Mumbai Assembly Election Voting LIVE Updates: वरळी मतदारसंघात ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा!
Mumbai Assembly Election Voting LIVE Updates | Mumbai Assembly Election Voting: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: राज्यात आज (20 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आहे. जाणून घ्या मुंबईत नेमकं काय-काय घडतंय.
ADVERTISEMENT
Mumbai Assembly Polls LIVE: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे. त्यातही मुंबईत नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये यंदा अत्यंत चुरशीची लढाई आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे.
ADVERTISEMENT
आज दिवसभरात मुंबईतील मतदानासंबंधी संपूर्ण नेमक्या घडामोडी आणि संपूर्ण माहिती ही आपल्याला या लाइव्ह ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील सर्व महत्त्वाचे अपडेट हे आपल्याला mumbaitak.in या वेबसाइटवर पाहता येतील. लोकशाहीच्या या उत्सवात राज्यात सर्व मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जरून बजावावा असं आवाहन मुंबई Tak कडून आपणास करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
- 02:13 PM • 20 Nov 2024
Mumbai Election 2024 live News : ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबईतही निवडणुकीची धामधूम सुरु असून वरळी मतदारसंघात ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं समोर आलंय. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर माहिमध्ये अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेत जोरदार मोर्चेबांधणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे मैदानात उतरले आहेत.
- 01:37 PM • 20 Nov 2024
Mumbai Election 2024 Latest Update: मतदान केल्यानंतर हेमा मालिनी काय म्हणाल्या?
"मी मतदान करून आली आहे. आमच्या देशातील या परिसरात राहणाऱ्या सर्व जनतेनं मतदान करावं. देशाच्या भविष्यासाठी हे तुमचं कर्तव्य आहे. मतदान करणं किती महत्त्वाचं आहे, असं आवाहन करण्यासाठी मी इथे आले आहे. आपल्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे", असं राज्यसभा खासदार हेमा मालिनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
- 12:51 PM • 20 Nov 2024
Mahim Assembly 2024 : माहिम भाजप विभाग प्रमुख अक्षिता तेंडुलकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ठाकरेंच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच आज मदतान प्रक्रिया पार पडत असून भाजपच्या माहिम विभाग प्रमुख अक्षिता तेंडुलकर यांनी मनसेला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. तेंडुलकर यांनी मतदान केल्यावर राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. मुस्लिमांचा मताधिक्य कोणाला जात आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. हिंदूत्वाचा अजेंडा असणाऱ्या नेत्याची आपल्याला आवश्यकता आहे.
- 11:55 AM • 20 Nov 2024
Mumbai Assembly Voting Percentage: पाहा 11 वाजेपर्यंत किती टक्के मुंबईकरांनी केलंय मतदान
अणुशक्ती नगर 16.26% चेंबूर 17.44% धारावी 13.28% सायन कोळीवाडा 12.82% वडाळा 17.33% माहीम 19.66% वरळी 14.59% शिवडी 16.49% भायखळा 16.98% मलबार हिल 19.77% मुंबादेवी 14.95% कुलाबा 13.03% विलेपार्ले 19.73% चांदिवली 17.00% कुर्ला 15.52% कलिना 16.87% वांद्रे पूर्व 13.98% वांद्रे पश्चिम 17.06% गोरेगाव 19.67% वर्सोवा 15.05% अंधेरी पश्चिम 20.06% दिंडोशी 20.58% अंधेरी पूर्व 20.06% जोगेश्वरी पूर्व 21.62% मुलुंड 15.80% घाटकोपर पश्चिम 19.91% विक्रोळी 15.50% भांडुप पश्चिम 23.42% घाटकोपर पूर्व 20.49% मानखुर्द 15.38% दहिसर 21.49% कांदिवली पूर्व 19.37% मागाठाणे 17.10% मालाड पश्चिम 17.39% चारकोप 16.79% बोरिवली 16.11% - 11:47 AM • 20 Nov 2024
Mumbai Assembly Election 2024 : मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलं मतदान
राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात मतदान प्रकिया पार पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जवळपास 35 हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. अभिनेता राहुल बोस, कार्तिक आर्यनसह इतर कलाकारांनी मतदान केलं आहे.
- 11:43 AM • 20 Nov 2024
Mumbai Election Live Update: मुंबईत किती टक्के मतदान? वाचा सविस्तर माहिती
राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही निवडणुकीची धामधूम सुरु आहे. भायखळा (7.09 टक्के), कोलाबा (5.35 टक्के), धारावी (4.71 टक्के), माहिम (8.14 टक्के), मलबार हिल (8.31 टक्के), मुंबादेवी (6.34 टक्के), शिवडी (6.12 टक्के), सायन कोलिवाडा (6.52 टक्के) एव्हढं मतदान सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत झालं होतं.
- 09:04 AM • 20 Nov 2024
Mumbai Assembly Election 2024 LIVE Updates: वरळीत शिंदेंच्या शिवसैनिकाविरोधात मनसेकडून पोलिसात तक्रार
वरळीमध्ये शिंदेंच्या शिवसैनिकाविरोधात संदीप देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका असंही संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
- 08:51 AM • 20 Nov 2024
Mumbai Assembly Election News LIVE: मुंबईत सदा सरवणकर, अमित ठाकरे यांचं मतदान
दादर-माहिम मतदारसंघ यंदा तिकीट वाटपापासूनच चर्चेत आहे. मुंबईत सदा सरवणकर आणि अमित ठाकरे या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मतदान केलं आहे.
- 08:39 AM • 20 Nov 2024
Mumbai 2024 LIVE Updates: सचिन तेंडुलकरचं कुटुंबासह मतदान
- 08:07 AM • 20 Nov 2024
Mumbai Election 2024 LIVE: अभिनेता अक्षय कुमारचं मतदान, निवडणूक यंत्रणेचं कौतुक
"मतदानासाठी केलेली व्यवस्था खूप चांगली आहे. मी पाहतोय की, ज्येष्ठ नागरिकांसाठीही खूप चांगली व्यवस्था करण्यात आली आहे, स्वच्छता राखली गेली आहे. त्यामुळे सर्वांनी बाहेर पडून मतदान करावं अशी माझी इच्छा आहे..." असं अक्षय कुमार म्हणाला आहे.
#WATCH | Mumbai: Actor Akshay Kumar shows his inked finger after casting his vote for #MaharashtraAssemblyElections2024
— ANI (@ANI) November 20, 2024
He says "The arrangements here are very good as I can see that arrangements for senior citizens are very good and cleanliness has been maintained. I want… pic.twitter.com/QXpmDuBKJ7 - 07:48 AM • 20 Nov 2024
Election 2024 News LIVE: राजकुमार राव याने बजावला मतदानाचा हक्क
- 07:32 AM • 20 Nov 2024
Mumbai 2024 News LIVE: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचं मतदान, काय म्हणाले ऐका!
- 07:23 AM • 20 Nov 2024
Election 2024 News LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT