Ravindra Waiker : कीर्तिकरांनी 'ती' 2 मिनिटे घालवली अन् मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा निकाल बदलला?
Ravindra Waikar News :मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अमोल कीर्तीकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली होती. नेमकी ही मागणी का फेटाळण्यात आली? याचे कारण आता वंदना सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
Amol Kirtikar : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) 48 मतांनी विजयी ठरले होते. वायकरांच्या या अटीतटीच्या विजयानंतर मोठा वाद पेटला होता. त्यानंतर आता वायकरांच्या मेहुण्याकडे मतदान केंद्रावर फोन असल्याची बाब पोलीस चौकशीत उघड झाली आहे. त्यानंतर या संपूर्ण घटनेकडे संशयाने नजरेने पाहिले जात आहे. त्यात अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर कीर्तिकरांनी (Amol Kirtikar) निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र ही मागणी अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आली होती. मात्र ही मागणी फेटाळण्यामागचं नेमकं कारण समोर आलं आहे. (ravindra waikar vs amol kirtikar how 2 minuts can change result mumbai north west lok sabha result ruturning officer vandana suryvanshi)
ADVERTISEMENT
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील निकालावरून वाद पेटल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer)वंदना सुर्यवंशी यांनी रविवारी माध्यमांसमोर अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी वंदना सुर्यवंशी यांनी ईव्हीएम अनलॉक करण्यात ओटीपीची आवश्यकता लागत नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
हे ही वाचा : वायकरांच्या निकालाविरोधात ठाकरेंनी थोपटले दंड, सगळा प्लॅन आला समोर
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अमोल कीर्तीकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली होती. नेमकी ही मागणी का फेटाळण्यात आली? याचे कारण आता वंदना सुर्यवंशी यांनी सांगितले आहे. निकालाच्या दिवशी म्हणजेच 4 जूनला रात्री 7 वाजून 53 मिनिटांनी रवींद्र वायकर हे टपाल मतमोजणीत 48 मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले होते. हा निकाल घोषित झाल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी रात्री 8 वाजून 6 मिनिटांनी फेरमतमोजणीचा अर्ज केला होता, असे सुर्यवंशी यांनी सांगितले.
हे वाचलं का?
कीर्तिकरांचा हा अर्ज विहित वेळेत आल्यानंतर त्यांचा अर्ज नियमानुसार ग्राह्य धरण्यात आला नाही. खरं तर निकाल जाहीर केल्यानंतर विहित दोन मिनिटांमध्ये हरकत घेणे आवश्यक होतं, असे सुर्यवंशी म्हणाल्या आहेत. त्यामुळे ही दोन मिनिटे वाया गेल्यामुळेच फेरमतमोजणीचा कीर्तिकरांना अर्ज मान्य करता आला नाही.
हे ही वाचा : Vidhan Sabha Election 2024 : मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेस 105 जागा, तर...
टपाल मतांमध्येही बाद झालेल्या 111 मतांची फेरतपासणी करण्यात आली. त्यात काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आल्याचे वंदना सुर्यवंशी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT