Bhushan Desai: ‘एक चूक महागात पडू शकते’, भाजप नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bhushan desai news today : मुंबई: शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांचा शिवसेनेतील प्रवेश उद्धव ठाकरेंना झटका मानला जात आहे. दरम्यान, भूषण देसाईंच्या शिवसेनेतील प्रवेशाला भाजपने विरोध केला आहे. भाजपच्या गोरेगाव उपाध्यक्षांनी थेट शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंना सूचना वजा इशारा पत्रातून दिला आहे. (BJP Opposes to Bhushan Desai, write letter to Eknath Shinde)

ADVERTISEMENT

सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांचा प्रवेश ठाकरे गटासाठी धक्का मानला जात असतानाच दुसरीकडे भाजपने मात्र त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाला विरोध केला आहे. गोरेगाव भाजपच्या नेत्याने मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विरोध दर्शवला आहे.

Bhushan Desai : ‘मुलाचं शिवसेनेत कोणतचं काम नाही…’, सुभाष देसाई प्रचंड दुखावले

हे वाचलं का?

भूषण देसाईंच्या शिवसेना प्रवेशाला भाजपचा विरोध, एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या पत्रात काय?

भाजपचे गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी विरोध असण्यामागची भूमिका मांडली असून, चूक महागात पडू शकते, असा इशारा वजा सल्लाही दिला आहे.

संदीप जाधव यांनी पत्रात म्हटलं आहे की, “मी भाजपा गोरेगावचा विधानसभा उपाध्यक्ष आहे. एक छोटा कार्यकर्ता आहे. आपणास कोणती गोष्ट सूचवावी एवढी माझी राजकीय उंची नाही, पण नाईइलाजास्तव हे पत्र लिहित आहे. आत्ताच भूषण सुभाष देसाई यांच्या प्रवेशाची बातमी टीव्ही चॅनेलवर बघितली.”

ADVERTISEMENT

पुढे संदीप जाधव म्हणाले, “आम्ही गोरेगावकर या भ्रष्ट व्यक्तिमत्त्वाला चांगलेच ओळखून आहोत. तसेच आम्ही प्रथम शिवसेनेत होतो, गेली चार वर्षे भाजपात आहोत. भूषण सुभाष देसाई हा फक्त आणि फक्त कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक व्यवहारातून वाचण्यासाठीच आपल्याकडे आलेले आहेत”, असा दावा जाधव यांनी एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

Bhushan Desai: ‘या’ प्रकरणामुळे सुभाष देसाईंचे पुत्र शिंदे गटात?, पाहा काय दिलं उत्तर

ADVERTISEMENT

“मित्रपक्षाची एक चूक महागात पडेल”, भाजप नेत्याचा इशारा

“आपल्या पक्षाची तसेच आपली प्रतिमा ही खूप चांगली आहे, पण अशा भ्रष्ट आणि मलीन चारित्र्याच्या व्यक्तिमत्त्वाला आपण राजकीय आश्रय दिल्यामुळे गोरेगावकरांमध्ये संतप्त भावना जागल्या आहेत. आज आपण युतीमध्ये आहोत, मित्र पक्षाची एक चूक सुद्धा दोन्ही पक्षास महाग पडू शकते. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पण आपण या सूचनेचा नक्कीच विचार कराल अशी अपेक्षा”, असं म्हणत संदीप जाधव यांनी भूषण सुभाष देसाई यांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT