तुमच्याही काळजाचा होईल थरकाप, चक्क उकळत्या दुधाने घातली बाळाला अंघोळ!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Baby Bath With Hot Milk Viral Video : आताच्या काळात जग कुठून कुठे पोहोचलं आहे. तंत्रज्ञानाने संपूर्ण जगाला साकडं घातलेलं आहे. अशा स्थितीतही भारतातील काही भागांमध्ये जुनाट विचारसरणी आणि अंधश्रद्धा आजही कायम आहे. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Baby Bath With Hot Milk Viral Video From Uttar Pradesh Ballia)

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्याच्या एका गावातील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये धार्मिक विधीचा भाग म्हणून एका पुजारीकडून एका मुलाला उकळत्या दुधाने आंघोळ घातली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही विचित्र घटना जिल्ह्यातील श्रवणपूर गावातील आहे जिथे धार्मिक शहर वाराणसीच्या एका पुजार्‍याने लहान मुलासोबत असे अमानवी कृत्य केले.

शरद पवारांनी डाव टाकला, देवेंद्र फडणवीस-अजित पवार सापडले ‘ट्रॅप’मध्ये?

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाराणसीचे पंडित अनिल यादव असे पुजाऱ्याचे नाव आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पुजारी बाळाला गुडघ्यावर बसवतो आणि मातीच्या भांड्यात उकळणाऱ्या दुधात कापड बुडवून मुलाच्या चेहऱ्यावर ठेवतो. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बाळाला पुजाऱ्याच्या या कृत्याचा त्रास होत आहे आणि तो जोरजोरात टाहो फोडत आहे.

हे वाचलं का?

बाळ वेदनेने टाहो फोडूनही पुजाऱ्याच्या विधी सुरूच!

बाळ वेदनेने ओरडत असतानाही पूजाऱ्याने मात्र विधी चालू ठेवलेल्या दिसत आहेत. ही घटना हजारो लोकांसमोर होत असतानाही सर्वांनीच मौन धरलं आहे. कुणालाही पाझर फुटला नाही हे फार दु:खद होतं. हा विचित्र विधी बलियाच्या श्रवणपूर गावात काशीदास बाबा पूजनाचा भाग होता आणि यादव समाजात सामान्य आहे.

‘एकनाथ शिंदे माझे ‘बॉस’, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण ठरवणार?

मुले वेदनादायक आणि कधीकधी घातक अंधश्रद्धेला बळी पडणे ही अलीकडच्या काळात एक सामान्य घटना बनली आहे. ही खास पूजा पंडित वाराणसीचे पंडीत अनिल यादव यांनी केली. यामुळे घरात सुख-शांती येते व कुटूंबावरील संकट टळते, अशी इथल्या लोकांची भावना आहे. मात्र या पुजेवेळी लहान मुलासोबत घडलेल्या कृत्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT