. त्यामुळे घडामोडींचा वेगही वाढला आहे.
ADVERTISEMENT
राज्यातील सर्व घडामोडींचे वेगवान अपडेट्स जाणून घेण्यासाठी 'मुंबई Tak'चा लाईव्ह ब्लॉग वाचत राहा...
ADVERTISEMENT
- 03:53 PM • 02 Dec 2024
Maharashtra New CM News Live : "अफवांना अधिकच बहर...", श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले?
भाजपनं शपथविधीची तारीख जाहीर करुन एकनाथ शिंदेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे गावावरुन परतल्यानंतरही अद्याप बैठक झाली नाही आणि भाजपचीच कोंडी झाली. दुसरीकडे आज अजित पवार पुन्हा दिल्लीला जाऊन अमित शाहांची भेट घेणार आहेत. श्रीकांत शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चांबाबत खुलासा केलाय. शिंदे- भाजपच्या बैठकांची कोंडी कधी सुटणार? शिंदेंमुळे फडणवीसांची मुख्यमंत्रीपदाची घोषणा रखडली आहे का? दादांची अचानक दिल्लीवारी का? असे सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात आले आहेत. "महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत", असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.
- 12:31 PM • 02 Dec 2024
Maharashtra New CM News Live : "महायुती सरकारमध्ये गृहमंत्रिपदावरुनच सगळं थांबलेलं नाही"
महायुती सरकारमध्ये हे सगळं गृहमंत्रीपदावरुन सगळं थांबलेलं नाही. भाजपने मनात आणलं तर मागण्या करणाऱ्यांना एका मिनिटात चिरडून टाकतील. जे निवडून आलेत ते कसे निवडून आलेत ते सुद्धा भाजपला माहिती आहे. त्यामुळे यामागे काही वेगळी कारणं आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. भाजपने अनेक राज्यात प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवे मुख्यमंत्री केले आहेत, मग शिंदे कोण आहेत? फडणवीसांच्याऐवजी कुणी दुसऱ्याला बसवण्यात येणार का? अशी शंकाही राऊतांनी व्यक्त केली.
- 10:30 AM • 02 Dec 2024
Maharashtra Politics News Live : मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा राजीनामा, विधानसभा निवडणुकीत काय घडलं?
पालघर मधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी रविवारी राज ठाकरेंची भेट घेऊन पराभवाची कारण सांगितली. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केल्यानंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली. याचाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करत त्यांचे बंधूवरही हल्ला केल्याचं मोरे यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय.
- 09:08 AM • 02 Dec 2024
Maharashtra New CM News Live : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्ममंत्री? नागपूरमध्ये बॅनर, अर्थ काय?
राज्यात मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट नसतानाही देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल अशीही एक शक्यता आहे. अशातच नागपूरमध्ये "वापस आना पडता हैं, फिर वापस आना पडता हैं!" अशा आशयाचे बॅनर लागलेले दिसले आहेत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकीकडे 5 तारखेला शपथविधी होणार असल्याचं सांगितलं आणि दुसरीकडे तिकडे नागपूरमध्ये फडणवीस यांच्या नावाचे बॅनर लागल्यानं याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
- 09:04 AM • 02 Dec 2024
Maharashtra New CM News Live : नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरची चर्चा...
- 08:29 AM • 02 Dec 2024
Maharashtra New CM News Live : एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परषदेतील मुद्द्यांचा अर्थ काय?
शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, "मला विश्वास होता की, या निवडणुकीत प्रचंड यश मिळेल. आम्ही ज्या योजना केल्या त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत पाहायला मिळालं. आतापर्यंतच्या इतिहासात एव्हढ्या मेजॉरिटीने महायुतीला जे यश मिळालं, ते कधीच मिळालं नाही. तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी केली जात आहे, नेमकं काय ठरलंय? या प्रश्नाचं उत्तर देताना शिंदे म्हणाले, मी जनतेचा मुख्यमंत्री, कॉमन मॅन म्हणून काम केलं. मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, तर कॉमन मॅन. कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याचं काम केलं. त्यामुळे लोकांची भावना असणं साहजिकच आहे. मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते. सर्व सहकारी सोबत होते. मिळालेलं यश प्रचंड आहे. यामध्ये कुणाचाही संभ्रम नको, म्हणून मागच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपचे अध्यक्ष मुख्यमंत्रिपदाबाबतचा जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असेल, असं मी सांगितलं आहे. त्यामुळे किंतू, परंतु कोणाच्याही मनात नसावा. शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून माझा निर्णय मी घेतला आहे", असंही शिंदे म्हणाले. त्यामुळे एकीकडे शिंदे हे भाजपला पाठिंबा असल्याचंही सांगतायत आणि ते निवडणुका माझ्या नेतृत्वात झाल्याचंही अधोरेखित करुन देत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT