लाइव्ह

Maharashtra New CM News Live: भाजपचं ठरलं, मुख्यमंत्री पदाबाबत मोठा निर्णय...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Political LIVE Updates : राज्यात सध्या विधानसभेच्या निकालानंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत. मागच्या काही काळापासून मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. तर सध्याच्या सरकारच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर म्हणजेच आज संपणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आज राजीनामा देतील अशी शक्यता सकाळपासून वर्तवली जात होती. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिन्ही नेते राजभवनावर दाखल झालेले असून, शिंदेंनी राजीनामा देत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

ADVERTISEMENT

राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? कुणाला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागणार? सर्व सविस्तर अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत राहा 'मुंबई Tak'


हे ही वाचा >> Eknath Shinde : "माझ्या समर्थनार्थ कुणीही...", मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

ADVERTISEMENT

  • 06:01 PM • 26 Nov 2024

    Maharashtra New CM News Live: भाजपचं ठरलं, मुख्यमंत्री कोण लवकरच होणार जाहीर!

    भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार हे पुढच्या 48 तासात जाहीर होणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे दोन निरीक्षक हे महाराष्ट्रात येणार आहेत. दरम्यान, 29 नोव्हेंबरला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक पार पडणार आहे. या सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.

  • 03:58 PM • 26 Nov 2024

    Maharashtra New CM News Live : EVM वर शंका, निवडणूक आयोगाला आवाहन काय म्हणाले रोहित पवार?

    रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन EVM वर शंका उपस्थित केली. तसंच सध्या घडलेल्या गोष्टी पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार असतील तर आम्ही गुलामगिरी स्वीकारलेली बरी असं रोहित पवार म्हणाले. EVM बद्दलच्या शंकांचं निरसन करुन दूध का दूध पाणी का पाणी करावं असं रोहित पवार म्हणाले. शिक्षकांना ट्रॅक करण्यासाठीही यंत्रणा लावली गेली त्याचं कारण काय होतं असा सवालही रोहित पवार यांनी केला. तसंच निवडणूक आयोगाने आम्हाला 4 दिवस द्यावेत, आम्ही EVM चा पोस्टमार्टम करु आणि शंका निरसन करु असं ते म्हणाले आहेत.

  • 03:48 PM • 26 Nov 2024

    Maharashtra New CM News Live : "सरकार मध्येही पडू शकतं, दहशत माजवण्याचा प्रयत्न करायचा नाही"

    राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं असून, अवघ्या काही दिवसांमध्ये शवथविधीही पार पडणार आहे. त्यावरच बोलताना मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दात सरकाला इशारा दिला. माज करायचा नाही, दहशत माजवण्याचा प्रयत्न करायचा नाही, मराठ्यांवर कुणी दडपन आणण्याचा प्रयत्न केला, तर मी सगळे मराठे एकत्र आणू शकतो असा इशारा मनोज जराेगे यांनी दिला आहे. आम्ही मैदानातच नव्हतो, असं म्हणत जरांगे पॅटर्न संपला म्हणणाऱ्यांना त्यांनी उत्तर दिलं आहे.

  • 02:22 PM • 26 Nov 2024

    Maharashtra New CM News Live : शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासनच दिलं नव्हतं, आठवलेंनी स्पष्ट सांगितलं

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर बोलत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. "मुख्यमंत्रीपदासाठी नाव ठरलं असून, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावं लागणार आहे असं भाजप हायकमांडने शिंदेंनाही सांगितलं आहे. शिवसेनेचं म्हणणं आहे की, शिंदेंना मुख्यमंत्री करावं, बिहार पॅटर्न राबवावा, पण तसं होणार नाही, कारण शिंदेंना निवडणुकीपूर्वी तसं आश्वासन दिलं नव्हतं." असं आठवले म्हणाले. मुख्यमंत्रीपदाची मागणी त्यांनी नाही केली पाहिजे, ते जर उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार नसतील, तर त्यांनी  दिल्लीत आलं पाहिजे, दिल्लीत त्यांना कॅबिनेट मंत्री बनवलं जाऊ शकतं असं रामदास आठवले म्हणाले आहेत. 

  • ADVERTISEMENT

  • 01:55 PM • 26 Nov 2024

    Maharashtra New CM News Live : आव्हाडांचं ट्विट, कन्नडमध्ये मतांचं गणित कसं चुकलं ते दाखवलं

    जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भाने व्हायरल होणार्‍या मतांच्या एका गणितावरुन इव्हीएमवर निशाणा साधला आहे. यामध्ये तळनेरा गावातील मतांचं चुकलेलं गणित दाखवण्यात आलं आहे. तळनेर गावात एकूण मतदार 396 आहे. पण प्रत्येक उमेदवाराला त्या गावात मिळालेल्या मतदानाची बेरीज ही तब्बल 624 एवढी भरतेय. तळनेर गावातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभे असलेल्या उदयसिंह राजपूत यांना 194, शिंदेंकडून उभ्या असलेल्या संजना जाधव यांना 326 तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 104 मतं मिळाली आहेत. या तिघांच्याही मतांची बेरीज केल्यास ती तब्बल 624 होत असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे गावात फक्त 396 मतदार असताना 624 मतदान कसं झालं असा सवाल उपस्थित केला जातोय. या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, "EVM वर मुळीच शंका नाही, पण या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? लवकरच हे उघडकीस आणू!"
     

  • 01:34 PM • 26 Nov 2024

    Maharashtra New CM News Live : "महायुती डॅमेज होईल असं विधान कुणीही करू नये"

    राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सध्या सर्वांचं लक्ष आहे. याबद्दल बोलत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. मात्र कुणीही असं कुठलंही विधान करु नका जे महायुतीला डॅमेज होईल असं आवाहनही बावनकुळे यांनी केलं. तसंच ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केंद्रातून घेतला जाणार आहे. सर्व बाबींचा विचार करावा लागतो, म्हणून थोडा उशीर होतोय. त्यामुळे कुणीही गैरसमज करु नये.

  • ADVERTISEMENT

  • 01:26 PM • 26 Nov 2024

    CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री, पुढचा मुख्यमंत्री कोण?

    राज्यात सध्या विधानसभेच्या निकालानंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत. मागच्या काही काळापासून मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. तर सध्याच्या सरकारच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर म्हणजेच आज संपणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आज राजीनामा देतील अशी शक्यता सकाळपासून वर्तवली जात होती. त्यानंतर आता तिन्ही नेते राजभवनावर दाखल झालेले असून, शिंदेंनी राजीनामा देत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. 

    राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांचा एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असा आग्रह आहे. यासाठी निकाल जाहीर झाल्यापासून शिंदेंच्या भेटीसाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते वर्षा बंगल्यावर, ठाण्यातील निवासस्थानी भेटीसाठी येताना दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना न जमण्याचं आवाहन केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT