लाइव्ह

Maharashtra CM Oath Ceremony LIVE updates : फडणवीसांच्या नावाची पाटी, दरवाजावर फुलं...मंत्रालयातील दालन सज्ज

मुंबई तक

Maharashtra CM Shapath Grahan Samaroh LIVE : महायुती सरकारचा शपथविधी आज मोठ्या थाटात आझाद मैदानावर पार पडला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमाला बॉलिवूडपासून वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज मंडळी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra New CM LIVE Updates : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शपथविधी कधी होणार हा एकच सवाल सर्वांसमोर होता. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसंच अखेर एकनाथ शिंदे हे सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

  • 08:13 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Swearing in ceremony LIVE : पहिल्याच पत्रकार परिषदेवर कोणत्या मुद्द्यांवर बोलले फडणवीस?

    • राज्याचं सरकार आज स्थापन झालं असून, देवेंद्र फडणवीस हे लगेचच सक्रीय झाले आहे.
    •  येत्या  7, 8 आणि 9 डिसेंबरला राज्याचं अधिवेशन पार पडणार असून, त्यादरम्यानच विधानसभा अध्यक्ष निवडणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 
    • तसंच महायुती सरकार येण्यामध्ये महत्वाचा वाटा असलेल्या लाडक्या बहि‍णींबद्दलही त्यांनी एक मोठी माहिती दिली. खर्चाच्या सर्व तरतुदी करुन निकषात बसणाऱ्या लाडक्या बहि‍णींना येणाऱ्या काळात 2100 रुपये प्रति महा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 
    • आमच्या सरकारचं विशेष लक्ष नदीजोड प्रकल्प, सौरउर्जेतून 16 हजार मेगा व्हॅट उर्जेची निर्मितीचं ध्येय अशा शाश्वत विकासाच्या प्रकल्पांवर असणार असंही ते यावेळी म्हणाले.
    • राज्यात आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यामुळे आता मंत्रिमंडलाचा शपथविधी कधी होणार यावर सर्वांचं लक्ष होतं. याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुढच्या 10 दिसांमध्ये हा शपथविधी पार पडेल अशी शक्यता आहे.  
    • राजकीय संघर्षाबद्दल बोलताना त्यांनी आपण बदल्याचं नाही तर बदल दाखवणारं राजकारण करणार असं ते म्हणाले आहेत. 
    • विरोधकांची संख्या कमी असली तरी, त्यांच्या संख्येवर आम्ही त्यांचं मुल्यमापन करणार नाही, त्यांनी योग्य विषय मांडल्यास त्यांचा सन्मान करू असा विश्वासही फडणवीसांनी दिला आहे. 
    • एकूणच आम्ही जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पू्र्ण करण्याचा प्रयत्न करणार असून, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं लोकाभिमूख सरकार राज्याला दाखवू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 
  • 07:14 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Swearing in ceremony LIVE : देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी मंत्रालयातील दालनाची सजावट

  • 05:42 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Swearing in ceremony LIVE : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ

    मी पुन्हा येईन... म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर तिसऱ्यांदा महाराष्ट्रा राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 
     

  • 05:41 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Swearing in ceremony LIVE : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

  • 05:30 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Swearing in ceremony LIVE : महायुतीचा शपथविधी, सलमान, शाहरूखची हजेरी...

  • 05:20 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Swearing in ceremony LIVE : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांची भावनिक पोस्ट

    Maharashtra CM Shapath Grahan Samaroh LIVE: देवेंंद्र फडणवीस आज राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरूवात होणार असून, यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट केली आहे. "मायेचे औक्षण! आईच्या आशीर्वादाने नव्या पर्वाचा आरंभ..." अशा शब्दात आईकडून औक्षण केलं जातानाचा एक क्षण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल हँडल्सवर शेअर केला आहे. 

     

  • 05:13 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Ceremony LIVE: देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्या आईकडून औक्षण

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: शपथविधाीला घरातून निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या आईने केलं औक्षण

     

  • 05:07 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: फडणवीसांकडून गोमातेची पूजा

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी गोमातेचं पूजन केलं आहे. ज्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

     

  • 04:13 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Ceremony LIVE: महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी खास थिम

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी भव्यदिव्य तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला देशभरातील दिग्गज उपस्थित राहणार असून, सोहळ्यासाठी एक खास थिम तयार केल्याचं दिसतंय. यामध्ये स्टेज, मंडप, होर्डिंग्ज हे खास भगव्या रंगाचे असल्याचं पाहायला मिळतंय. तर देवेंद्र फडणवी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या फोटोसह दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी यांचा फोटो पाहायला मिळतो आहे. 
     

     

  • 04:06 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Swearing in ceremony LIVE : राज्यात 11 तारखेला मंत्र्यांचा शपथविधी

    राज्यात आज महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर येत्या काही दिवसांमध्येच मंत्र्यांचाही शपथविधी पार पडणार असल्याचं समजतंय. याबद्दल बोलत असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी येत्या 11 तारखेला मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. 

  • 03:47 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: एकनाथ शिंदे शपथ घेणार, पत्र राजभवनाच्या सचिवांकडे सुपूर्द

  • 03:43 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Ceremony LIVE: अमित शाह मुंबईत दाखल, नेत्यांसोबत बैठक

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबईत दाखल झालेले आहेत. काहीवेळापूर्वीच ते मुंबईतील विमानतळावर ते पोहोचले आहेत. ते आता भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेतील आणि त्यानंतर ते आझाद मैदानावर दाखल होतील. 

  • 03:33 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Swearing in ceremony LIVE : उदय सामंत, भरत गोगावले, राहुल शेवाळे, रविंद्र फाटक फडणवीसांना भेटले

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: उदय सामंत, भरत गोगावले, राहुल शेवाळे, रविंद्र फाटक यांनी अखेरच्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पत्र घेऊन ते नुकतेच राजभवनात पोहोचले. तिथे राजभवनाच्या सचिवांकडे त्यांनी ते पत्र सूपूर्द केलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे आज उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

  • 03:22 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Ceremony LIVE: शाही शपथविधीसाठी कोणकोणत्या दिग्गजांची हजेरी?

    Maharashtra CM Shapath Grahan Samaroh LIVE: अखेर एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तोडगा निघाला असून, ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पत्र मिळालं असून, ते पत्र घेऊन आता उदय सामंत हे राजभवनात जात आहेत. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये हे पत्र राज्यपालांकडून सुपूर्द केलं जाणारअसून, संध्याकाळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. 

  • 03:08 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Swearing in ceremony LIVE : तिढा सूटला, शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

    Maharashtra CM Shapath Grahan Samaroh LIVE: अखेर एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तोडगा निघाला असून, ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पत्र मिळालं असून, ते पत्र घेऊन आता उदय सामंत हे राजभवनात जात आहेत. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये हे पत्र राज्यपालांकडून सुपूर्द केलं जाणारअसून, संध्याकाळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. मात्र, त्यांना गृहमंत्रिपद मिळणार की नाही हे अजून निश्चित झालेलं नाही. त्यामुळे या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना कोणत्या जबाबदाऱ्या मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल. 

  • 03:01 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Ceremony LIVE: "एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार"

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. या भेटीनंतर बाहेर आलेल्या गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्याचं लक्ष महायुतीच्या शपथविधी सोहळ्याकडे लागल्याचं दिसलं आहे. 

  • 02:48 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Swearing in ceremony LIVE : उदय सामंत फडणवीसांच्या भेटीसाठी 'सागर' बंगल्यावर

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: महायुती सरकारचा शपथविधी पुढच्या काही वेळात पार पडणार आहे. मात्र अजून एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यानंतर आता उदय सामंत यांचा ताफा सागर बंगल्याकडे रवाना झाला आहे. त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात काय चर्चा होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 

  • 01:57 PM • 05 Dec 2024

    Maharashtra CM Swearing in ceremony LIVE : "उपमुख्यमंत्री होण्याची शिंदेंची मानसिकताच नव्हती"

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: "रात्री आम्ही सर्व 40 ते 50 आमदारांनी जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटलो आणि त्यांना आग्रह केला की, तुम्ही सत्तेमध्ये असलं पाहिजे. त्यांना आम्ही आग्रह केल्यानंतर ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी तयार झाले. त्यांचं म्हणणं होतं की, आमच्यापैकी कुणीतरी उपमुख्यमंत्री व्हावं" अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे एकत्र सरकारमध्ये असले तर राज्याचा फायदा होईल असं गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान भरपूर सभा घेतल्या, त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक नव्हती त्यामुळे ते कुणाला भेटत नव्हते असं गुलाबराव पाटील म्हणाले.

  • 01:17 PM • 05 Dec 2024

    Devendra Fadnavis Oath Taking Ceremony: एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींची विमानतळावर घेणार भेट, कारण...

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: अवघ्या काही तासानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा साडे तीन वाजता मुंबईत पोहचणार आहेत. शपथविधी सोहळ्याआधी अमित शाहा फडणवीस,शिंदे आणि अजितदादांना भेटणार आहेत. एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करायला विमानतळावर जाणार आहेत. विमानतळावरून शिंदे मोदींसह शपथविधी सोहळ्याला पोहचणार आहेत. फडणवीस, शिंदे, अजितदादा या तिन्ही नेत्यांचाच शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्या कॅबिनेटची बैठक होणार आहे. विरोधी पक्षापैकी कोणताही नेता शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. तसच काँग्रेसचा कोणताही नेता शपथविधी सोहळ्यास येणार नाहीय. 7 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 9 ते 11 डिसेंबरला विशेष अधिवेशन होणार असल्याचं समजते. 

  • 12:25 PM • 05 Dec 2024

    Devendra Fadnavis Oath Taking Ceremony LIVE: फडणवीसांनी राज ठाकरेंना दिलं निमंत्रण; मनसे अध्यक्ष शपथविधीला उपस्थित राहणार?

    Maharashtra CM Oath Ceremony LIVE: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा रंगणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. तत्पूर्वी फडणवीसांनी राज ठाकरेंना या सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं आहे. परंतु, वैयक्तीक कारणामुळे फडणवीस मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयत. 


     

follow whatsapp