Mood Of The Nation : भारतातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण? वाचा इंडिया टुडेचा सर्व्हे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशात इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी एक सर्व्हे केला आहे ज्यामध्ये विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. यामधलाच एक महत्त्वाचा प्रशअन आहे तो म्हणजे भारताचे आत्तापर्यंत लोकप्रिय पंतप्रधान कोण आहेत. आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत की लोकांना भारताचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान वाटतात. इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी जानेवारी 2021 ते जानेवारी 2022 या वर्षभराच्या कालावधीत तीन सर्व्हे केले आहेत.

ADVERTISEMENT

आता आपण जाणून घेऊ की पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादुर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, राजीव गांधी यांच्यापैकी कुणाला किती टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

हे वाचलं का?

भारतातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण?

देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 34 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

ADVERTISEMENT

भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 20.3 टक्के लोकांनी सर्वात लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे

ADVERTISEMENT

त्यानंतर इंदिरा गांधी यांना लोकप्रिय म्हणून 10.8 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे

जवाहरलाल नेहरू यांना 8.8 टक्के लोकांनी लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे

मनमोहन सिंग यांना 6.8 टक्के लोकांनी लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे

लाल बहादुर शास्त्री यांना 5 टक्के लोकांनी लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे

व्ही. पी. सिंग यांच्याबाबत 4.5 टक्के लोकांनी मतं नोंदवत लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे

तर 2.6 टक्के लोकांना राजीव गांधी हे लोकप्रिय पंतप्रधान आहेत असं वाटतं

1.8 टक्के लोकांना पी. व्ही. नरसिंह राव हे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत असं वाटतं

मोरारजी देसाई यांना 1.4 टक्के लोकांनी लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे.

एकंदरीत या संपूर्ण टक्केवारीवर नजर टाकली तर हे लक्षात येतं की आत्तापर्यंत भारताचे जे जे पंतप्रधान होऊन गेले त्यापैकी अटलबिहारी वाजपेयी 20.3 टक्के मतांसह सर्वात आघाडीवर आहेत. तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 34 टक्के लोकांनी लोकप्रिय म्हणून पसंती दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही प्रचंड बहुमताने निवडून आले. तेव्हापासून मोदी यांच्या नावाची चर्चा देशभरात आणि जगभरात आहे. अशात आता इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी केलेल्या सर्व्हेत सर्वात लोकप्रिय पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच ठरले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT