Maharashtra New CM LIVE : एकनाथ शिंदे अचानक गावी रवाना, मुंबईत होणार होती महायुतीची बैठक, पण...
ADVERTISEMENT
Maharashtra New CM LIVE Updates : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे. काल दिल्लीत याबद्दल महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. अमित शाह यांच्या घरी तीन्ही नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक पार पडली. ज्यामध्ये मुख्यमंत्री पदासह मंत्रिपदं आणि खाती यावर बरीच चर्चा झाली. पण याच बैठकीआधी तीनही नेत्यांनी अमित शाह यांचं स्वागत केलं. ज्याचा फोटो हा समोर आला. या फोटोमध्ये शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जातंय. ज्यावरून नव्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय आलेला नाही. काल शिंदेंनी पत्रकार परिषद घेत, आपली भूमिका स्पष्ट केली आणि ते या शर्यतीतून बाहेर असल्याचं स्पष्ट झालं.
ADVERTISEMENT
राज्यातील सर्व घडामोडींचे वेगवान अपडेट्स वाचण्यासाठी वाचत राहा 'मुंबई Tak'
हे ही वाचा >> Waqf Board Fund : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर, सरकारचा मोठा निर्णय, GR मध्ये काय म्हटलंय?
ADVERTISEMENT
- 01:52 PM • 29 Nov 2024
Maharashtra New CM LIVE : मुंबईत महायुतीची आजची बैठक झाली रद्द! नेमकं घडलं तरी काय?
राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच काल एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. अशातच फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीची आज मुंबईत बैठक होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, आजची महायुतीची मुंबईची बैठक रद्द करण्यात आलीय. कारण एकनाथ शिंदे त्यांच्या गावी सातारा जिल्ह्यात गेले आहेत. शिंदे अचानक गावी गेल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. शिंदे उद्या शनिवारी मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- 12:09 PM • 29 Nov 2024
Maharashtra New CM LIVE : पुण्यात बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषण, निवडणुकांबद्दल काय म्हणाले?
पुण्यात बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने योजनांमार्फत वाटलेले पैसे, लोकशाहीचा सबलीकर, हिंदुत्वाच्या दिशेने चाललेलं समाजकारण यावर बोलले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून या सर्व गोष्टींवर आक्षेप घेण्यात येत आहेत. तसंच ईव्हीएमवरही शंका घेतली जातेय. त्यातच आता बाबा आढाव यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे.
- 10:18 AM • 29 Nov 2024
Maharashtra New CM LIVE : अमित शाहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय चर्चा?
दिल्लीत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याची माहिती आहे. यामध्ये कुणाला किती खाती मिळणार यावर चर्चा झाली. मात्र कोणती खाती मिळणार यावर चर्चा न झाल्याची माहिती आहे. त्यानुसार सर्वात जास्त म्हणजे जवळपास 20 खाती भाजपकडे असू शकतात, तर त्याखालोखाल खाती शिंदेंकडे असतील. तसंच सर्वात कमी खाती अजित पवार यांच्या पदरात पडणार आहेत. मात्र केंद्रीय मंत्रिपदावरुनही सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
- 10:14 AM • 29 Nov 2024
Maharashtra New CM LIVE : शिंदेंना जे हवं ते कधीच मिळणार नाही : राऊत
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं काम आता संपलेलंं आहे, त्यामुळे आता भाजपने त्यांचे आमदार फोडून बहुमत सिद्ध केलं तरी आश्चर्य वाटणार नाही असं संजय राऊत म्हणालेत. एकनाथ शिंदे हे संरक्षण मंत्रिपदही मागू शकतात, राष्ट्रपतीपद मागू शकतात, पण त्यांचं काही मनावर घेऊ नका. दिल्लीने डोळे वटारले की हे गप्प बसतात असं म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
- 10:08 AM • 29 Nov 2024
Maharashtra New CM LIVE : देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब : संजय राऊत
दिल्लीत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक पार पडली. रात्री उशिरा झालेल्या बैठकीला प्रफुल्ल पटेल, जे.पी. नड्डा, सुनील तटकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री पदासह मंत्रिपदं आणि खाती यावर बरीच चर्चा झाली अशी माहिती आहे. यावर बोलतानाच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं आहे.
अमित शाहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यानचे जे दोन फोटो समोर आले आहेत त्यापैकी पहिल्या फोटोत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अमित शाह स्वागत करत असल्याचं पाहायला मिळालं. तर दुसऱ्या फोटोमध्ये अजित पवार हे अमित शाहांचं स्वागत करत होते. या फोटोमध्ये अमित शाह, अजित पवार यांच्यासह जेपी नड्डा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे असल्याचं दिसून आलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT