Mumbai Tak Chavdi: उद्धव ठाकरेंचे 40 आमदार शिंदेंसोबत कसे पळाले? वरुण सरदेसाईंनी सांगितली A To Z स्टोरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Varun Sardesai Mumbai Tak Interview
Varun Sardesai Mumbai Tak Interview
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेनेत बंड कसं झालं?

point

वरुण सरदेसाईंनी सांगितलं यामागचं कारण

point

मुंबई तकच्या चावडीत वरुण सरदेसाई नेमकं काय म्हणाले?

Varun Sardesai Interview :  विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी येत्या 20 नोव्हेंबरला सुरु होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तत्पूर्वी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून युवासेनेचे (ठाकरे गट) सचिव वरुण सरदेसाई यांनीही रणशिंग फुंकलं आहे. सरदेसाई शिवसेना ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत आणि राष्ट्रवादीचे उमेदावर झिशान सिद्दीकी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु, ही तिरंगी लढत सुरु होण्याआधीच सरदेसाईंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसोबत 40 आमदार कसे पळून गेले, याबाबत मोठं विधान केलं. 

ADVERTISEMENT

मुंबई तकच्या चावडीत वरुण सरदेसाई काय म्हणाले? 

२०२२ ला विधानपरिषद निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या आधीच आमच्या वरिष्ठ नेत्यांना कल्पना होती की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे आमदार पक्ष सोडून जाणार आहेत. त्यानंतर जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर महायुतीच्या मंत्र्यांनी सांगितलं की, या दोन वर्षांच्या काळात दोनशे बैठका झाल्या. हे सर्व पूर्वनियोजीत होतं. हे त्यांच्याच मंत्र्यांनी अनेकदा विधिमंडळात सांगितलं आहे. तेव्हाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या दहा दिवस आधी राज्यसभेची निवडणूक झाली होती.

हे ही वाचा >>  ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद? 'या' बड्या नेत्यानं दिली सर्वात मोठी अपडेट

त्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे पाहिजे तेव्हढ्या आमदारांची संख्या असून सुद्धा आमचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला होता. त्यावेळीही आरोप झाले होते की, क्रॉल वोटिंग झाली. त्यावेळीच आम्हाला सर्वांना अंदाज होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होता. त्या दौऱ्यावेळी आम्हाला हे लोक असं काही करतील, याची कल्पना होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद? 'या' बड्या नेत्यानं दिली सर्वात मोठी अपडेट

त्यांनी त्यांच्या दिल्लीच्या वरिष्ठांना वचन दिलं होतं की, आम्ही त्यांचे आमदार पाडू. आम्हाला संजय पवारांना निवडून आणायचं होतं आणि संजय राऊतांना पाडायचं होतं, हे ते मानतलं बोलून गेले आहेत. जेव्हा राज्यसभेची निवडणूक होती. तेव्हा मी नागपूरला सिनेटच्या निवडणुकांसाठी गेलो होतो. त्या लोकांनी त्यावेळी मस्ती केली.  त्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं की आम्हाला संजय राऊतांना पाडायचं होतं. म्हणजे पक्षाच्या विरोधी हे लोक कट रचत होते, हे त्यांनी मान्य केलं. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT