लॉकडाउन लागलेल्या अमरावतीत काय सुरु काय बंद?? जाणून घ्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहिर करण्यात आल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये प्रामुख्याने दुकानांच्या वेळा सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार असून सदरचे निर्बंध हे 1 मार्च 2021 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत राहणार आहेत.

ADVERTISEMENT

अवश्य वाचा – अमरावतीला कोरोनाचा वेढा, जिल्ह्यात ७०९ नवीन रुग्णांची भर

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून येत आहे. अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागांमधील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून या भागाच्या सीमा निश्चित करून या क्षेत्रांमध्ये विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. यात सर्व प्रकारची दुकानं आणि ऑफिस ही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आलेली आहे. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये ही 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. तसेच सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना या एकूण 15 टक्के किंवा कमीत कमी 15 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – ‘पुढील 8 ते 10 दिवस मी वाट पाहणार, नंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार’

याचसोबत सामान्य जनतेला खरेदी व इतर महत्वाच्या कामांसाठीही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. ग्राहकांनी खरेदीसाठी जवळ असलेल्या बाजारपेठा, ओळखीच्या दुकानदारांकडे खरेदी करावी. शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता वधू व वर पक्षासह पंचवीस व्यक्तींना परवानगी राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालय येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, रिझल्ट घोषित करणे इत्यादी कामांकरता परवानगी राहील.

ADVERTISEMENT

जिल्ह्यात मालवाहतुकीवर मात्र कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. मालवाहतूक की नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवासी, तीन चाकीमध्ये चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांसह सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायजेशन करून वाहतुकीसाठी परवानगी राहील.

ADVERTISEMENT

याचसोबत सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी दहा व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात सुरु राणार आहेत. भाजी मंडई सकाळी तीन ते सहा या कालावधीत सुरू राहिल. सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश मिळणार आहे. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. याचसोबत संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. इतकच नव्हे तर संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलनांनाही परवानगी नाकारण्यात आलेली आहे.

येत्या काळात सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठा क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहतील. आठवडाअखेर शनिवारी सायंकाळी पाच ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी दुकाने बंद राहतील. आठवडाअखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी दूध विक्रेते यांची दुकाने ही सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत आठवड्याचे संपूर्ण सात दिवस नियमितपणे सुरू राहतील. सद्यस्थितीमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत जी सूट देण्यात आलेली होती, ती रद्द करून सदरचे निर्बंध एक मार्च 2021 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत घालण्यात येत आहे, याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त यांनी एका पत्राद्वारे दिले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT