सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला, कट्टर पंथीयांच्या निशाण्यावर का आहेत रश्दी?
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करतोय. भारताला स्वातंत्र्य मिळालं ते १९४७ मध्ये. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दोन महिने आधी १९ जून १९४७ ला सलमान रश्दी यांचा जन्म मुंबईत झाला. सध्या ते जगविख्यात लेखक म्हणून ओळखले जातात. मिडनाईट चिल्ड्रन हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. त्यांच्या याच पुस्तकाला बुकर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं […]
ADVERTISEMENT
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करतोय. भारताला स्वातंत्र्य मिळालं ते १९४७ मध्ये. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दोन महिने आधी १९ जून १९४७ ला सलमान रश्दी यांचा जन्म मुंबईत झाला. सध्या ते जगविख्यात लेखक म्हणून ओळखले जातात. मिडनाईट चिल्ड्रन हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. त्यांच्या याच पुस्तकाला बुकर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला
सलमान रश्दी हे पुन्हा चर्चेत आले आहेत कारण त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाला. बुकर पुरस्कार मिळवणारे लेखक म्हणून ते सगळ्या जगाला परिचित आहेत. १९८१ मध्ये त्यांना पहिलं बुकर अवॉर्ड मिळालं त्यानंतर सलमान रश्दी यांना बुक ऑफ द बुकर्स असा किताब देऊनही गौरवण्यात आलं.
सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये चाकू हल्ला झाला आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या ते मृत्यूशी झुंज देत आहेत असंही काही मीडिया रिपोर्ट्सवरून कळतं आहे. मात्र जिवे मारण्याची धमकी त्यांना यााधीही मिळाली होती.
हे वाचलं का?
द सॅटेनिक व्हर्सेस हे पुस्तक सलमान रश्दींचं वादग्रस्त पुस्तक ठरलं
द सॅटेनिक व्हर्सेस हे पुस्तक सलमान रश्दी यांनी लिहिलं. या पुस्तकामुळे त्यांच्याविषयी असे वाद निर्माण झाले जे वाद अजूनही त्यांच्या मानगुटीवर बसले आहेत. १९८० च्या दशकात त्यांना या पुस्तकामुळे पहिल्यांदा ठार मारलं जाण्याची धमकी इराणहून मिळाली होती. हे पुस्तक ईश्वर निंदा करणारं आणि इस्लाम विरोधी आहे असा कट्टरपंथियांचा आक्षेप आहे. १९८८ मध्ये या पुस्तकावर इराणमध्ये बंदी घालण्यात आली मात्र कट्टर पंथियांच्या निशाण्यावर सलमान रश्दी तेव्हापासूनच आहेत.
इराणमधून सलमान रश्दींविरोधात काय फतवा निघाला होता?
द सॅटेनिक व्हर्सेस हे पुस्तक लिहिल्यानंतर जो वाद सलमान रश्दींविरोधात झाला त्यानंतर इराणहून त्यांच्या विरोधात फतवा निघाला. हा फतवा साधासुधा नव्हता. सलमान रश्दी यांना जो ठार मारेल त्याला ३० लाख डॉलर्सचं बक्षीस दिलं जाईल असा फतवा होता. इराण गणतंत्राचे सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला खुमैनी यांनी सलमान रश्दींच्या विरोधात हा फतवा काढला होता. मात्र नंतर इराण सरकारने हा त्यांचा व्यक्तिगत मामला आहे असं म्हणत हात झटकले होते. यानंतर २०१२ मध्येही सलमान रश्दींना ठार करण्यासाठी इराणच्या एका धार्मिक संघटनेने फतवा काढला. या फतव्यात सलमान रश्दींना ठार मारणाऱ्यास ३३ लाख डॉलर्सचं बक्षीस दिलं जाई असं जाहीर करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
द सॅटेनिक व्हर्सेस हे सलमान रश्दी यांचं पुस्तक भारतात बॅन
द सॅटेनिक व्हर्सेस हे सलमान रश्दी यांचं पुस्तक भारतात बॅनकरण्यात आलं आहे. १९८९ मध्ये जेव्हा इराणने सलमान रश्दींच्या विरोधात फतवा काढला तेव्हा मुंबईत एक दंगल उसळली त्यात १२ लोक मारले गेले. इंग्लंडच्या रस्त्यांवर सलमान रश्दींचे पुतळे जाळण्यात आले. एवढंच नाही तर द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकाच्या प्रतिही जाळण्यात आल्या. यानंतर सुमारे दहा वर्षांहून अधिक काळ सलमान रश्दी सेफ हाऊसमध्ये राहात होते. हळूहळू त्यांनी सामान्य जनजीवन सुरू केलं. ते दहा वर्षांनी पार्ट्यांमध्ये वगैरे दिसू लागले. मात्र त्यांनी या कालावधीत लेखन बंद केलं नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT