लाइव्ह

Maharashtra New CM LIVE Updates : शपथविधीची तयारी, महायुतीच्या बैठकांचा धडाका, मुख्यमंत्री कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra New CM LIVE Updates : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता दहा दिवस उलटून गेले आहेत. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण असणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. एकीकडे महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत जाऊन आलेत. या बैठकीत अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं स्पष्ट सांगितलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी नावं समोर आली आहेत. उद्या अर्थातच 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. त्यामुळे आज बैठकांचा धडाका पाहायला मिळणार आहे. 

ADVERTISEMENT

 

राज्यातील सर्व घडामोडींचे वेगवान अपडेट्स जाणून घेण्यासाठी 'मुंबई Tak'चा लाईव्ह ब्लॉग वाचत राहा...
 

ADVERTISEMENT

  • 12:05 PM • 04 Dec 2024

    Maharashtra New CM News Live : भाजप गटनेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदाच्या निवडीसाठी आयोजित बैठकीला संबोधित केलं. यावेळी निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय रुपाणी यांनी केलं. यावेळी त्यांनी प्रस्ताव ठेवण्याची विनंती केली, त्यानुसार चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचं सूचवलं. विधिमंडळ पक्षनेतेपदाचा प्रस्ताव त्यांनी सादर केला. त्यानंतर जोरदार टाळ्या वाजवत, जयघोष करत सर्वांकडून या प्रस्तावाचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर  देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, रविंद्र चव्हाण आणि पंकजा मुंडे यांनीही मांडला.

  • 11:58 AM • 04 Dec 2024

    Maharashtra New CM News Live : विधिमंडळ गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदाच्या निवडीसाठी आयोजित बैठकीला संबोधित केलं. यावेळी निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय रुपाणी यांनी केलं. यावेळी त्यांनी प्रस्ताव ठेवण्याची विनंती केली, त्यानुसार चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचं सूचवलं. विधिमंडळ पक्षनेतेपदाचा प्रस्ताव त्यांनी सादर केला. त्यानंतर जोरदार टाळ्या वाजवत, जयघोष करत सर्वांकडून या प्रस्तावाचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर  देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, रविंद्र चव्हाण आणि पंकजा मुंडे यांनीही मांडला.

  • 11:16 AM • 04 Dec 2024

    Maharashtra New CM News Live : भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

    भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज विधान भवनात पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील याची शक्यता बळावली आहे. 

  • 10:46 AM • 04 Dec 2024

    Maharashtra New CM News Live : शपथविधीसाठी जय्यत तयारी, वाहतुकीची व्यवस्था कशी?

    05 डिसेंबर 2024 रोजी आझाद मैदान मैदानावर राज्यात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वाहतुकीचा अडथळा आणि जनतेची गैरसोय टाळण्यासाठी खालील सूचना करण्यात आल्या आहेत. ( Traffic Arrangements for Mahayuti Government Oath Taking Ceremony 5 December 2024)

     

    पोलिसांनी काय सूचना दिल्या? 

     

    हा आदेश 05/12/2024 रोजी दुपारी 12.00 वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहील.

    1) आझाद मैदानावर पार्किंगची सुविधा नसल्यामुळे, लोकांना विनंती आहे की त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (विशेषतः ट्रेन/लोकल ट्रेन्स) वापरावी.

    2) नो एंट्री (आवश्यक असेल तेव्हा)

    A. महापालिकामार्ग:-सीएसएमटी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंत वाहतूक करण्यास मनाई असेल. 

    पर्यायी मार्ग :  L. T मार्ग- चकाला जंक्शन- उजवे वळण-DN रोड-CSMT जंक्शन- पासून पुढे.

    B. महात्मा गांधी मार्ग : चाफेकर बंधू चौक (O. C. S. जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दोन्ही सीमांपर्यंत वाहतुकीस बंद.

    पर्यायी मार्ग :- 1) L. T मार्ग-चकाला जंक्शन- उजवे वळण-DN रोड-CSMT जंक्शन- इच्छित स्थळाकडे आणि त्याउलट. २) वाहतूक महर्षी कर्वे रस्त्यावरून इच्छित स्थळी वळवली जाईल.

    C. हजारीमल सोमाणी मार्ग: चाफेकर बंधू चौक (O.C.S जंक्शन) ते CSMT जंक्शन पर्यंत रहदारीला बंदी असेल.

    पर्यायी मार्ग :- चाफेकर बंधू चौक (O.C.S जंक्शन) हुतात्मा चौक-कालाघोडा-के दुभाष मार्ग-शहिद भगतशिंग मार्ग-पासून पुढे

    D. मेघदूत ब्रिज [प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज] [दक्षिण बाउंड)- एनएस रोड आणि कॉस्टल रोडपासून. श्यामलदास गांधी जंक्शनच्या दिशेने.

    पर्यायी मार्ग:- प्रवाशांनी N.S.रोडचा वापर करावा

    E. रामभाऊ साळगावकर रस्ता (वन वे) : इंदू क्लिनिक जंक्शन (सय्यद जमादार चौक) ते वोल्गा चौकापर्यंतचा रामभाऊ साळगावकर रस्ता 12.00 ते 20.00 वाजेपर्यंत दोन्ही मार्गाच्या वाहन वाहतुकीसाठी खुला राहील.

    3) आझाद मैदान आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या संख्येने लोक जमा होणार आहेत, लोकांना विनंती आहे की त्यांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावं.

  • ADVERTISEMENT

  • 10:34 AM • 04 Dec 2024

    Maharashtra New CM News Live : देवेंद्र फडणवीस विधान भवनात दाखल, आमदार फेटे घालून स्वागताला

    उद्या 5 डिसेंबरला राज्यात महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी एकीकडे जोरदार तयारी सुरू असून, दुसरीकडे आज भाजपच्या गटनेतेपदाच्या निवडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस हे विधान भवनात दाखल झाले आहेत. फडणवीस येताच भगवे फेटे घातलेल्या त्यांच्या आमदारांनी त्यांचं स्वागत केलं. 

follow whatsapp

ADVERTISEMENT