Mumbai rains : नवरा-बायको बाहेर पडले अन् पाण्यात अडकली कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

car was stuck in the waterlogging, Mumbai : पहिल्याच पावसांने मुंबईची तारांबळ उडाली. अनेक लोकल रद्द झाल्या, तर काही ठिकाणी सबवे मध्ये पाणी भरले. मालाडमध्ये मोठी दुर्घटना टळली.

social share
google news

Mumbai Rains Viral News : नालेसफाईचे मोठंमोठे दावे केले गेले असताना पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. संततधार पावसाने मुंबईतील अनेक भागात रस्त्यांचे कालवे झाले, तर भुयारी मार्ग पाण्याने तुडूंब भरले. काही ठिकाणी सबवे मध्ये गाड्या अडकल्या. मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. (a car was stuck in the waterlogging under the Sainath Subway in Malad, A couple rescued by police)

ADVERTISEMENT

शनिवारपासून (7 जुलै) पावसाने जोर पकडला असून, मुंबई आणि उपनगरांमध्ये संततधार कायम आहे. पावसाची मुसळधार कायम राहिल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले.

हेही वाचा >> लोकल पकडायला गेली अन् दोन्ही पाय..., नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना 

मुंबईतील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी तुंबले होते. त्यामुळे या पाण्यातूनच वाहनधारकांना कसरत करावी लागली. दरम्यान, मालाड भागातील साईनाथ सबवे पाण्याने भरला होता. 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या पाण्यात एक कार अडकली. या कारमध्ये पती-पत्नी होते. कार पाण्यात अडकल्याने, हे दाम्पत्यही कारमध्ये फसले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने धाव घेत दोघांना बाहेर काढले. 

कार मालाड सबवेतील पाण्यातच 

मालाडमधील साईनाथ सबवेमध्ये मोठ्या पाणी खूप साचल्याने कार बाहेर काढणे अवघड झाले. त्यामुळे पोलिसांनी दाम्पत्यालाच बाहेर काढले. दरम्यान, हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. 

हेही वाचा >> पुणे हादरले! इनोव्हाने उडवले, पोलिसाचा जागीच मृत्यू

चालकाला वाचवण्यात यश

मालाड सबवेमध्ये एक कार अडकली होती. पाण्याचा अंदाज न घेता चालकाने कार पाण्यात टाकली. मात्र, त्यानंतर कार पाण्यात अडकली. परिसरातील लोकांनी प्रसंगावधान राखत चालकाला कारमधून बाहेर काढले. सबवे मधील पाणी कमी झाल्यानंतर ही कार बाहेर काढण्यात आली. 

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT