लाइव्ह

Maharashtra Politics Live : “शिंदे गट 100 टक्के भाजपमध्ये विलीन होणार”

मुंबई तक

Maharashtra politics Latest News Live : काँग्रेसने नागपुरातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पुढच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप प्रचाराचा नारळ फोडेल. पण, या सगळ्या धामधुमीत सगळ्याचं लक्ष आहे ते महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाकडे. उद्धव ठाकरेंनी 23 जागांची मागणी केलीये. त्याला काँग्रेसने विरोध केलाय. काँग्रेसने थेट ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे मतांचा आधार किती, असा सवाल करताना काँग्रेसकडे नेता आहे, मतदार आहे आणि कार्यकर्तेही आहेत, असे सांगत तडजोडीसाठी तयार रहा, असाच मेसेज दिलाय. त्यामुळे ठाकरे पवारा किती तडजोडी कराव्या लागतील हे आगामी काळात दिसेल. त्याचबरोबर वंचित बहुज आघाडीची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे.

दुसरीकडे भाजपनेही आता महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या रणनीतीवर काम सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा घेणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात जाण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अजित पवारांनी कार्यकर्त्यांना गाड्या गिफ्ट करत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिवसभरातील अपडेट जाणून घेण्यासाठी मुंबई तक लाईव्ह अपडेट वाचत रहा…

ADVERTISEMENT

eknath shinde faction will be merged in bjp, says vijay wadettiwar
eknath shinde faction will be merged in bjp, says vijay wadettiwar
social share
google news
  • 09:11 PM • 29 Dec 2023

    Maharashtra Politics Live : कुडाळमध्ये मोदी यात्रा रोखली; निलेश राणेंनी पोलिसात मांडली ठाण

    महाविकास आघाडी आणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मोदी यात्रा कुडाळामध्ये रोखली होती. त्यावरून भाजपचे माजी खासदार आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे प्रभारी निलेश राणे आक्रमक झाले आहेत. मोदी यात्रा रोखल्याने ते गोव्याच्या दौऱ्यावर असतानाही त्यांनी कुडाळमध्ये येऊन यात्रा अडविणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दोनशेच्यावर भाजपचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.
  • 02:06 PM • 29 Dec 2023

    mumbaitak

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षासह सगळ्याचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे आहे. मात्र, निकाल येण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांचा गट भाजपत विलीन होणार असल्याच्या चर्चेनं डोकं वर काढलं आहे.
  • 11:04 AM • 29 Dec 2023

    महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांचा राहुल गांधींनी घोर अपमान केला -भाजप

    राहुल गांधी यांच्या भाषणावर भाजपने टीका केली आहे. "महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांचा राहुल गांधींनी घोर अपमान केला आहे. राहुल गांधी हीच का तुमची तयारी? आमच्या महाराजांच्या स्वराज्याचा लढा देखील अमान्य केला. त्यांनी शिवरायांच्या सरसेनापतींवर केलेले आरोप हे प्रत्येक भारतीयांच्या मनावर केलेला घावच आहे. त्यांना भारतीय माफ करणार नाही", असे भाजपने म्हटले आहे.
  • 10:41 AM • 29 Dec 2023

    काँग्रेसने महाराष्ट्रात जागाच जिंकलेली नाहीये -संजय राऊत

    मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "आम्ही महाराष्ट्रात कायम लोकसभेच्या 23 जागा लढत आलो आहोत. एक दादरा नगर-हवेली या जागा कायम राहील, इतकंच म्हणालो. दुसऱ्यांदा जेव्हा बैठक झाली, तेव्हा जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू. त्यात काँग्रेस येतच नाही. कारण काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या जागाच जिंकलेल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात शून्यापासून सुरूवात करावी लागेल. तरीही काँग्रेस मविआमध्ये महत्त्वाचा पक्ष आहे. आम्हाला एकत्र काम करायचं आहे. आम्हाला काहीही त्रास नाहीये. काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठीलाही काही त्रास नाही. त्यामुळे इकडे कोण काही बोलत असतील, तर लक्ष देण्याची गरज नाही", असं संजय राऊत म्हणाले.
  • 09:54 AM • 29 Dec 2023

    राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे ठाकरे-पवारांना निमंत्रण

    22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठीच्या निमंत्रणावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरेंना निमंत्रण दिले गेले नसल्याचे दावे केले गेले. पण, आता याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
  • 08:30 AM • 29 Dec 2023

    मागच्या दोन निवडणुकीत काँग्रेसचे खासदार किती होते?; ठाकरेंच्या नेत्याने काँग्रेसला केला सवाल

    शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 23 जागांची यादी तयारी केलीये. मग ही तडजोड कशी करणार?, या प्रश्नालाही निरुपम यांनी उत्तर दिले. संजय निरुपम म्हणाले, "23 जागा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागितली असेल, तर साहजिकच आहे. त्यांना ते मागण्याचा अधिकार आहे. पण, 23 जागा मिळतील का, हा खूप मोठा प्रश्न आहे. 23 जागा घेऊन काय करणार? त्यांचे सारे नेते सोडून गेले आहेत. त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) उमेदवारच कुठे आहेत? महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा मतदार किती आहे, हे आता कुणालाही माहिती नाही."
follow whatsapp