लाइव्ह

Maharashtra CM LIVE Updates : एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर, म्हणाले मी आता...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ram Satpute Latest News
Ram Satpute Latest News
social share
google news

Maharashtra New CM LIVE Updates : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा उलटून गेला आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण असणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीसह इतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या मारकडवाडीत आज बॅलेट पेपरवर मतदान होत आहे. उत्तम जानकर यांना मतदानाचा लीड मिळाला असतानाच राम सातपुतेंना अधिक मतं कशी मिळाली? असा सवाल तेथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दरम्यान,  महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत जाऊन आलेत. या बैठकीत अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं स्पष्ट सांगितलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी नावं समोर आली आहेत. मात्र आता भाजपकडून सांगण्यात आलेली शपथविधीसाठीची 5 डिसेंबर ही तारीख जवळ येतेय. त्यामुळे घडामोडींचा वेगही वाढला आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 08:00 PM • 03 Dec 2024

    Maharashtra Live News Update : देवेंद्र फडणवीस एकनाथ शिेदेंच्या भेटीला...

    दिल्लीमध्ये झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आज वर्षा निवासस्थानी जात शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शपथविधीबद्दल आणि खातेवाटपाबद्दल चर्चा होईल अशी शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. दिल्लीमधून अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे परत आल्यानंतर तब्बल 6 दिवसानंतर ही पहिली भेट होत आहे. राज्यात महायुतीच्या सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला पार पडणार आहे. मात्र अजूनही नाराजीच्या चर्चा कायम असल्यानं ही भेट महत्वाची असणार आहे. 

  • 03:38 PM • 03 Dec 2024

    Maharashtra Live News Update : रुग्णालयाबाहेर येताच शिंदे म्हणाले, मी...

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काही दिवसांपासून ठीक नसल्याचं दिसतयं. अशातच ते ज्युपिटर रुग्णालयात गेले होते. याठिकाणी शिंदेंवर काय उपचार केले जाणार? त्यांना भरती करुन घेण्यात येणार का? अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मात्र, यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: रुग्णालयाबाहेर आल्यानंतर आपण फक्त रुटीन चेक-अपसाठी आलो होतो. आता माझी प्रकृती ठीक आहे असं सांगितलं

  • 01:43 PM • 03 Dec 2024

    Maharashtra CM LIVE Update: रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर सातपुतेंनी केला मोठा आरोप


    Maharashtra New CM LIVE: मारकडवाडीच्या घटनेचा मास्टरमाईंड रणजितसिंह मोहिते पाटील असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी षड्यंत्र रचून ईव्हीएमला बदनाम करण्यासाठी हा कट रचला आहे. उत्तम जानकर हा प्यादा आहे. जनता ही विकासाच्या बाजूने आहे. त्यामुळे मतदान करायला कोणीही आलं नाही, असं राम सातपुते म्हणाले. 

  • 11:57 AM • 03 Dec 2024

    Maharashtra Live News Update: पोलिसांच्या कारवाईच्या भीतीमुळं ग्रामस्थांनी मतदान केलं रद्द!

    Maharashtra New CM LIVE: सोलापूर जिल्ह्यातील मालशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावाची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगलीय. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (शरचंद्र पवार) गटाच्या उत्तम जानकर यांनी विजय मिळवला. परंतु, महायुतीच्या राम सातपूते यांनाही जास्त मताधिक्य मिळालं, त्यामुळे येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला असून आज मारकडवाडीत बॅटेल पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मतदान केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. त्यामुळे मारकडवाडीच्या ग्रामस्थांचं बॅलेट पेपरवरचं मतदान रद्द झालं आहे. 

  • ADVERTISEMENT

  • 10:53 AM • 03 Dec 2024

    Maharashtra Live News Update: "कायद्याचं उल्लंघन केलं तर गुन्हे दाखल करू", पोलिसांचा इशारा

    Maharashtra New CM LIVE: विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून येत्या 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. तत्पूर्वी, सोलापूरच्या मारकडवाडीत ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, मारकडवाडीत मतदानाची बेकायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. एक मत जरी दिलं, तरी आम्ही गुन्हा दाखल करू, असा इशारा पोलिसांनी दिलाय. "हे सर्व बेकायदेशीर आहे. याला कोणताही आधार नाही. आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहोत. तर कायद्याची अमंलबजावणी करणं आमचं कर्तव्य आहे. पोलिसांचा योग्य तो बंदोबस्त आम्ही लावला आहे. कायद्याचं उल्लंघन झाल्यास आम्ही गुन्हे दाखल करू", अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 


     

  • 08:56 AM • 03 Dec 2024

    Maharashtra Live News Update: मारकडवाडीच्या मतदानावर रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले....

    Maharashtra New CM LIVE: "माळशिरस मतदारसंघांतील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाचा घेतलेला निर्णय लोकशाहीसाठी अत्यंत आशादायी असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागून आहे. उद्याची ही घडामोड ‘दूध का दूध-पाणी का पाणी’ केल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे हे सर्व होत असताना ही मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारकडून होत असलेली दडपशाही म्हणजे ‘दाल मे कुछ काला है’ असेच म्हणावे लागेल. पण सरकार कितीही दडपशाही करत असले तरी लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत मारकडवाडी गावासोबत आणि आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्यासोबत आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत", असं आमदार रोहित पवार ट्वीटरवर म्हणाले आहेत.

     

  • ADVERTISEMENT

  • 08:53 AM • 03 Dec 2024

    Maharashtra Live News Update: "मतदार मतदान करण्यावर ठाम...", उत्तम जानकर नेमकं काय म्हणाले?

    Maharashtra New CM LIVE: माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावामध्ये मतदान करण्यासाठी ग्रामस्थ जमत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर हे मतदान केंद्रावर आले. यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, मतदार हे मतदान करण्यावरती ठाम असून ते मतदान करतील.

follow whatsapp

ADVERTISEMENT