Jaykumar Gore : राऊतांनी गंभीर आरोप केले, ज्युनिअर किरीट सोमय्या म्हटलं... जयकुमार गोरेंचं प्रकरण काय?

मुंबई तक

Jaykumar Gore Vs Sanjay Raut : शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग जयकुमार गोरेंनी केला. विनयभंग झालेली महिला पुढच्या काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार असं राऊत म्हणाले होते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Jaykumar Gore : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज खासदार संजय राऊत आणि एका युट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. काल संजय राऊत यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एका महिलेच्या विनयभंग प्रकरणाचा उल्लेख करत संजय राऊत यांनी जयकुमार गोरेंचं नाव घेत सरकारवर निशाणा साधला होता. हे प्रकरण नेमकं काय? समजून घेऊ.

वडेट्टीवार, राऊतांनी काय आरोप केले?

"रोज व्यायाम करणाऱ्या पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, पश्चिम महाराष्ट्रातला मंत्री आहे, दहा दिवस जेलची हवा खातो, दहा हजारांचा दंड भरून महिलेची माफी मागतो आणि आता मंत्री झाल्यावर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करतो. विवस्त्र फोटो पाठवणारा मंत्री जर मंत्रालयात असेल, तर यापेक्षा लज्जास्पद काही नाही. अशा काळे धंदे करणाऱ्यांची यादी वाढत चाललीय" असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते. वडेट्टीवार यांनी जरी नाव घेतलेलं नसलं तरी संजय राऊत यांनी मात्र थेट नाव घेऊन जयकुमार गोरेंवर आरोप केले.

हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. "स्वारगेटला जो प्रकार घडला, तोच प्रकार फडणवीस सरकारचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबतीत समोर येईल. शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग जयकुमार गोरेंनी केला. विनयभंग झालेली महिला पुढच्या काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार अशी माहिती आहे" असं राऊत म्हणाले होते.

जयकुमार गोरे काय म्हणाले?

जयकुमार गोरे यांनी स्वत: आज सभागृहात बोलताना सांगितलं की, 2017 साली जिल्हा न्यायालय साताऱ्यामध्ये दाखल प्रकरणाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप आणि अश्लाघ्य भाषा वापरली. त्यामुळे मला टीकेला तोंड द्यावं लागलं. सदर गुन्ह्यात न्यायालयाने मला निर्दोष सिद्ध केलं असून, पुरावे नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे संजय राऊत यांनी माझा आणि सभागृहाचा हक्कभंग केला असं जयकुमार गोरे म्हणाले.

हे ही वाचा >>Satish Bhosle: वृद्धाला अर्धनग्न करुन बॅटने मारलं, दात पाडले... आमदार सुरेश धसांचा तो 'शागीर्द' कोण?

जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचं म्हटलं आहे. तसंच एका युट्यूब चॅनलने दीड वर्षांपासून माझ्यावर टीका करण्याचं काम केल्याचं म्हटलं आहे. खालच्या पातळीवर जाऊन, माझ्यावर, पक्षावर आणि नेतृत्वावर टीका करण्याचं काम या चॅनलने केलं असं जयकुमार गोरे म्हणाले. 

विधानसभा सभागृहात जयकुमार गोरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. राजकीय वैमनस्यातून सभागृहात उपस्थित असलेल्या लोकांनी हा गुन्हा दाखल केलाय. माझ्या वडिलांचं अस्थीविसर्जन करण्याचीही यांनी वाट पाहिली नाही, त्यापूर्वीच माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आणि सगळं नष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, हे म्हणतात आमच्याकडे पुरावे आहेत, तर तो न्यायालयाचा अवमान आहे असं जयकुमार गोरे म्हणाले.

हे ही वाचा >> Dharashiv Crime : चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीवर 42 वर्षाच्या व्यक्तीने.... राज्यात चाललंय तरी काय?

तर मला फाशी द्या...

माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या नेतृत्वाला संपवण्याचा हा कट आहे. जयकुमार दोषी असेल, तर त्याला फासावर द्या, सोडू नका, पण असा अर्ज देणं, प्लॅन करणं... या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे असं आवाहन जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp