लाइव्ह

Mumbai Lok Sabha elections Results 2024 Live : संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mumbai lok sabha election results 2024 : मुंबई उत्तर मध्य लोकसभा, मुंबई उत्तर पूर्व लोकसभा, मुंबई उत्तर लोकसभा, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा, मुंबई दक्षिण लोकसभा या सहा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे.

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार

भाजप - पीयूष गोयल
काँग्रेस- भूषण पाटील
वंचित - सोनल गोंडाणे

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार

काँग्रेस - वर्षा गायकवाड
भाजप - उज्वल निकम
वंचित - संतोष अंबुलगे

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील उमेदवार

भाजप - मिहिर कोटेचा
शिवसेना (ठाकरे गट) - संजय दीना पाटील
वंचित - दौलत खान

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार

शिवसेना (ठाकरे गट) - अमोल किर्तीकर
शिवसेना (शिंदे गट) - रविंद्र वायकर
वंचित - परमेश्वर रणशूर

ADVERTISEMENT

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार

शिवसेना (ठाकरे गट) - अरविंद सावंत 
शिवसेना (शिंदे गट)- यामिनी जाधव
वंचित - अफजल दाऊदानी

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार

शिवसेना (शिंदे गट) - राहुल शेवाळे 
शिवसेना (ठाकरे गट) - अनिल देसाई
वंचित - अबुल हसन खान

या सहा लोकसभा मतदारसंघातून कोण आघाडीवर आहे... कोण पिछाडीवर आहे... महाविकास आघाडी आणि एनडीएच्या उमेदवारांची स्थिती काय आहे... सर्व लाईव्ह अपडेट्स वाचा...

लाइव्हब्लॉग बंद

  • 08:22 PM • 04 Jun 2024

    Sangli Lok Sabha News : सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

    'देशातील जनतेचं मी अभिनंदन करतो. सत्ता स्थापनेसाठी दावा करायलाच हवा. उद्या बैठकीत इंडिया आघाडीच्या पंतप्रधानांचा चेहरा ठरवू. देशातली लोकशाही, संविधान वाचवलं पाहिजे, ही भावना आहे. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंना भाजपने कमी त्रास दिला नव्हता. आम्ही व्यक्तीविरोधात नव्हे, हुकूमशाहीच्या वृत्तीविरोधात आहोत. भाजपकडून त्रस्त असणारे सर्वजण आमच्याकडे येणार.  भाजपनं ममता बॅनर्जींना देखील त्रास दिला. माझी आणि ममता बॅनर्जींची चर्चा झाली. अमोल किर्तिकरांच्या जागेबाबत निवडणूक आयोगात चॅलेंड करू. मी इतर लोकांशी चर्चा करणार. ९ जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी बंद आहे.' असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलले. तसंच सांगलीच्या जागेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'सांगलीत आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही?, उघड दिसतंय.' 

  • 08:02 PM • 04 Jun 2024

    Lok Sabha Results 2024 Live : रवींद्र वायकरांविरोधात फक्त 48 मतांनी अमोल किर्तिकरांचा पराभव!

    मुंबई उत्तर पश्चिममधून शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर लोकसभा निवडणूक लढवत होते. तर, त्यांच्याविरूद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून अमोल किर्तिकर लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. पण फक्त 48 मताधिक्याने अमोल किर्तिकर यांचा पराभव झाला आहे.   

  • 07:24 PM • 04 Jun 2024

    Lok Sabha : 'इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत..'- देवेंद्र फडणवीस

    'पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत.
    मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो ! 

    इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.

    उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मा. मोदीजींना साथ दिली आहे.

    संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू.

    महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो!' असं ट्वीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

     

     

  • 05:36 PM • 04 Jun 2024

    Lok Sabha Results 2024 Live : मुंबईत सहापैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचा बोलबाला!

    • उत्तर मध्य मुंबईत भाजपा उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत.
    • दक्षिण मुंबईत आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी बाजी मारली आहे. त्यांच्याकडे 54 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी होती. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला.
    • दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा पराभव केला.
    • उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर पराभूत झाले आहेत. तर त्यांच्याविरूद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तिकर विजयी झाले आहेत.
    • मुंबई उत्तर पूर्व येथे शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विजयी ठरले आहेत. तर त्यांच्याविरूद्ध लढणारे मिहीर कोटेचा  पराभूत झाले आहेत.
       
  • ADVERTISEMENT

  • 04:38 PM • 04 Jun 2024

    उज्वल निकम फार कमी मतांनी आघाडीवर

    उत्तर मध्य मुंबईत भाजपा उमेदवार उज्वल निकम आणि काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे. उज्वल निकम 176 मतांनी आघाडीवर आहेत.

     

  • 04:20 PM • 04 Jun 2024

    Lok Sabha : जनतेनं भाजपकडून बदला घेतला, त्यांच्या आणखी जागा कमी होणार- संजय राऊत

    'लोकांनी मोदींना हरवलं, भाजप हरला... अयोध्येत भाजप हरली. जनतेनं मोदींना हरवलंय. 2024 मध्ये भाजपला बहुमत नाही हा मोदी-शाहांचा पराभव आहे. देशाने त्यांचा अहंकार संपवला आहे. मोदींनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्राने मोदींना रोखलं. भाजपला देशात 250 जागाही मिळाल्या नाहीत. देशात परिवर्तन होत आहे, सकारात्मक निर्णय होत आहेत. भाजपच्या आणखी जागा कमी होतील. त्यांचा आकडा 240 च्या खाली येणार. सत्तेसाठी मोदी आणि शाह आता हात जोडत आहेत. भाजपनं राज्यात फोडाफोडीचं राजकारण केलं, जनतेनं बदला घेतला.' पत्रकार परिषद घेत संजय राऊतांनी भाजपसह मोदींवर टीकास्त्र सोडले.

  • ADVERTISEMENT

  • 03:26 PM • 04 Jun 2024

    Lok Sabha Results 2024 Live : जनतेनं मंदिर-मशिदीवरून राजकारण नाकारलं- शरद पवार

    'जाती-धर्माच्या पुढे जावून रोजगार-महागाईच्या मुद्द्यावर कौल. लोकशाही मुल्यांच्या रक्षणाची भूमिका होती, त्याचाच विजय आहे. देशाचं चित्र बदललं यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका आहे. लोक आणि समर्थकांनी जे कष्ट घेतले घेतले त्याबद्दल आभारी आहे. हा निकाल परिवर्तनाला पोषक आहे. शरद पवार यांनी अशी पहिली प्रतिक्रिया दिली. सुदैवानं देशपातळीवरचं चित्र आशादायक आहे. उत्तर प्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्रात वेगळा निकाल आला. उद्या दिल्लीत बैठक होणार, त्याचा संदेश सर्वांना दिला जाईल. फक्त मंदिर-मशिदीवरून राजकारण जनतेनं नाकारलं. शेतकरी, महागाई अशा मुलभूत मुद्द्यांवर लोकांनी मतदान केलं. राज्यात विधानसभेचं चित्र बदलण्यासाठी हा निकाल बळ देणारा आहे.' महायुतीसोबत अटीतटीच्या लढाईनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेत हे म्हणाले.

  • 02:39 PM • 04 Jun 2024

    Mumbai Lok Sabha : दक्षिण-मध्य मुंबईत ठाकरे गटाने उधळला गुलाल, अनिल देसाईंचा विजय!

    दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाने पहिला विजय मिळवला आहे. ठाकरेंचे उमेदवार अनिल देसाई विजयी ठरले आहेत. तर, त्यांच्याविरूद्ध लढणारे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव झाला आहे. 

  • 12:39 PM • 04 Jun 2024

    Mumbai Lok Sabha Results 2024 Live : मुंबईत 6 जागांवर कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? 

    • उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल हे 146104 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे भूषण पाटील हे पिछाडीवर आहेत.
    • उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर 3964 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर पिछाडीवर आहेत.
    • उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे उज्वल निकम हे 54289 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी हा धक्का आहे.
    • उत्तर पूर्व मुंबई म्हणजे ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे संजय दीना पाटील हे 23628 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे मिहीर कोटेचा पिछाडीवर आहेत.
    • दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई 46521 मतांनी आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत.
    • दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत 58995 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव पिछाडीवर आहेत.
  • 12:18 PM • 04 Jun 2024

    Mumbai Lok Sabha Results 2024 Live : दक्षिण मुंबईत अरविंद सावंत 20 हजार मतांनी आघाडीवर!

    दक्षिण मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना (UBT) असा सामना चर्चेचा विषय ठरतोय. इथे कोणाला सर्वात जास्त मताधिक्य मिळेल हे सांगणं कठीण आहे. पण सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर, आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आघाडीवर दिसत आहेत.  त्यांना 87,598 मतं मिळाली आहेत. त्यांच्याविरूद्ध शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना 57,692 मतं मिळाली असून 20 हजार मतांनी त्या पिछाडीवर आहेत.

  • 10:54 AM • 04 Jun 2024

    Lok Sabha Election : महाराष्ट्रात महाविकास आघाडी तर देशात इंडिया आघाडी- संजय राऊत

    'संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या देशाचं चित्र स्पष्ट होईल. पण आता जो कल दिसतोय... नंदुरबारला काँग्रेसचे तरूण उमेदवार गोवल पाडवी ते एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्यांनी पुढे आहेत. आता हा 1 लाखाचा मताधिक्य कोणी करू शकेल? मला अजिबात असं वाटत नाही. विदर्भ-मराठवाड्यात मविआचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत. आता मी एवढंच सांगेन महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी ही पुढे राहील आणि 4 वाजता चित्र स्पष्ट होईल. ' असं स्पष्ट वक्तव्य संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलं.  

  • 10:15 AM • 04 Jun 2024

    Mumbai Lok Sabha : उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर आघाडीवर!

    उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना (UBT) असा सामना चांगलाच रंगला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर रिंगणात आहेत तर, दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर निवडणूक मैदानात आहेत. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवाक झाली आहे. यासर्वात मिळालेल्या माहितीनुसार,  उत्तर पश्चिम मुंबईत रवींद्र वायकर आघाडीवर आहेत.

  • 09:22 AM • 04 Jun 2024

    Mumbai Lok Sabha Results 2024 Live : दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे आघाडीवर!

    दक्षिण मध्य मुंबईत यंदा शिवसेना vs शिवसेना (UBT) असा सामना आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे रिंगणात आहेत, दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणूक मैदानात आहेत. मतमोजणी सुरू असताना दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर आहेत.

  • 08:57 AM • 04 Jun 2024

    Mumbai Lok Sabha Results 2024 Live : ईशान्य मुंबईत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा आघाडीवर!


    ईशान्य मुंबईत भाजपा विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना आहे. भाजपाने मिहिर कोटेचा यांना तिकीट दिलं आहे तर मविआकडून संजय दीना पाटील रिंगणात आहे. अशा परिस्थितीत मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यानुसार भाजप उमेदवार मिहीर कोटेचा आघाडीवर आहेत.


     

  • 08:33 AM • 04 Jun 2024

    Mumbai Lok Sabha Results 2024 Live : उत्तर मध्य मुंबईतून भाजप उमेदवार उज्वल निकम आघाडीवर! 

    उत्तर मध्य मुंबईत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. भाजपाने उज्वल निकम यांना तिकीट दिलय तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड रिंगणात आहेत. आज 4 जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीला सुरूवात झाली आहे. अशात उत्तर मध्य मुंबईतून भाजप उमेदवार उज्वल निकम आघाडीवर दिसत आहेत.

  • 08:10 AM • 04 Jun 2024

    Mumbai Lok sabha Election : मुंबई उत्तरमधून पीयूष गोयल आघाडीवर!

    उत्तर मुंबईत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना आहे. भाजपाने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना तिकीट दिलय तर काँग्रेसकडून भूषण पाटील मैदानात आहेत. आज 4 जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीला सुरूवात झाली आहे. अशात उत्तर मुंबईतून पीयूष गोयल आघाडीवर दिसत आहेत.


     

  • 07:54 AM • 04 Jun 2024

    Lok Sabha Election 2024: मुंबई ईशान्य मतदारसंघात एकूण 4432 पोस्टल बॅलेट मतदान

    मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. मुंबईकर कोणाला कौल देणार महायुतीला की, महाविकास आघाडीला ते थोड्याचवेळात स्पष्ट होईल. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मुंबई ईशान्य मतदारसंघात एकूण 4432 पोस्टल बॅलेट मतदान झाले. मतमोजणी अजून सुरू व्हायची आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT