लाइव्ह

Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll Live : अपक्ष आणि लहान पक्ष किंगमेकर ठरणार? एक्झिट पोल काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra Exit Poll Results 2024 Live: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा Exit Poll
Maharashtra Exit Poll Results 2024 Live: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा Exit Poll
social share
google news

Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडलं. ज्यानंतर आता वेगवेगळे एक्झिट पोल हे आता समोर येणार आहेत. त्यामुळे कोणत्या एक्झिट पोलचा नेमका अंदाज काय आणि कोणाला किती जागा मिळू शकतात याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील यंदाची निवडणूक ही पूर्णपणे वेगळी ठरली आहे. कारण पहिल्यांदाच प्रमुख सहा पक्ष हे विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. अशावेळी राज्यातील जनतेचा नेमका कौल कुणाला आहे हे आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून जाणून घेऊया. जाणून घ्या या एक्झिट पोलचे क्षणाक्षणाचे अपडेट. 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल हे आपल्या mumbaitak.in या वेबसाइटवर पाहता येतील.

 

ADVERTISEMENT

  • 07:56 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll Live : अपक्ष आणि लहान पक्ष किंगमेकर ठरणार? एक्झिट पोल काय?

    दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही राज्यातली पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत कुणाला कौल मिळणार यावरुन अनेकांचं भवितव्य ठरणार आहे. अशातच आज मतदान पार पडलं आणि एक्झिट पोलही समोर आहेत. त्यानसुर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  महायुतीला 122 ते 186 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 12 ते 29 जागा इतर पक्ष आणि अपक्षांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

  • 07:47 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll Live : महाविकास आघाडीला मॅजिक फिगर गाठता येणार का? काय सांगतोय एक्झिट पोल?

    लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यानंतर महायुतीने युद्धपातळीवर मोठे निर्णय घेतले आणि लाडकी बहीण सारख्या योजना लागू केल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र तेव्हा चांगलं यश मिळालेलं होतं. त्यानंतर आता बराच काळ उलटून असल्यानं सध्या राज्यातली स्थिती देखील बददली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसंच चित्र वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये दिसतं आहे.  जेव्हीसी टाईम्स नाऊने दिलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप महायुतीचे 159, काँग्रेस महाविकास आघाडीचे 116 तर इतर पक्षांचे 13 उमेदवार जिंकतील अशी शक्यता आहे.
     

    भाजप-महायुती : 159

    काँग्रेस-महाविकास आघाडी : 116

    इतर : 13

  • 07:35 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Assembly Election Exit Poll 2024 Live : सत्तापालट होणार की नाही? 'रुद्रा लोकशाही'चा एक्झिट पोल काय अंदाज वर्तवतोय?

    राज्यात मागच्या पाच वर्षात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडून गेल्या, त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही विशेष होती. त्यानंतर आता आज मतदान पूर्ण  झालं असून, वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल येत आहेत. लोकशाही रुद्राच्या एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार राहील असा अंदाजआहे.

     

    महायुती

    भाजप : 80 ते 85
    शिवसेना एकनाथ शिंदे : 30 ते 35
    राष्ट्रवादी : 18-22

     

    महाविकास आघाडी

    काँग्रेस : 48 ते 55
    शिवसेना उद्धव ठाकरे : 39 ते 43
    राष्ट्रवादी शरद पवार : 38 ते 42

  • 07:23 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Exit Poll Live : महाविकास आगाडी पिछाडीवर? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे?

    रिपब्लिक पी-मार्कच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला राज्यात 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या संस्थांनी तयार केलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीलाच राज्यातील जनतेचा कौल असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मात्र आता खरे आकडे काय? मॅजिक फिगर कुणाला मिळणार हे येत्या 23 तारखेलाच स्पष्ट होणार आहे. 

     

    महायुती : 137-157   -  42%

    महाविकास आघाडी  - 126-146  -  41 %

    इतर :  2-8 - 17 %

  • ADVERTISEMENT

  • 07:13 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Live : एबीपी चानक्यच्या एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा?

    'एबीपी चानक्य'ने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचं मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल वर्तवले आहेत. त्यानुसार राज्यात महायुताला थेट 152 ते 160 जागा मिळू शकतात. त्यामध्ये भाजपला 90, शिवसेनेला 48 आणि राष्ट्रवादीला 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काँग्रेसला 63, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 35 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार का? हे याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

    महायुती : 152 ते160

    भाजप - 90

    शिवसेना - 48

    राष्ट्रवादी - 22

    इतर - 2


    महाविकास 130 ते 138


    काँग्रेस - 63

    शिवसेना उद्धव ठाकरे - 35

    राष्ट्रवादी शरद पवार - 40

  • 06:53 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Exit Poll Live : महाराष्ट्राचा कौल पुन्हा भाजपलाच? 'इलेक्टोरल एज'च्या एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

    राज्यातील मतदान काही वेळापूर्वीच पार पडलं आहे. त्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत. इलेक्टोरल एज या संस्थेनं दिलेल्या आकड्यांनुसार भाजपला 78 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 14 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 60, शरद पवार यांना 46 आणि उद्धव ठाकरेंना 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 20 जागा या अपक्ष उमेदवारांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्ष आणि लहान पक्षच किंगमेकर ठरतील अशी शक्यता आहे.

     

     

  • ADVERTISEMENT

  • 06:50 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Election 2024 Exit Poll Live : राज्यात पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होणार? की अपक्ष किंगमेकर ठरणार?

    राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडलं. काही अपवाद वगळल्यास सर्व मतदारसंघांमधील मतदान पूर्ण झालं आहे. त्यानंतर आता लगेचच एक्झिट पोल समोर आले आहेत. सध्या एबीपी माट्रीझने दिलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप आणि महायुतीला 150 ते 170 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर लहान पक्ष, अपक्ष उमेदवारांचा आकडा 10 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 

    कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान मिळू शकतं?

     

    BJP : 48%

    CONG : 42 %

    OTH : 10 %

  • 06:37 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Assembly Election Exit Poll: एक्झिट पोल येण्यास सुरुवात

    Maharashtra Assembly Election Exit Poll: महाराष्ट्रातील मतदान संपल्यानंतर आता वेगवेगळे एक्झिट पोल हे समोर येत आहे. मुंबई Tak आपल्यापर्यंत प्रत्येक एक्झिट पोल झटपट घेऊन येणार आहे. जाणून घ्या याबाबतचे अपडेट.

  • 06:34 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll: पाहा राज्यात पाच वाजेपर्यंत किती टक्के झालं मतदान

    Maharashtra Assembly Election 2024: पाहा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत किती टक्के झालं मतदान

    1. अहमदनगर : 61.95%
    2. अकोला : 56.16%
    3. अमरावती : 54.48%
    4. औरंगाबाद : 60.83%
    5. बीड : 60.62%
    6. भंडारा : 65.88%
    7. बुलढाणा : 62.84%
    8. चंद्रपूर : 64.48%
    9. धुळे : 59.75%
    10. गडचिरोली : 69.63%
    11. गोंदिया : 65.09%
    12. हिंगोली : 65.09%
    13. जळगाव : 54.69%
    14. जालना : 64.17 %
    15. कोल्हापूर : 67.97%
    16. लातूर : 61.43%
    17. मुंबई शहर : 49.07%
    18. मुंबई आणि उपनगर : 51.76%
    19. नागपूर : 56.06%
    20. नांदेड : 55.88%
    21. नंदुरबार : 63.72%
    22. नाशिक : 59.85%
    23. उस्मानाबाद : 58.59%
    24. पालघर : 59.31%
    25. परभणी : 62.73%
    26. पुणे : 54.09%
    27. रायगड : 61.01%
    28. रत्नागिरी : 60.35%
    29. सांगली : 63.28 %
    30. सातारा : 64.16%
    31. सिंधुदुर्ग : 62.06%
    32. सोलापूर :57.09% 
    33. ठाणे : 49.76%
    34. वर्धा : 63.50
    35. वाशिम : 57.42%
    36. यवतमाळ : 61.22%
  • 06:32 PM • 20 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll: महाराष्ट्रातील मतदान संपलं, एक्झिट पोलमध्ये नेमकी कुणाला सत्ता?

    Maharashtra Election 2024 Exit Poll: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची मुदत अखेर आता संपली आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात 58.22 टक्के मतदान झालं आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT