लाइव्ह
Ram Mandir Ayodhya: रामलल्लाच्या संपूर्ण मूर्तीचा पहिला फोटो आला समोर, मनमोहक हास्य अन्…
PM Modi Solapur Visit : लोकसभा निवडणूक जवळ येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्रातील दौरेही वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहे. त्यामुळे भाजपचे महाराष्ट्रात जास्त लक्ष आहे. पंतप्रधान मोदी सोलापुरात एका प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहे, मात्र या कार्यक्रमात ते काय संदेश देतील हेही महत्त्वाचे असणार आहे… या दौऱ्यातील सर्व अपडेट्स आणि महाराष्ट्रातील सर्व घटना वाचा एकाच ठिकाणी…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 05:51 PM • 19 Jan 2024
Marathi news live updates : भाजप, शिंदे गटात येण्यासाठी आमच्या नेत्यांवर दबावतंत्र- आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे विषय मांडले. यावेळी ते म्हणाले की, 'जनता अदालत आम्ही घेतली होती. हे जे खोके सरकार आहे ते ज्या क्रूरपणे वागायला लागलेलं आहे. त्यांच्या मनात जी बदल्याची भावना आहे ती लोकांमध्ये दिसू लागली आहे. जनता अदालत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाणवर ईडीने कारवाई झाली. जे त्या कंपनीचे मालक आहेत ते शिंदे गटात आहेत. तसंच आमचे राजन साळवी आहेत त्यांच्यावर देखील धाड पाडली गेली पण त्यांनी चांगली बाजू मांडली. आमच्या वायकरजींवर सुद्धा असंच दबावतंत्र टाकलं जात आहे. भाजपत या शिंदे गटात या आणि हे सगळेच नीडरपणे लढत आहेत. ' - 05:49 PM • 19 Jan 2024
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक होणार आहे. प्रभू श्री रामाच्या विहंगम दर्शनाची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत.
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक होणार आहे. प्रभू श्री रामाच्या विहंगम दर्शनाची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. पण अभिषेक करण्यापूर्वी रामलल्लाचे पहिला भव्य फोटो समोर आला आहे. - 03:58 PM • 19 Jan 2024
मुबंईतील BJP-RSS चे 11 स्थानिक नेते ठाकरेंच्या शिवसेनेत
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतलेल्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील ११ नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधून ११ जणांचं शिवसेनेत स्वागत केले. - 02:52 PM • 19 Jan 2024
खोटारड्यांचे हे बेफाम घोडे का उधळत आहेत -शेलार
महालक्ष्मी रेसकोर्सच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण खूप तापले आहे. आदित्य ठाकरेंनी यावरून शिंदे सरकारला लक्ष्य केलं. त्याला उत्तर देताना शेलारांनी सुनावले. - 11:59 AM • 19 Jan 2024
सोलापूरच्या सभेत मोदी काय बोलले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (19 जानेवारी) महाराष्ट्रातील सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी येथे सुमारे 2000 कोटी रुपयांच्या आठ अमृत मिशन (कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी अटल मिशन) प्रकल्पांची पायाभरणी केली. रे नगर गृह प्रकल्पाचं लोकार्पण कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'ही वेळ आपल्या सर्वांसाठी भक्तीची आहे. तो ऐतिहासिक क्षण 22 जानेवारीला येणार आहे, जेव्हा आपले प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. टेंटमध्ये रामलल्लाचे दर्शन घेण्याचे अनेक दशकांचे दुःख आता दूर होणार आहे', अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या. - 10:47 AM • 19 Jan 2024
PM Modi Live : मोदींच्या दौऱ्यावरून राऊतांची शिंदेंवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. शुक्रवारी (19 जानेवारी) ते सोलापुरात आहेत. आठवडाभरात मोदींचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. या दौऱ्याबद्दल बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "ते (PM Modi)महाराष्ट्रात वारंवार यासाठी येत नाहीयेत की, त्यांचं प्रेम उफाळून येत आहे. उत्तर प्रदेशवर यांचं प्रेम आहे, असंही नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा जास्त आहे, त्यामुळे ते जाताहेत." - 09:20 AM • 19 Jan 2024
...मग दात काढ, शरद पवारांवर आरोप, सोमय्यांवर राष्ट्रवादीची नेता भडकली
"ईडी, इनकम टॅक्स धाडी, सीबीआय यांचा घरगडी म्हणून वापर करायला लाज वाटत नाही... प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी व अनेक जणांच्या चौकशांचं काय झालं? उत्तर दे मग दात काढ", असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. - 08:59 AM • 19 Jan 2024
देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं मोदी करणार उद्घाटन
12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक आणि मुंबई आले होते. मुंबईत अट सेतूचे राष्ट्रार्पण केल्यानंतर मोदी सोलापुरात एका मोठ्या प्रोजेक्टचं लोकार्पण करणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT