Maharashtra CM: मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप-महायुतीचा महाराष्ट्रात अभूतपूर्व विजय

point

मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा

point

भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावाचा आग्रह

Devendra Fadnavis on CM Post: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये भाजप-महायुतीने महाराष्ट्रात अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवत एक नवा इतिहास रचला आहे. ज्यानंतर मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे. (maharashtra vidhan sabha election 2024 devendra fadnavis big statement regarding the post of chief minister)

ADVERTISEMENT

'मुख्यमंत्री पदाबाबत काहीही ठरलेलं नव्हतं. निवडणुकीनंतर तीनही पक्षांचे नेते बसून याबाबतचा निर्णय घेतील असं ठरलं होतं.' असं म्हणत फडणवीसांनी एक प्रकारे त्यांच्या पक्षाचा दावाच पेश केला आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Election 2024 Results: पाहा तुमच्या मतदारसंघात कोण जिंकतंय?, 288 मतदारसंघांचा निकाल

पाहा निकालानंतर फडणवीस काय म्हणाले...

'कोणत्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. जे विरोधी पक्षातून निवडून आले आहेत त्यांचा आम्ही सन्मान करू. त्यांचा पक्ष छोटा असो वा मोठा असो.. ते ज्या योग्य गोष्टी सांगतील त्या योग्य गोष्टींवर आम्ही प्रतिसाद देऊ.'

हे वाचलं का?

'लोकशाहीची हीच खरी गंमत आहे. लोकशाहीत कोणाला जनता डोक्यावर घेईल आणि कोणाला धाराशाही करेल हे सांगता येणार नाही. हेच या निवडणुकीने दाखवून दिलं आहे.'

हे ही वाचा>> Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: पराभवनंतर राज ठाकरेंच्या लेकाची पोस्ट, म्हणाले "कदाचित जनतेला..

'याबाबतीत अमित शाह यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. मुख्यमंत्री पद हे कोणत्याही निकषावर नाही. मुख्यमंत्री पद हे तीनही पक्षाचे नेते बसून ठरवतील. एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. अजितदादा हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते आमच्या संसदीय समितीसोबत बसून निर्णय घेतं. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. कुठलाही वाद नाही विवाद नाही...' 

ADVERTISEMENT

'मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही वाद होणार नाही. कारण पहिल्या दिवसापासून हे ठरलं आहे की, निवडणूक जेव्हा संपन्न होईल त्यानंतर तीनही पक्ष मिळवून याबाबत ठरवेल. जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल. लोकांनी शिंदेंना खरी शिवसेना म्हणून स्वीकारलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजितदादांना.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT