लाइव्ह
Maharashtra News Live : Maharashtra News Live : ठाकरेंनी शिंदेंना पाठवलेलं पत्र खोटं! सुनावणीत काय घडलं?
Maharashtra News in Marathi : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणीही सुरू आहे. त्यामुळे दोन्ही मुद्द्यांकडे राज्याचे लक्ष लागलेलं आहे. यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काय घडतंय… सर्व घटना-घडामोडी वाचा एकाच ठिकाणी….
ADVERTISEMENT
Maharashtra News in Marathi, Maharashtra Breaking News, Live, Maharashtra News Live, Marathi News LIVE Updates, Maharashtra News in Marathi, Maharashtra News Live
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 11:18 AM • 29 Nov 2023
mumbaitak
mumbaitak - 10:41 AM • 29 Nov 2023
महाराष्ट्राचे अणाजी पंत कोण? रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काल X सोशल प्लॅटफॉर्मवर 'एका अणाजी पंताने मराठेशाही संपवली आणि आताच्या काळात एक आधुनिक अणाजी पंत महाराष्ट्र धर्म संपवायला निघाले आहेत', असं ट्विट केल होतं. यावर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील अणाजी पंतांचा दाखला देत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मी जे ट्विट केलं ते मी एका व्यक्तीबद्दल नाही, तर प्रवृत्तीबद्दल बोलत होतो. हीच ती प्रवृत्ती आहे, ज्याच्या विरोधात संत आणि फुले-शाहू-आंबेडकर लढले; मात्र सध्या महारष्ट्रात हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अणाजी पंतांचा विचार आजच्या काळात जास्तच प्रगती झाल्यामुळे मी त्याला आधुनिक असं म्हणालो. मी एका प्रवृत्तीबद्दल बोलत होतो, मात्र मला आश्चर्य वाटल कि भाजपचे नेते खाली देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन तुम्ही असं कसं बोलू शकता असं म्हणत होते. मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. भाजपचे नेते त्यांच्याच नेत्याचं नाव घेऊन त्यांच्या नेत्याची बदनामी करत आहेत", असं रोहित पवार म्हणाले. - 10:09 AM • 29 Nov 2023
Datta Dalvi : ठाकरे गटाच्या नेत्याला अटक
भांडुपमध्ये रविवारी (26 नोव्हेंबर) शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी महापौर तथा उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधान केले होते. या प्रकरणी बुधवारी (29 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. - 10:09 AM • 29 Nov 2023
हिंदु हृदयसम्राट नव्हे तर हे , राऊतांचा CM शिंदेंना टोला
दत्ता दळवीचा गुन्हा काय? त्यांनी जनतेच्या मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त केल्या. गद्दार हृदयसम्राट स्वत:ला हिंदु हृदयसम्राट म्हणवून घेत आहेत. त्याच्यावर हिंदुंचा आणि जनतेचा आक्षेप आहे. गद्दार हृदयसम्राटाने हिंदु हृदयसम्राट म्हणवून घेणे हा वीर सावरकरांचा अपमान आहे आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. त्याबद्दल एकनाथ शिंदेवर गुन्हा दाखल व्हायला हवा. कारण ते वीर सावरकर यांची उपाधी स्वत: लावून घेत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. - 10:05 AM • 29 Nov 2023
Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळ बैठक
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसाने अनेक भागांत नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना मदत देण्याबरोबरच, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT