अरूण राठोडने दिलेला तो नंबर कुणाचा? चित्रा वाघ यांचा सवाल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ आता आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्या दिवशी अरूण राठोडने पुणे कंट्रोल रूमला कबुली जवाब दिला होता. त्यानंतर कंट्रोल रूमवर असलेल्या महिलेने दुसरा नंबर देऊन त्या नंबरवर कबुली जबाब द्यायला सांगितला हा नंबर कुणाचा होता? त्या नंबरवर कुणाकडे जबाब दिला? असा सवाल […]
ADVERTISEMENT
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ आता आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्या दिवशी अरूण राठोडने पुणे कंट्रोल रूमला कबुली जवाब दिला होता. त्यानंतर कंट्रोल रूमवर असलेल्या महिलेने दुसरा नंबर देऊन त्या नंबरवर कबुली जबाब द्यायला सांगितला हा नंबर कुणाचा होता? त्या नंबरवर कुणाकडे जबाब दिला? असा सवाल करतानाच या नंबरची चौकशी करण्यात यावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी आणखी एक आरोप केला. 9146870100 या क्रमांकावर संपर्क साधून कबुली देण्यास सांगितलं होतं. हा नंबर कुणाचा आहे असा सवाल त्यांनी आज उपस्थित केला.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाल्या चित्रा वाघ?
आज नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ या अत्यंत आक्रमक झाल्या होत्या. तुम्हाला मी जो नंबर दिला आहे तो कुणाचा? या क्रमांकावर संपर्क साधून कबुली द्यायाला सांगितलं गेलं. त्यावेळी या नंबरवरून एक कॉन्फरन्स कॉलही लावण्यात आला. हा कॉल कुणाला लावण्यात आला होता त्या व्यक्तीकडे पुन्हा एकदा सगळी कबुली का देण्यात आली? हा नंबर पोलीस आयुक्तांचा आहे की पोलीस महासंचालकांचा? पुणे कंट्रोल रूमच्या कोणत्या अधिकाऱ्याने हा नंबर दिला? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
हे वाचलं का?
हे सरकार बलात्काऱ्यांना पाठिशी घालतं आहे. पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात अनेक योगायोग समोर येत आहेत. कारण राज्यातील सत्ताधारी पक्षातले सगळे नेते बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी एकत्र झाले आहेत. अरूण राठोडची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलं. यवतमाळच्या ज्या रूग्णालयात गर्भपात झाल्याचं प्रकरण समोर आलं तिथला डॉक्टर आई आजारी झाल्याने सुट्टीवर गेला. या सरकारने व्याभिचाराचे उदात्तीकरण सुरू केलं आहे. आता अधिवेशन सुरू होतं आहे. विरोधक या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरणार आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली तर मला आश्चर्य वाटणार नाही असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
आज शरद पवारांची आठवण होते आहे
ADVERTISEMENT
शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. माझे पती किशोर वाघ यांच्यावर आज गुन्हा दाखल झाला आहे त्यावेळी मला त्यांची आठवण होते आहे. माझ्या पती विरोधात पहिल्यांदा आरोप झाला त्यावेळी मला त्यांनी बोलवून घेतलं. संपूर्ण प्रकरण जाणून घेतलं. तक्रारीची कॉपी वाचली त्यावेळी ते मला म्हणाले की तुझा नवरा या कशातच नाही. त्यानंतर माझ्या पतीविरोधात केस उभी राहिली. किशोर वाघ हे माझे पती आहेत म्हणून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे. पूजा चव्हाणचं प्रकरण मी लावून धरल्यानेच हे होतं आहे असंही चित्रा वाघ म्हणाल्या. तसंच या सगळ्या गोष्टी केल्या तरीही मी गप्प बसणार नाही आवाज उठवणारच असंही त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT