राम नवमी स्पेशल: हेलिकॉप्टरमधून करा अयोध्या दर्शन, तिकिटाची किंमत फक्त…
Ram Navami 2023 : रामभक्तांना हेलिकॉप्टरमधून (Helicopter) रामनगरी अयोध्येचे दर्शन घेता येणार आहे. दरम्यान जर तुम्हालाही या अयोध्या नगरीचे दर्शन घ्यायचे असेल तर हेलिकॉप्टरचे तिकीट किती असणार आहे? तसेच या तिकीटाचे बुकींग कसे करता येणार आहे? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Aerial View of Ayodhya : देशभरात आज राम नवमी (Ram Navami) उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त जय श्रीरामच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन निघाला आहे. असे असताना आता राम नवमी निमित्त रामनगरी अयोध्येचे (Ayodhya Darshan) दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता रामभक्तांना हेलिकॉप्टरमधून (Helicopter) रामनगरी अयोध्येचे दर्शन घेता येणार आहे. दरम्यान जर तुम्हालाही या अयोध्या नगरीचे दर्शन घ्यायचे असेल तर हेलिकॉप्टरचे तिकीट किती असणार आहे? तसेच या तिकीटाचे बुकींग कसे करता येणार आहे? हे जाणून घेऊयात.(ram navami 2023 aerial view ayodhya helicopter darshan check ticket booking details)
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशचे राज्य पर्यटन विकास निगम लिमिटेड (UP tourism)आणि हेरिटेज एविएशनद्वारे रामलल्लाच्या भक्तांसाठी ही हेलिकॉप्टर सेवा (Ayodhya Helicopter Darshan) सुरु करण्यात आली आहे.राम नवमीनिमित्त 28 मार्च पासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. 28 मार्चपासून 15 दिवस ही अशीच सेवा सुरु राहणार आहे. त्यामुळे ज्या ज्या भक्तांना अयोध्या नगरीचे हवाई दर्शन घ्यायचेय, ते घेता येणार आहे.
हे ही वाचा : वाह रे पठ्या! सातारच्या वेदांत नांगरेचा अमेरिकेत डंका!
हवाई दर्शनाचे तिकीट किती?
राम नगरी अयोध्येचे हवाई दर्शन (Ayodhya Helicopter Darshan) घेण्यासाठी एका भक्ताचे तिकीट साधारण 3000 रूपये आहे. हेलिकॉप्टरमध्ये एका वेळेस 7 भक्तांनाच दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशच्या टूरीझ्मच्या ऑफिशियल ट्विटर हॅंडलवरून देण्यात आला आहे. तसेच तुमह
हे वाचलं का?
बुकींग कशी करता येणार?
अयोध्येचे हवाई दर्शन (Ayodhya Helicopter Darshan) घेण्यासाठी तुम्हाला शरयू गेस्ट हाऊसच्या काऊंटरवर जाणून तिकीट खरेदी करता येणार आहे. तसेच या हवाई दर्शनाची माहिती तु्म्हाला 9412526465 आणि 7011410216 या क्रमांकावर मिळणार आहे. राम भक्तांना सकाळी 9 वाजल्यापासून सध्याकाळी 6 वाजेपर्यंत या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
हे ही वाचा : राम नवमी सोहळा सुरु असतानाच मोठी दुर्घटना; मंदिराच्या विहिरीतच 25 जण बुडाले
उत्तर प्रदेश पर्यटन विकास निगम लिमिटेड और हेरिटेज एविएशन द्वारा #श्रीराम नवमी 2023 के पवन अवसर पर #अयोध्या धाम के हवाई दर्शन का सुनहरा अवसर ..#AyodhyaDarshan#helicopterride #Ayodhya #RamNavami2023 #ramnavmi #UPTourism #UttarPradesh pic.twitter.com/K2rLzF7raI
— UP Tourism (@uptourismgov) March 28, 2023
ADVERTISEMENT
2024 मध्ये रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होण्यापूर्वी तालिमही घेतली जात आहे. हेरीटेज एविएशन वैष्णो देवी, प्रयांग कुंभ आणि देशाच्या इतर पर्यटन स्थळावर अशी सेवा याआधी देण्यात आली आहे. अशीच सेवा आता अयोध्येत रामभक्तांना मिळतेय. जर भक्तांचा ओघ वाढल्यास हेलिकॉप्टरची देखील संख्या वाढवणार आहोत, अशी माहिती राज्य पर्यटन विकास अधिकारी अक्षय नागर यांनी दिली.
ADVERTISEMENT
अयोध्येत भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) निर्माण कार्य वेगाने सुरू आहे. या मंदिरात कधी एकदा रामाची मुर्तीची स्थापना होतेय याची उत्सुकता रामभक्तांना लागली आहे. तसेच राम मंदिर मुर्ती स्पापनेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. तारीख जाहिर झाल्यानंतर लगेचच मुर्तीची स्थापना होणार आहे. या क्षणाची राम भक्त आतूरतेने वाट पाहात आहे. दरम्यान अद्याप तरी मुर्ती स्थापनेला खुप अवकाश आहे, तिथपर्यंत तुम्हाला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्या नगरीचे दर्शन घेता येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT