लाइव्ह
Mla Disqualification Live : शेवटच्या क्षणी ठाकरे गटाची गुगली, सुनावणी संपली… अवघ्या महाराष्ट्राचे डोळे निकालाकडे
Maharashtra Breaking news Live : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. याचे अपडेट जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा…
Maharashtra Assembly Winter Session Live : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार आणि दोन्ही सभागृहातील अपडेट्स…
Marathi news Live : महाराष्ट्र्रातील इतर घटना घडामोडी आणि प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच ठिकाणी…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 09:57 PM • 20 Dec 2023
Marathi Live News: लोकायुक्त हे महत्वाचे विधेयक वर्षभरानंतर मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हिवाळी अधिवेशनामध्ये 17 पैकी 12 विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये लोकायुक्त हे सर्वात महत्त्वाचे विधेयक वर्षभरानंतर मंजूर करण्यात आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेवर विरोधकांनी सभात्याग केला होता पण विदर्भाशी संबंधित एकही मुद्दा त्यांना उपस्थित करत आला नाही. ही त्यांची चूक असल्याचे त्यांच्याच लक्षात आल्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यापलिकडे काही केले नाही. - 09:28 PM • 20 Dec 2023
Mla Disqualification: ती अनैसर्गिक युती नव्हती का? - कामत
मविआ सरकार येण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार स्थापन झालं होतं. तेव्हा ती अनैसर्गिक युती नव्हती का? असा सवाल ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी यावेळी केला. - 09:28 PM • 20 Dec 2023
Mla Disqualification: त्या 10 दिवसात शिंदेंनी एक तरी पत्र ठाकरेंना दिलं का? - कामत
तुम्ही असंही म्हणालात की, शिंदेंना मुख्यमंत्री पद नको होतं शिंदेंनी उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत या असं म्हणाले होते. पण याबाबत म्हणजे 20 जून ते 30 जून या दहा दिवसात जो काही ड्रामा सुरू होता त्यात दिवसांमध्ये शिंदेंनी एकतरी पत्र उद्धव ठाकरेंना दिलं का की तुम्ही मविआची साथ सोडा आणी भाजपसोबत येऊन मुख्यमंत्री बना? - कामत - 09:28 PM • 20 Dec 2023
MLA Disqualification: आमदार अपात्रता सुनावणी संपली, निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे
आमदार अपात्रता सुनावणी अखेर आज (20 डिसेंबर) संपली आहे. आमदारांची उलटतपासणी आणि त्यानंतर दोन्ही गटांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी ही आता संपली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. - 09:23 PM • 20 Dec 2023
Mla Disqualification: राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याबाबत काय सांगाल? - कामत
राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याबाबत काय सांगाल? तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात लढलात. तुम्हाला अपात्र ठरवले जाईल का? - 09:22 PM • 20 Dec 2023
Mla Disqualification: निवडणुकीनंतरची युती बेकायदेशीर असेल, तर.. : कामत
निवडणुकीनंतरची युती बेकायदेशीर असेल, तर युतीतील सर्व सदस्यांना अपात्र ठरवावे लागेल. निवडणुकीनंतर आमदारांनी युती तोडली तर ते 10 व्या अनुसूचीला बांधिल नाही का? - कामत - 09:21 PM • 20 Dec 2023
Mla Disqualification: शिंदे गटाच्या वकिलांचा बचाव
उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची निवडणूक पूर्व युती तोडून मविआ सरकार स्थापन केलं. पण शिंदेंनी पुन्हा भाजपसोबत जात नैसर्गिक युती केली- जेठमलानी - 04:07 PM • 20 Dec 2023
मी असतो तर मराठा आरक्षणासंदर्भात अशी परिस्थिती निर्माण झाली नसती - एकनाथ शिंदे
...अशी भीती अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना वाटत होती, शिंदेंचा ठाकरेंबद्दल गौप्यस्फोट - 03:44 PM • 20 Dec 2023
मराठा आंदोलनातील ३२४ गुन्हे सरकारने घेतले मागे -फडणवीस
"मागच्या काळात मराठा आंदोलनातील खटले मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यातील किती खटले परत घेतले, हा मुद्दा सातत्याने समोर येत असतो. एकूण ५४८ गुन्हे दाखल झाल्या होत्या. पोलीस महासंचालकांच्या ए फायनल झालेले गुन्हे आहेत १७५. शासनाकडे शिफारस आणि मागे घेतलेले गुन्हे ३२४. शासनाने अमान्य केलेले गुन्हे आहेत २, न्यायालयातून प्रत्यक्ष मागे घेण्यात आलेल्या आहेत २८६, न्यायालयात प्रलंबित आहेत २३ आणि नुकसान भरपाई न दिल्यामुळे प्रलंबित आहेत ६. ९० टक्क्यांपेक्षा जास्त ही कारवाई पूर्ण झालेली आहे. ४७ खटले असे आहेत की जे कुठल्याच निकषात बसत नाही, त्यामुळे राज्य सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. - 02:31 PM • 20 Dec 2023
कसे दोन पक्ष फोडले. ही पद्धत आहे का? - जितेंद्र आव्हाड
"महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती ही चिंतेची बाब आहे. या महाराष्ट्रात कधीही दंगली घडू शकतात, असे वातावरण तयार केले जात आहे. हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. जर गावागावांत दंगली पेटल्या तर फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. याचा गांभीर्याने विचार करावा. जरांगेंसोबत तुम्ही चर्चा करताहेत. ते बोलतात म्हणून हे (भुजबळ) बोलणार... हे काय चाललंय. हे राज्य सरकारच्या पाठिंब्याने सुरू आहे का? अशी चर्चा सुरूये. दोघांनाही राज्य सरकार चालवतंय, अशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील सामाजिक सामाजिक परिस्थिती बिघडवायची, जेणेकरून मतदानामध्ये फरक पडेल आणि आपलं राज्य पुन्हा येईल. हे राज्य आणताना तुम्ही काय केलं, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कसे दोन पक्ष फोडले. ही पद्धत आहे का? लोकशाहीची हत्या करून, पक्ष फोडून राज्य करायचं नसतं", असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. - 02:17 PM • 20 Dec 2023
जयंत पाटलांचं सरकारवर टीकास्त्र
"डायमंडची नगरी गेली. पंतप्रधानांनी डायमंड बोर्जचे उद्घाटन केले. आंतरराष्ट्रीय केंद्रही गेलं. सगळे बाहेर गेले, तर बेकारी वाढेल. बेकारीमुळे गुन्हेगारी वाढेल. हे थांबवण्याचं काम सरकारने केले पाहिजे. भ्रष्टाचार तर सगळीकडेच झाला. कुठलेही प्रकल्प मंजूर केले की, ज्याच्या परिसरात आहे, त्याला अधिकार दिलाय डील करण्याचा. पालकमंत्र्यांच्या डीपीडीसीमधून खर्च होतानाही त्याला टोल लागत आहे", असे जयंत पाटील म्हणाले. - 02:14 PM • 20 Dec 2023
कोयता गँगचा थरार -जयंत पाटील
पुण्यात कोयता गँग. कोयता गँगचा बंदोबस्त हे सरकार करू शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दोन-तीन तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवत दुकानदाराला धमकावलं. सायबर क्राईम हे मोठ संकट आपल्यावर आहे. डीपफेकचा प्रकार आला आहे. त्याची व्यवस्था काय? बँकेचे फ्रॉड होत आहेत. यामध्ये सरकारने यावर व्यवस्था केलेली नाही. महिलेला अश्लील बोलले तरी सरकारकडून कारवाई होत नाही. महाराष्ट्र सायबर क्राईमची राजधानी होतोय की, काय याचा विचार सरकारने केला पाहिजे", असे जयंत पाटील म्हणाले. - 02:11 PM • 20 Dec 2023
पोलीस दलात अग्नीवीर भरायचे आहेत का? -जयंत पाटील
"या राज्याची बेकारी इतकी वाढलीये. १० टक्क्यांच्या वर ती गेली आहे. महिला सुरक्षा. यात लक्ष घालण्याची गरज आहे. महिलांना सुरक्षितता देण्यासाठी सरकार कमी पडतंय. पोलीस भरती हे सरकार का टाळतंय, हे आम्हाला कळत नाही. मुंबई पोलीस दलात ३५ टक्के जागा रिक्त आहेत. अग्नीवीर प्रमाणे पोलीस दलातही अग्नीवीर घालायचे आहे का? ३००० पोलीस कंत्राटी भरती करायची, असं सरकारचं चालू आहे", अशी टीका जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. - 01:54 PM • 20 Dec 2023
आर्थिक बेशिस्तीवरून जयंत पाटलांचं टीकास्त्र
"अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, "बरेच विषय आहेत, पण त्यातील एक आर्थिक नियोजनातील बेशिस्तपणा हा एक विषय आहे. अर्थमंत्री सभागृहात उपस्थित आहेत, याचा मला विशेष आनंद आहे. अर्थमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावातील या वाक्याची दखल घेतली पाहिजे. आपलं राज्य नोटा छापण्याचा अधिकार घेऊन काम करतंय का, हेच मला कळत नाही. ज्यावेळी फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी १७ कोटी रुपयांची तूट होती. हे त्यांनीच सांगितलं होतं. त्यानंतर पुरवणी मागण्या जून-जूलै मध्ये मांडल्या त्या ४४ हजार कोटींच्या. त्यानंतर काल-परवा पुरवणी मागण्या मांडल्या त्या ५५ हजार कोटींच्या. म्हणजे सरकारकडे हातात असलेल्या पैशांपेक्षा १ लाख १६ हजार कोटी रुपये जास्तीचे आहेत. सरकारकडे पैसे नाहीत", अशी टीका जयंत पाटील यांनी केली. - 10:12 AM • 20 Dec 2023
शिंदेंच्या वकिलांनी ठाकरेंना घेरलं
mumbaitak - 10:05 AM • 20 Dec 2023
दोघांच्याच सह्या
जेठमलानी म्हणाले, "शिवसेनेच्या 1999 च्या घटनेनुसार पक्षात राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा प्रतिनिधी सभा नाही. 25 जून 2022 च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत 7 ठराव पारित करण्यात आले, पण त्यावर स्वाक्षरी झालेली नाही. सातपैकी फक्त तीन ठरावांवर अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांच्या सह्या आहेत. या दोघांनाही साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले नाही", असे जेठमलानींनी सांगितले. - 10:02 AM • 20 Dec 2023
शिवसेनेची राज्यघटना... शिंदेंचे वकील म्हणाले सर्व गोष्टी बनावट
"25 जून 2022 रोजी काही ठराव मंजूर करण्यात आले आणि काही घटना घडल्या. कामत म्हणतात, आमची राजकीय रचना नव्हती. तर प्रभू हे 25 जूनच्या बैठकीवर विसंबून आहे, ज्या बैठकीत प्रतिवादींविरुद्ध (शिंदे गटातील आमदार) अपात्रतेचा निर्णय घेण्यात आला. 7 ठराव पारित करण्यात आले. माझ्या मते शिवसेनेची राज्यघटना 1991 ची आहे, त्यानंतरच्या सर्व गोष्टी बनावट आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, 2018 च्या सुधारणा रेकॉर्डवर नाहीत आणि निवडणूक आयोगाची प्रक्रिया पाळली गेली नाही", असे शिंदेंचे वकील जेठमलानी यांनी सागितलं. - 09:34 AM • 20 Dec 2023
विधिमंडळ पक्षाचे गटनेते शिंदे होते; जेठमलानींनी मूळ मुद्द्यावर ठेवलं बोट
जेठमलानी पुढे म्हणाले, "सुनील प्रभूंनी असा आरोप केला होता की, एकनाथ शिंदे हे भाजपच्या प्रभावाखाली काम करत आहेत. पण, याबद्दलचे पुरावे त्यांना सादर करता आले नाहीत. हे फक्त माध्यमांमधील बातम्या आहेत. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठका बोलावल्या होत्या, राजकीय पक्षाची बैठक नाही. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार विधिमंडळाचा आहे. त्यांचे प्रकरण मुळात आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे सदस्यत्व सोडल्याचे होते. ते फक्त शिवसेना विधिमंडळ पक्षाबद्दल बोलत आहेत, ज्यात एकनाथ शिंदे विधिमंडळ गटनेते (CLP) होते. पक्षांतर विरोधी कायदा विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांशी संबंधित आहे", असा मुद्दा जेठमलानींनी मांडला. - 09:22 AM • 20 Dec 2023
...म्हणून अपात्र ठरवता येत नाही -जेठमलानी
1985 मध्ये 10 व्या परिशिष्टामध्ये 52 वी दुरुस्ती करण्यात आली. त्याचा हवाला देत जेठमलानी म्हणाले की, सदस्याने सभागृहाबाहेर काही केले, तर तो अपात्र ठरू शकत नाही. 21 आणि 22 जूनच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत म्हणून ते अपात्रत करण्याची मागणी करत आहेत. आम्ही केलेल्या सर्व कृतींचा ते यात समावेश करू शकत नाही." - 09:12 AM • 20 Dec 2023
मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगे पाटलांना केली विनंती
"विरोधक मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात अपयशी ठरले म्हणून आरक्षण रद्द झालं. मनोज जरांगे पाटील यांना मी आवाहन केलं आहे. सरकारचा प्रयत्न आणि हेतू प्रामाणिक आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी सरकारला आणखी थोडा वेळ देणं गरजेचं आहे", असे एकनाथ शिंदे म्हणाले. "कुणबी नोंदी मराठवाड्यात मिळत नव्हत्या, त्या आता मिळायला लागल्या आहेत. रक्ताच्या नातेवाईकांना या नोंदींचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून वकिलांची फौज कामाला लागली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यावर मराठा समाज किती मागास आहे आणि त्यांना आरक्षणाची का गरज आहे हे समोर येईल अशी अपेक्षा आहे", असे एकनाथ शिंदे यांनी सांगत जरांगे यांना आणखी वेळ देण्याची विनंती केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT