पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट, दोघांनी खरेदी केली मोठी मालमत्ता
पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीच्या कोठडीत असलेले पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्याबाबत आणखी एक नवीन माहिती समोर येत आहे. दोघांची शांतीनिकेतनमध्ये संयुक्त मालमत्ता आहे. घोटाळ्यातील दोन्ही आरोपींनी 2012 मध्ये संयुक्त मालमत्ता खरेदीकेली होती, अशी माहिती समोर येत आहे. या दोघांनी विकत घेतलेल्या फार्महाऊसची किंमत २० लाख रुपये होती, अशी माहिती इंडिया […]
ADVERTISEMENT
पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीच्या कोठडीत असलेले पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्याबाबत आणखी एक नवीन माहिती समोर येत आहे. दोघांची शांतीनिकेतनमध्ये संयुक्त मालमत्ता आहे. घोटाळ्यातील दोन्ही आरोपींनी 2012 मध्ये संयुक्त मालमत्ता खरेदीकेली होती, अशी माहिती समोर येत आहे. या दोघांनी विकत घेतलेल्या फार्महाऊसची किंमत २० लाख रुपये होती, अशी माहिती इंडिया टुडेच्या बातमीत पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अर्पिता मुखर्जीची किमान तीन बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली, जिथे त्यांना किमान 2 कोटी रुपये सापडले आहेत. मुखर्जींच्या अनेक ‘शेल कंपन्यां’शी संबंधित बँक खातीही ईडी तपासत आहेत. ईडीच्या एका जाणकाराने सांगितले की, मुखर्जी यांची आणखी काही बँक खाती आहेत की नाही हे शोधण्यासाठी ईडी त्यांची चौकशी सुरू ठेवेल. मुखर्जी आणि चॅटर्जी या दोघांची चौकशी सुरू आहे.
पार्थ चटर्जी, ज्यांना त्यांच्या मंत्रिपदाच्या आणि पक्षाच्या कर्तव्यातून काढून टाकण्यात आले आहे. तर अर्पिता मुखर्जी ज्यांच्या दोन फ्लॅटमधून ईडीने दागिने आणि विदेशी चलन व्यतिरिक्त 50 कोटी रुपये जप्त केले आहेत. त्यांना 3 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. बंगालमधील शिक्षण भरती घोटाळाप्रकरणी ईडीने यावर्षी मे महिन्यात चौकशी सुरू केली होती. २२ जुलै रोजी ईडीने पार्थ चॅटर्जीच्या घरासह इतर १४ ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीत ईडीला अर्पिता मुखर्जीच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र मिळाले.
हे वाचलं का?
त्यानंतर ईडीने अर्पिताच्या घरी धाड टाकली. या धाडीत ईडीला 21 कोटी रुपयांची रोकड, सोनं आणि विदेशी चलन सापडले. त्यानंतर ईडीने चॅटर्जी आणि मुखर्जी दोघांना अटक केली होती. या दरम्यान अर्पिताच्या दुसऱ्या घरी पोलिसांनी धाड टाकली असता तिथे देखील पोलिसांना मोठं घबाड सापडलं होतं. 29 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 5 किलोसोनं ईडीने जप्त केले होते. आतापर्यन्त ईडीने 50 कोटींपेक्षा जास्त रक्कम अर्पिताकडून जप्त केली आहे. आता पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांची सयुंक्त संपत्ती असल्याचे देखील समोर आले आहे. अर्पिता मुखर्जीच्या घरी सापडलेली रोकड ही पार्थ चॅटर्जी यांची असल्याची माहिती अर्पिताने चौकशीत दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT