देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना….. शरद पवार यांचा टोला
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आनंदी होते हे वाटलं नाही. हा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा टोला पुण्यात पत्रकारांशी बोलताना लगावलाय. एकनाथ शिंदे यांचं त्यांनी अभिनंदन केलंय तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हा टोला लगावला आहे. काय म्हणाले शरद पवार? (Sharad Pawar) देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ऐनवेळी घेतली. त्याबाबत बोलत असताना […]
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आनंदी होते हे वाटलं नाही. हा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा टोला पुण्यात पत्रकारांशी बोलताना लगावलाय. एकनाथ शिंदे यांचं त्यांनी अभिनंदन केलंय तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हा टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले शरद पवार? (Sharad Pawar)
देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ऐनवेळी घेतली. त्याबाबत बोलत असताना शरद पवार म्हणाले की फडणवीस यांनी क्रमांक दोनची जागा आनंदाने स्वीकारली असं वाटत नाही. त्यांचा चेहरा तसं सांगत होता. मात्र ते नागपूरचे आहेत. एकदा आदेश आला की तो पाळायचा असतो त्यामुळे त्यांना तो पाळावा लागला हेच दिसून आलं.
हे वाचलं का?
खरं तर शिवाजीराव निलंगेकर ते अशोक चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नेते आधी मुख्यमंत्री होते त्यांनी नंतर बाकीची पदंही भुषवली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून निवडलं याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी हे क्रमांक दोनचं पद काहीसं नाराजीने स्वीकारलंय हे दिसतंय. कारण त्यांचा चेहराही तेच सांगत होता. ते ज्या पक्षात आहेत त्यात एकदा आदेश आला की त्यात तडजोड होत नाही हेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीचा प्रयोग फसला का? असं विचारलं असता ते म्हणाले की महाविकास आघाडीचा प्रयोग चांगलाच होता तो फसला नाही. मात्र एकनाथ शिंदे हे जास्त प्रभावी ठरले. ३८ आमदारांना बाहेर घेऊन जाणं, त्यांना इतके दिवस सोबत ठेवणं ही सोपं नाही. पक्ष म्हटला की बंडं होत असतात. कुठलाही मोठा पक्ष लगेच संपला हे असं होतं नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि त्यांनी जे काही काही आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर केले त्यात काही तथ्य नाही हे पण शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांच्यावर हे आरोप केले गेले की त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली या आरोपांकडे कसं बघता? हा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी म्हटलं आहे की ह पोरकटपणाचे आरोप आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT