सुकेश चंद्रशेखर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आयुष्यात कधी व कसा आला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक आघाडीची आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून आपण ओळखतो. एकीकडे ही अभिनेत्री आणि दुसरीकडे कुख्यात ठग सुकेश चंद्रशेखर. हे दोघे एकमेकांसाठी बनले आहेत अशी कल्पनाही कुणी केली नसती. मात्र जॅकलीन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्याबाबत अफवांचं पीक आलं होतं.

ADVERTISEMENT

अफवा ही होती की जॅकलीन तिच्या श्रीमंत बॉयफ्रेंडसोबत शिफ्ट होणार आहे. त्यासाठी ती समुद्रासमोर असलेला एक बंगला शोधते आहे. काही महिन्यांनी तिचा बॉयफ्रेंड तिहार जेलमध्ये गेला. तर जॅकलिनला मनी लॉड्रींग प्रकरणात ईडीसमोर हजर रहावं लागलं. या चौकशीच्या फेऱ्यात ती अडकली आहे.

सुकेश जॅकलिनच्या आयुष्यात कसा आला?

हे वाचलं का?

डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसोबत संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र जॅकलीनने त्याला भाव दिला नाही. त्यानंतर सुकेश चंद्रशेखरने डोकं लावलं. त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ऑफिसमधला नंबर घेऊन त्याने जॅकलिनच्या एका निकटवर्तीयाशी संपर्क साधला. त्या मार्गे त्याने जॅकलिनच्या संपर्कात येण्याचा पर्याय निवडला.

जॅकलिनसचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिलला त्याने संपर्क साधला होता. जॅकलिनचं इंस्टाग्राम पेज पाहिलं तर शान आणि तिची चांगली दोस्ती आहे हे लक्षात येतं. शानने एक चांगला मित्र म्हणून जॅकलिनला सांगितलं की त्याला एका व्हिआयपी नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवरून ज्याने फोन केला होता त्या कॉलरला तुझ्याशी बोलायचं आहे.

ADVERTISEMENT

हा कॉल व्हीआयपी नंबरवरून आला होता. या फोनवरवरून बोलणाऱ्याने त्याचं नाव शेखर रत्न वेला असं सांगितलं होतं आणि सरकारी कार्यालयातून बोलत आहोत असंही सांगितलं होतं. हा शेखर रत्न वेला म्हणजे दुसरा तिसार कुणी नसून सुकेश चंद्रशेखरच होता.

ADVERTISEMENT

पर्शियन मांजरी, 52 लाखांचा घोडा आणि बरंच काही…; ‘जॅकलिन’वर महागड्या भेटवस्तूंची उधळण

यानंतर जॅकलिन आणि शेखर (सुकेश) यांच्यात बोलणं सुरू झालं. त्यानंतर हे बोलणं वाढलं. या बोलण्यातून सुकेशने जॅकलिनला किती थापा मारल्या माहित नाही. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याशी माझं नातं आहे अशी थाप सुकेशने मारली होती. त्यानंतर मी सन टीव्हीचा मालक आहे असंही त्याने जॅकलिनला सांगितलं होतं. मात्र त्याने या सगळ्या थापा मारल्या होत्या.

जॅकलिन फर्नांडिसला सुकेश राजकुमारीसारखं वागवत होता

जॅकलिन आणि शेखऱ उर्फ सुकेश चंद्रशेखर जवळ येत गेले तसे तो जॅकलिनला अनेक महागडी गिफ्ट देऊ लागला. या भेटींची किंमत कोट्यवधी रूपये होते. सुकेशने आत्तापर्यंत जॅकलिनला सात कोटी रूपयांची गिफ्ट दिली आहेत असा अंदाज वर्तवला जातो आहे.

या भेटवस्तूंमध्ये बिर्किन बॅग, Chanel, Gucci, YSL या ब्रांडचे कपडे, हर्मीस ब्रांडच्या बांगड्या, टिफनी ब्रांडचं ब्रेसलेट, अंगठ्या, झुमके यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर रोलेक्स, रोजर डुबईस, फ्रेंक मुलर या ब्रांडची घड्याळं देऊनही जॅकलिनचं मन जिंकण्याचा प्रयत्न सुकेशने केला. फक्त जॅकलिनलाच नाही तर तिच्या कुटुंबीयांनाही गिफ्ट देण्यात आली. तिच्या आईला एक पोर्श आणि मासेराती कार सुकेशने भेट म्ङणून दिली. जॅकलिनने मात्र आपल्या कुटुंबीयांनी गिफ्ट घेतली नसल्याचं म्हटलं आहे.

200 कोटींच्या खंडणीतील आरोपीसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसचा सेल्फी, चर्चांना उधाण

जॅकलिनच्या बहिणीला सुकेशने अमेरिकेत 1लाख 80 हजार डॉलर्सची मदत केली. तर तिच्या ऑस्ट्रेलियातल्या भावाला 50 हजार डॉलर्स पाठवले होते. जॅकलिनला मांजरी आवडतात हे समजल्यावर तिच्यासाठी सुकेशने एक नाही तर चार मांजरी खरेदी केल्या. तो तिला एखाद्या राजकुमारीसारखं वागवत असे.

सुकेश एवढा श्रीमंत कसा झाला?

जर एखादी व्यक्ती जन्माने श्रीमंत नसेल तर ती व्यक्ती श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करते. अनेक आडमार्गाचे प्रयत्न सुकेशनेही केले त्यामुळेच त्याला अटक झाली. सुकेशला अटक झाली पण तो काही साधासुधा कैदी नव्हता. तुरुंगात त्याने आपलं साम्राज्य उभं केलं. खंडणी वसुलीचं काम सुकेश तुरुंगात राहून करत होता. इथे एंट्री होते ती रॅनबॅक्सीचा माजी प्रमोटर शिविंदर सिंह याची. शिविंदर फसवणूक प्रकरणात आणि इतर प्रकरणांमध्ये तुरुंगात असल्याचं कळलं.

शिविंदरला तुरुंगातून बाहेर पडायचं होतं आणि त्याच्या पत्नीला लवकर त्याला घरी आलेलं बघायचं होतं. याचाच फायदा सुकेश चंद्रशेखरने उचलला. सुकेशने 15 जूनला शिविंदरच्या पत्नीला म्हणजेच आदिती सिंहला फोन केला. त्यावेळी मी सरकारी अधिकारी बोलत असल्याचं त्याने सांगितलं. तसंच आदिती सिंहला तो हे पटवून देत होता की मी शिविंदरला तुरुंगातून बाहेर काढू शकतो.

जॅकलिन फर्नांडीसला ‘ईडी’ने मुंबई विमानतळावरच रोखलं; थोड्या वेळाने दिली जाण्याची परवानगी

सुकेश व्हॉईस मोड्युलेशन सॉफ्टवेअरचा उपयोग करून स्वतःला कधी कायदेशीर सचिव तर कधी गृह सचिव असल्याचं सांगत होता. एवढंच नाही तर कधीकधी मी गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाचा प्रतिनिधी बोलतो आहे असंही सांगत होता. आदिती सिंहला तो या नावांनी फोन करत होता. त्याने एक दिवस आदितीकडे पैशांची मागणी केली. पक्षासाठी ही देणगी तुम्हाला द्यायची आहे असं सुकेशने आदितीला सांगितलं. आदितीकडून सुकेशने या बहाण्याने कोट्यवधी रूपये घेतले.

आदितीला वाटलं की तिचा नवरा तुरुंगाबाहेर येईल. त्यानंतर आपला व्यवसाय परत मार्गावर येईल असंही तिला वाटत होतं. मात्र एकटा सुकेशच होता ज्याचा वसुलीचा व्यवसाय तेजीत सुरू होता. ईडीला संशय आहे की सुकेशने आदितीकडून 200 कोटी रूपये वसूल केले असावेत.

तुरुंग म्हणजे सुकेशचं दुसरं घरच

सुकेश तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याने जॅकलिन आणि नोरा फतेही या दोघींशी जवळीक वाढवत होता. त्यावेळी पोलीसही त्यांचं कर्तव्य करत होतेच. सुकेशला पुन्हा अटक झाली आणि ईडीने त्याची चौकशी सुरू केली. सुकेशने वयाच्या 17 व्या वर्षापासून लोकांना गंडा घालण्यास सुरूवात केली आहे. तो आता 32 वर्षांचा आहे. तुरुंग ही काही त्याच्यासाठी नवी गोष्ट नाही. गेल्यावेळी जेव्हा तो तुरुंगात आला होता तेव्हा 25 ते 30 कोटींची लाच देऊन त्याने एक संपूर्ण बराक आपल्यासाठी सज्ज करून घेतली होती. सुकेश चंद्रशेखऱ आता पुन्हा तुरुंगात आहे.

20 ऑक्टोबरला ईडीने जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर या दोघांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान काय काय झालं जाणून घेऊ.

तुम्ही दोघांनी तुमची नावं सांगा

माझं नाव जॅकलिन फर्नांडिस आहे

माझं नाव सुकेश चंद्रशेखर आहे.

तुम्ही दोघे भेटला आहात का? तुमच्यात काही चर्चा झाली आहे का?

जॅकलिन- होय आम्ही फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत फोनवर चर्चा केली. तसंच जून महिन्यात आम्ही चेन्नईला दोनवेळा भेटलो होतो.

सुकेश चंद्रशेखऱ- होय आम्ही जानेवारी ते ऑगस्ट 2021 या कालावधीत फोनवर बोललो आहे आणि जून महिन्यात चेन्नईला दोनदा भेटलो आहोत.

सुकेशने जॅकलिनला काय ओळख सांगितली?

जॅकलिन-सुकेशने मी सन टिव्हीचा मालक शेखर रत्न वेला बोलतो आहे असं फोनवर सांगितलं होतं तसंच मी जयललिता यांचा भाचा आहे असंही सांगितलं होतं.

सुकेश-मी आपली ओळख शेखऱ म्हणून करून दिली होती

तुम्ही दोघे एकमेकांशी पहिल्यांदा कधी बोललात?

जॅकलिन- जानेवारी 2021 मध्ये पहिल्यांदा बोललो

सुकेश-डिसेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा बोललो

सुकेशने जॅकलिनच्या बहिणीसाठी कार घेतली होती का?

जॅकलिन-नाही सुकेशने माझ्या बहिणीसाठी कार खरेदी केली नाही

सुकेश- माझ्या लक्षात येत नाहीये.

सुकेशने जॅकलिनच्या आई वडिलांसाठी कार घेतली का?

जॅकलिन-नाही

सुकेश-माझ्या लक्षात नाही

सुकेशने जॅकलिनच्या बहिणीच्या अकाऊंटमध्ये किती पैसे पाठवले होते?

जॅकलिन-150000 अमेरिकी डॉलर्स

सुकेश-लक्षात नाही

सुकेशने जॅकलिनच्या भावाच्या अकाऊंटमध्ये किती पैसे पाठवले होते?

जॅकलिन-15 लाख

सुकेश-माझ्या लक्षात नाही

तुम्ही दोघे कोणत्या APP च्या माध्यमातून बातचीत करत होतात?

जॅकलिन-Whats App कॉल आणि व्हीडिओ कॉल

सुकेश- Whats App

तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी महागडी गिफ्ट घेतली का?

जॅकलिन-मला Gucci, Chanel, Saint Laurent, Dior या कंपन्यांच्या चार बॅगा मिळाल्या होत्या. Louis Vuitton, Louboutin चे बुटाचे तीन जोड, Gucci चे कपडे, चार मांजरी, एक मिनी कूपर कार, दोन डायमंड इअर रिंग्ज, डायमंड ब्रेसलेट गिफ्ट मिळालं.

सुकेश-माझ्या लक्षात नाही

जॅकलिनच्या माध्यमातून अद्वैता काला यांना 15 लाख रूपये दिले का?

जॅकलिन-होय

सुकेश-होय

या सगळ्या चौकशीत काय घडलं ते आम्ही तुम्हाला सांगितलं. आता येणाऱ्या काळात हे स्पष्ट होईल की ईडीला जॅकलिनच्या विरोधात काही आक्षेपार्ह पुरावे मिळाले आहेत की नाही. सुकेश जॅकलिनलाच नाही तर इतर अभिनेत्रींनाही त्याच्या जाळ्यात ओढत होता. त्या अभिनेत्री कोण हे आपल्याला अजून समजायचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT