लाइव्ह

Maharashtra Assembly Session Live : पहिल्याच दिवशी विरोधक माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक

मुंबई तक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुले अर्पण केली आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra Assembly Session Live : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या अधिवेशनात विरोधक बीडमधील गुन्हेगारी, महिला सुरक्षेचा मुद्दा यावरुन आक्रमक होतील अशी शक्यता आहे. एकीकडे वाल्मिक कराडला संतोष देशमुख प्रकरणात प्रमुख आरोपी करण्यात आल्यानं धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे सुद्धा अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आता विरोधक काय भूमिका घेतात आणि सरकार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असेल. (Maharashtra Assembly Budget Session Live)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा लाईव्ह ब्लॉग वाचा...


 

  • 01:21 PM • 03 Mar 2025

    Maharashtra Politics : लाडकी बहीणचा हप्ता कधी? आदिती तटकरेंनी सांगितलं...

    लाडकी बहिण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्चच्या पूर्वसंध्येला जमा करणार अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. मार्च महिन्याचा हप्ता बजेटनंतर विभागाच्या वतीनं उपलब्ध केल्यानंतर जमा होईल असंही त्यांनी सांगितलं आहे. 

  • 12:43 PM • 03 Mar 2025

    Maharashtra Live Updates : सोमनाथला न्याय द्या... आझार मैदानावर आंदोलन

    आज मुंबईतील आझाद मैदानावर भीम सैनिकांकडून आंदोलन करण्यात आलं आहे. 2 महिन्यांपूर्वी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि इतर आंदोलकांना बेदम मारहाण केली होती, त्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असा आरोप आझाद मैदानावरील आंदोलकांनी केला आहे. सोमनाथला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा. यासोबतच, ज्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही आंदोलकांनी सरकारकडे केली.

  • 12:06 PM • 03 Mar 2025

    Maharashtra Live Updates : राज्यात अधिवेशन, परळीत महादेव मुंडेंच्या पत्नीचं उपोषण

    एकीकडे राज्यात अधिवेशन सुरु होतंय, तर दुसरीकडे परळीमध्ये आज महादेव मुंडे यांच्या पत्नीचं आमरण उपोषणही सुरू झालं आहे. 20 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडे यांची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. या घटनेत FIR दाखल होण्यासाठी कित्येक महिने उलटून गेले. व्यावसायिक असलेल्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी न्याय मागण्यासाठी आक्रमक झाले आहेत. आजपासून महादेव मुंडे यांचं सर्व कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.

  • 12:00 PM • 03 Mar 2025

    "राज्यात फक्त दोनच गुंड आहेत, एक माणिकराव कोकाटे आणि दुसरा धनंजय मुंडे"

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुले अर्पण केली आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 'राज्यात फक्त दोनच गुंड आहेत, एक माणिकराव कोकाटे आणि दुसरा धनंजय मुंडे’ अशा घोषणा देण्यात आल्या.

follow whatsapp