Pradeep Sharma: मोठी बातमी… एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक
मुंबई: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना अखेर अटक करण्यात आली आहे. याआधी आज (17 जून) सकाळी प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकण्यात आला होता. ज्यानंतर अँटेलिया संशयित कार स्फोटकं (antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) प्रकरणी प्रदीप शर्मा यांची चौकशी […]
ADVERTISEMENT
मुंबई: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना अखेर अटक करण्यात आली आहे. याआधी आज (17 जून) सकाळी प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकण्यात आला होता. ज्यानंतर अँटेलिया संशयित कार स्फोटकं (antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) प्रकरणी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली गेली. तब्बल सहा तासाच्या चौकशीनंतर ही अटक करण्यात आली आहे.
अँटेलिया संशयित कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांनी हा संपूर्ण कट रचला असल्याचं आता सांगितलं जात आहे.
प्रदीप शर्मा यांच्या या अटकेनंतर आता या अँटेलिया प्रकरणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. तसंच आता याबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
कारण, पोलीस दलातील नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर प्रदीप शर्मा हे सक्रीय राजकारणात सहभागी झाले होते. त्यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती.
Antilia bomb scare Case: मोठी बातमी… एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा
ADVERTISEMENT
दरम्यान, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज सुरुवातीला प्रदीप शर्मा यांच्या घराची कसून झडती घेतली. त्यानंतर आता त्यांना अटक करुन त्यांची जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. थोड्याच वेळात प्रदीप शर्मा यांना सत्र न्यायालयात सादर केलं जाणार आहे.
ADVERTISEMENT
प्रदीप शर्मा यांना सचिन वाझे याचे मार्गदर्शक देखील म्हटलं जातं. त्यामुळे आता अँटेलिया संशयित कार प्रकरणी आणि हिरेन हत्येप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. एनआयएची एक टीम प्रदीप शर्मा यांच्या घरी सकाळी-सकाळीच पोहोचली होती.
Antilia Case: आता NIA कडून वाझेंचे एकेकाळचे बॉस प्रदीप शर्मांची चौकशी सुरू
दोन आरोपींच्या अटकेनंतर आता NIA ने केल प्रदीप शर्मांनाही अटक
दोनच दिवसांपूर्वी अँटेलिया संशयित कार प्रकरणी NIA ने दोन जणांना अटक केली होती. यापैकी एका आरोपीला लातूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. अटक केलेल्या आरोपींचं नाव संतोष शेलार आणि आनंद जाधव असं आहे.
यापैकी संतोष शेलार याची प्रदीप शर्मा यांच्यासोबत मैत्री असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळेच या दोन आरोपींच्या अटकेनंतर NIA च्या रडावर प्रदीप शर्मा हे देखील आले होते. अखेर आता त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.
NIA कडून याआधीही करण्यात आली होती प्रदीप शर्मांची चौकशी
दरम्यान, 7 एप्रिल रोजी देखील NIA कडून प्रदीम शर्मा यांची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना चौकशीसाठी मुंबईतील NIA कार्यालयात बोलविण्यात आलं होतं. यावेळी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती.
कारण एटीएसने एनआयएला अशी माहिती दिली होती की, मनसुख हिरेनचा मोबाईल अंधेरीला येईपर्यंत सुरू होता त्यानंतर बंद झाला. अंधेरी पूर्व भागात हा मोबाईल बंद झाला. प्रदीप शर्मा हे देखील अंधेरी पूर्व भागातच वास्तव्य करतात.
Antilia bomb scare case: अँटेलिया प्रकरणात NIA कडून दोघांना अटक, लातूरमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
कोण आहेत प्रदीप शर्मा?
प्रदीप शर्मा हे 1983 च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी धडाकेबाज कामगिरी करत अंडरवर्ल्डमधील अनेक गुडांचा खात्मा केला होता. आतापर्यंत त्यांच्या नावावर 113 एन्काऊंटर आहेत. पण लखनभैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. दरम्यान, याप्रकरणी त्यांची सुटका झाल्यानंतर ते पुन्हा एकदा पोलीस दलात दाखल झाले होते.
दरम्यान, आपल्या नोकरीचे आठ महिने शिल्लक असताना प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला होता. 2019 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत नालासोपारा मतदार संघातून क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.
शर्मा यांचं शेवटचं पोस्टिंग ठाण्यातील खंडणी विरोधी विभागात होतं. त्यावेळी ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग होते. 90 च्या दशकात प्रदीप शर्मा हे सचिन वाझेंचें बॉस होते. त्यामुळे आता हे सगळं कनेक्शन लक्षात घेऊन प्रदीप शर्मा यांचीही चौकशी केली जात आहे.
ADVERTISEMENT