Maharashtra Election Results : विधानसभेच्या निकालात खरंच गोंधळ? तुमचे प्रश्न, निवडणूक आयोगाची सविस्तर उत्तरं...
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी इव्हीएमवर आक्षेप घेत, गैरप्रकार झाल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी काही मतदारसंघांमधील आकडेवारी शेअर करत प्रश्न उपस्थित केले होते. अशाच प्रश्नांची उत्तर निवडणूक आयोगाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न 'मुंबई तक'च्या माध्यमातून करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मतदानाच्या आकडेवारीमध्ये घोळ कसा?
विजयी किंवा पराभूत उमेदवारांच्या मतांमध्ये साम्य कसं?
मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी Exclusive
Maharashtra Assembly Elections Results 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणी दरम्यान अनेक ठिकाणी घोळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहेत. संजय राऊत यांनी इव्हीएमवर आक्षेप घेत, फेरफार झाल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी काही मतदारसंघांमधील आकडेवारी शेअर करत प्रश्न उपस्थित केले होते. हा गोंधळ नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आणि विरोधकांनी मांडलेल्या आकड्यांच्या गणिताची उकल करण्यासाठी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याशी 'मुंबई तक'चे संपादक साहिल जोशी यांनी संवाद साधला. यामध्ये सर्व आरोपांवर, शंकांवर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा, प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
1. विजयी किंवा पराभूत उमेदवारांच्या मतांच्या आकड्यात साम्य कसं?
विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार राज्यातील अनेक ठिकाणी विजयी किंवा पराभूत उमेदवारांच्या मतांच्या आकड्यांमध्ये साम्य आढळून येतं. यावर बोलताना किरण कुलकर्णी यांनी सांगितलं की, आम्ही प्रक्रियेबद्दल नक्की स्पष्टीकरण देत असतो. नाशिकमध्ये असे अनेक प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं, तेव्हा आम्ही नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही संपर्क केला, कारण ते निवडणूक अधिकारी हे तिथले जिल्हाधिकारी असतात. आकडेवारी पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की, प्रत्येक मतदारसंघात मिळालेली मतांची संख्या वेगवेगळीच आहे. फक्त रेंज सारखी म्हणत असाल, तर तो स्टॅस्टीक अॅनालिटिक्सचा भाग आहे. पुढे बोलताना किरण कुलकर्णी यांनी सांगितलं की, प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची संख्या वेगळीच असते. पण ती एका रेंजमध्ये दिसते, मात्र आकडेवारी वेगळीच असते. पण रेंज सारखी असणं स्वाभाविक आहे, याचं कारण म्हणजे 2008 मध्ये 'डिलिमिटेशन ऑफ कॉन्सिट्युएन्सीज्' झालं, तेव्हा मतदारसंघांची निश्चिती करण्यात आली. मतदानाची टक्केवारी पाहिली तरी रेंज सारखीच असल्याचं प्रत्येक निवडणुकीत दिसतं. पण आकडेवारी वेगळी आहे. एकूणच बूथनिहाय विचार केल्यास आकडे वेगळे आहेत असं त्यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Maharashtra New CM LIVE : एकनाथ शिंदे अचानक गावी रवाना, मुंबईत होणार होती महायुतीची बैठक, पण...
2. मतदारांपेक्षा मतदान जास्त?
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपांनुसार कन्नड विधानसभेतील तळनेर गाव, कराडमधील एका प्रकरणात मतदारांपेक्षा मतदान झाल्याचं निदर्शनास आलं होतं. यावर बोलताना किरण कुलकर्णी यांनी सांगितली की, संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांना या गोष्टींची माहिती घेऊन समोर ठेवण्यास सांगितलं आहे. तसंच कन्नडमधील प्रकरणाची माहिती आम्ही ट्विटद्वारे प्रसिद्ध केली आहे. जे आकडे समोर ठेवले आहेत, ती आकडेवारी ही खरी नाही, ही खोटी आकडेवारी आहे असं स्पष्टपणे किरण कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं. काऊंटींग टेबलवर आक्षेप घेण्यासाठी संधी असतेच, तेव्हा आक्षेप घेतल्यास तो दूर केल्याशिवाय मोजणी पुढे जात नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
3.पोस्टल मतांच्या आकड्यांमुळे एकूण आकडेवारीत तफावत ?
मतदानाची, मतमोजणीची प्रक्रिया काय असते, याबद्दल सर्व माहिती वेबसाईटवर असते. प्रत्यक्ष मतदार आणि पोस्टल मतदान असे दोन पद्धतीने मतदान होतं. यामध्ये वृद्धांसाठी, सैन्यातील कर्मचाऱ्यांसाठी आणि निवडणूक कर्तव्यावर असलेल्या लोकांचं पोस्टल मतदान होत असतं. 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपर्यंत आमच्याकडे पोस्टल मतदान आमच्यापर्यंत येत होतं. त्यामुळे तोपर्यंत जाहीर करण्यात आलेले आकडे फक्त EVM वरील मतदानाचे आकडे होते. त्यामुळे मतांची टक्केवारी याच प्रत्यक्ष मतांची होती. त्यामुळे तफावत वाटू शकते हे एक कारण आहे. तसंच दुसरं कारण सांगताना कुलकर्णी म्हणाले की, 1 लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र महाराष्ट्रात होते. त्यामुळे एका विधानसभेत तीनशे ते चारशे केंद्र असतात. काऊंटींगवेळी एखाद्या कन्ट्रोल युनिटचा डिल्प्ले काही कारणांमुळे डिस्ल्पे झाला नाही, तर इतर सुरू असलेल्या युनिटचं काऊंटींग पूर्ण करुण घेणे अशी प्रक्रिया असते. मतदान केंद्राध्यक्षाकडील 17 C फॉर्ममध्ये असलेल्या उल्लेखामुळे त्या मशिनमधील मतदानाचा आकडा माहिती असतो, त्यामुळे त्या मतांपेक्षा जर पहिल्या दोन उमेदवारांमध्ये असलेल्या मार्जिनचा आकडा जास्त असेल, तर ती मोजली जात नाहीत. अर्थातच जर एखादं मशिन डिस्ल्पे झालं नाही, त्यातली मतं कळली नाही, तर ते बाजूला ठेवण्यात येतं. त्या मशिनमध्ये उदा. 100 मतं असतील आणि पूर्ण मोजणी झाल्यानंतर जर विजयी आणि पराभूत उमेदवारात 200 मतांचा फरक असेल, तर याचा निकालावर परिणाम होणार नाहीये, याची खात्री राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून करुन घेऊनच ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवली जाते. एकूणच त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत हे आकडे दिसतात, पण मतमोजणीत ते दिसत नाही, त्यामुळेही तफावत दिसू शकते. तसंच अशा प्रकरणांमध्ये EVM मशिन्सचे VVPAT मधील पेपर स्लिप्स मोजण्याचीही तरतूद असते असंही किरण कुलकर्णी यांनी सांगितलं.
95 मतदारसंघांध्ये मतदार आणि मतांमध्ये तफावत असल्याची बातमी एका वृत्तपत्रात आली होती, यावरुन सवाल केला असता किरण कुलकर्णी यांनी सांगितलं की, पोस्टलचे मतं आधी जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्क्यांच्या आकडेवारीमध्ये नसतात. त्यामुळे हा फरक बहुसंख्य ठिकाणी दिसू शकतो असंही ते यावेळी म्हणाले.
4. राज्यात 74 लाख मतदार कसे वाढले?
लोकसभा निवडणुकीवेळी 9 कोटी 27 लाखांच्या आसपास लोकसभेला मतदार होते, तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 9 कोटी 70 लाख एवढी मतदार नोंदणी झाली. त्यामुळे 74 लाख मतदार वाढल्याचं आकडेवारीतून दिसतंय. त्यामुळे एवढे मतदार कसे वाढले असा सवाल उपस्थित होतोय. मधल्या काळात ज्या मतदारांना 1 ऑक्टोबरपर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेत त्यांचा समावेश करुन घेण्यात आला. मतदारांना या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आवाहन करण्यात आलं होतं. यंदा नवमतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केलेलं असू शकतं. त्यामुळे ही मतदानाची आकडेवारी ही कशी वाढली यांचं उत्तर शोधणं हे तज्ज्ञांचं काम आहे.
5. संध्याकाळी 5 वाजेनंतर मतदार कसे वाढलेत?
सकाळी 7 वाजता मतदान सुरू होतं. दर दोन तासांनी अंदाजीत आकडे दिले जातात. हे आकडे खात्रीपूर्वक दिलेले नसतात, तर ते फोनवरुन, कुणीतरी दिलेल्या माहितीवरुन दिलेली असते, त्यामुळे तिची खात्री झालेली नसल्यानं तिला अंदाजीत आकडेवारी म्हणतात. ही आकडेवारी सकाळी 9 वाजेपासून दोन तासांच्या अंतराने दिली जाते. 5 वाजता एक आकडेवारी येते. मात्र त्यामध्ये पोस्टलच्या मतांची टक्केवारी यामध्ये समाविष्ट नसते. त्यानंतर 6 वाजता क्लोज ऑफ पोल असतो, पण त्यापूर्वी केंद्रात पोहोचलेल्या मतदारांचं मतदान झाल्याषशिवाय काम थांबवलं जात नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी 5-6 च्या दरम्यान आलेल्या सर्व मतदारांचं मतदान होईपर्यंत काम संपत नाही. त्यामुळे 6 वाजता मतदान संपलं तरी एन्ड ऑफ पोल होत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रात्री 9 वाजेपर्यंतही मतदान पूर्ण झालं नाही. तसंच त्यानंतर काही मतदान केंद्र दुर्गम भागात असतात, त्यामुळे त्यानंतर रात्री 11 वाजता आलेल्या आकडेवारीतही पूर्ण मतदानाच्या आकडेवारीचा समावेश नसतो, ती अंदाजित असते. दुसऱ्या दिवशी 12 वाजता कुणीही राहिलेलं नाही याची खात्री करून 17 C फॉर्म वरुन अंतिम आकडेवारी काढण्याचं काम केलं जातं. त्यानंतर संपूर्ण आकडेवारी जाहीर केली जाते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT