Maharashtra New CM LIVE: मुख्यमंत्री ठरवणारी बैठक सुरू, अमित शाह घेणार फायनल निर्णय
Maharashtra Govt Formation News LIVE : राज्यात महायुतीला बहुमत मिळालं असूनही सरकार स्थापन झालेलं नाही. तसंच मुख्यमंत्री कोण हे देखील Maharashtra New CM News LIVE Updates: ठरलेलं नाही. त्यामुळे सर्वांचं लक्ष सध्या याच विषयावर आहे. काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत, आपली भूमिका स्पष्ट केली आणि ते या शर्यतीतून बाहेर असल्याचं स्पष्ट झालं.
ADVERTISEMENT
Maharashtra New CM LIVE Updates : राज्यात महायुतीला बहुमत मिळालं असूनही सरकार स्थापन झालेलं नाही. तसंच मुख्यमंत्री कोण हे देखील ठरलेलं नाही. त्यामुळे सर्वांचं लक्ष सध्या याच विषयावर आहे. राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याच प्रश्नावर सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहेत. 26 नोव्हेंबरला राज्यात 2019 ला स्थापन झालेल्या विधानसभेची मुदत संपली. एकनाथ शिंदे यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय आलेला नाही. काल शिंदेंनी पत्रकार परिषद घेत, आपली भूमिका स्पष्ट केली आणि ते या शर्यतीतून बाहेर असल्याचं स्पष्ट झालं.
ADVERTISEMENT
राज्यातील सर्व घडामोडींचे वेगवान अपडेट्स वाचण्यासाठी वाचत राहा 'मुंबई Tak'
हे ही वाचा >> Eknath Shinde यांना का घ्यावी लागली माघार? 'हे' फॅक्टरही ठरले फेल!
ADVERTISEMENT
- 11:19 PM • 28 Nov 2024
Maharashtra New CM News Live : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी दिल्लीत दीड तासांपासून महायुतीची बैठक सुरू
बैठक सुरू होण्याआधी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी केलं अमित शाह यांचं स्वागत. दरम्यान, त्यानंतर तब्बल दीड तास ही बैठक सुरू आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, गृहखातं कोणाला आणि कोणती मंत्रिपदं यावर चर्चा सुरू आहेत.
- 10:22 PM • 28 Nov 2024
Maharashtra New CM News Live: मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीत बैठक सुरू
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल यावर आज राजधानी दिल्लीत खलबतं सुरू आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे. एकनाथा शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीनही महत्त्वाचे नेते या बैठकीत हजर आहेत.
- 05:34 PM • 28 Nov 2024
Maharashtra News Live: धनंजय मुंडे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केली सडकून टीका, म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "त्यांची काय अवस्था झालीय...ते कुठून कुठवर आलेत. त्यांनी आपली जी काही आहे...जी राहिली लाज, ती तर राखावी...29 चं सांगताय..अरे आज काय, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने धडा शिकवलाय, त्या बाबतीत बोला ना...
- 04:13 PM • 28 Nov 2024
Maharashtra New CM News Live : अजित पवार यांच्याकडून दिल्ली विधानसभा लढवण्याचे संकेत
अजित पवार यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुका लढवण्याचे संकेत दिलेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत EVM चा मुद्दा उपस्थित करण्यात येतोय, पण पराभव झाला की विरोधक इव्हीएमचा मुद्दा उपस्थित करतात, लोकसभा निवडणुकीत EVM चांगलं होतं होतं असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांवर पटवार केला आहे. तसंच आगामी काळात आपला पक्ष हा राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
- 03:08 PM • 28 Nov 2024
Maharashtra News Live : "निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर...", नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
"संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचं मतदान 58.22 टक्के होत असेल, मग असं काय होतं की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत तुमचं मतदान झालं. त्याच्यामध्ये तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं. हे प्रमाण जवळपास साडे सात टक्क्यांनी वाढलं. याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या या मतदानासंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांकडून गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्वत: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच मिस्टर त्यांनीही यावर ऑब्जेक्शन घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे", अशी मोठी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- 02:06 PM • 28 Nov 2024
Maharashtra New CM News Live : "सर्वेच्या नावाखाली जागा घेतल्या, पण तिथे काँग्रेसले डिपॉझिटही वाचवता आलं नाही"
Ambadas Danve on Congress : सर्वेच्या नावाखाली काँग्रेसने ज्या जागा घेतल्या, तिथे त्यांना त्यांचं डिपॉझिटही वाचवता आलं नाही. त्यांना संभाजीनगरमध्ये फक्त 5500 मतं मिळाली. मात्र दुसरीकडं काँग्रेस नेते मंत्रिपदासाठी सूट घालून तयार होते, असं म्हणत अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसला अतिआत्मविश्वास होता. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महत्त्व देत नव्हता असाही आरोप दानवे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही प्रचार करण्याऐवजी जागांबद्दलच चर्चा करत राहिलो, त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला असं दानवे म्हणाले आहेत.
- 12:46 PM • 28 Nov 2024
Maharashtra New CM News Live : फडणवीसांच्या भेटीसाठी शिवसेना नेत्यांची रीघ
Maharashtra CM News LIVE: सत्तेचं समिकरण बदलणार आहे, राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री दिसणार आहे. यामध्ये सर्वात जास्त शक्यता आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात माळ पडण्याची. त्यानंतर आता शिदेंच्या शिवसेनेचे नेते भेटीसाठी देवेंद्र फडणवीसांकडे रीघ लावताना दिसत आहेत. आतापर्यंत संजय राठोड, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर हे सगळे नेते आतापर्यंत फडणवीसांना भेटल्याची माहिती समोर आहे. 25 तारखेपासून आतापर्यंत फडणवीसांना भेटलेल्या नेत्यांची सध्या चर्चा सुरू आहे.
- 10:46 AM • 28 Nov 2024
Maharashtra New CM News Live : शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीला जाणार?
Maharashtra CM News LIVE: देवेंद्र फडणवीस आज दुपारी ३ वाजता मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना होणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही दिल्लीला जाणार असल्याची शक्यता आहे. महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी मुख्यमंत्री कोण होणार हे अजून ठरू शकलेलं नाही.गेल्या काही दिवसांपासून यावरुन वेगवेगळ्या घडामोडी मुंबईत सुरू असताच आता दिल्लीतही घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतं आहे. मुख्यमंत्री कोण होणार याचा अंतिम निर्णय दिल्लीतच होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
- 10:06 AM • 28 Nov 2024
Maharashtra New CM News Live : दिल्लीत अमित शाह विनोद तावडेंमध्ये पाऊन तास चर्चा
Maharashtra CM News LIVE: एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याची एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र असं असतानाच तिकडे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे विनोद तावडे यांच्यात खलबतं सुरू असल्याचं कळतंय. काल रात्री विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात दिल्लीत जवळपास पाऊन तास बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर आली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. अशा काळात मुख्यमंत्री मराठा न झाल्यास मराठा समाजात रोष निर्माण होऊन, मराठा मतं दुरावण्याची चिंता केंद्रीय नेतृत्वाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मराठा मतं कशी टिकवायची यावर ही चर्चा झाल्याची शक्यता आहे.
- 09:36 AM • 28 Nov 2024
Maharashtra New CM News Live : श्रीकांत शिंदे यांची वडिलांसाटी भावनिक पोस्ट
Maharashtra CM News LIVE: श्रीकांत शिंदे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
मुख्यमंत्रीपदावरुन सुरू असलेला तिढा आणि त्यावरुन राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर सध्या देशाचं लक्ष लागून आहे. अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: आपली भूमिका जाहीर करत, निर्णय घेण्यासाठी मार्ग सोपा केला. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या या निर्णयाबद्दल भावनिक पोस्ट लिहिली आहे. "मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला 'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.
सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!" असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT