Shivsena : भावना गवळींचे घटस्फोटित पती कॅप्टन प्रशांत सुर्वे उद्धव ठाकरेंसोबत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उद्धव ठाकरेंना २१ जूनला जो झटका मिळाला त्यात पडझड होतेच आहेत. खासदार भावना गवळी या शिंदे गटात गेल्या आहेत. त्यांच्यासोबत १२ खासदारही गेले आहेत. अशात भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती कॅप्टन प्रशांत सुर्वे शिवसेनेत गेले आहेत. प्रशांत सुर्वे आणि भावना गवळी यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र आता प्रशांत सुर्वे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ADVERTISEMENT

प्रशांत सुर्वे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यावर काय म्हटलंय?

२०१४ मध्येच मी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंना भेटलो होते. पण तेव्हा परिस्थिती तशी नाही असं उद्धव ठाकरेंचं मत होतं. त्यावेळी मला पक्षाकडून काही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

ईडीमुळे चर्चेत आलेल्या भावना गवळी आल्या समोर, शिंदे गटाच्या प्रतोदपदी नियुक्ती

हे वाचलं का?

खासदार भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा २०१३ मध्ये घटस्फोट झाला आहे. भावना गवळी विभक्त झाल्यानंतर प्रशांत सुर्वे यांनी २०१४ मध्ये त्यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती. प्रशांत सुर्वे हे मुळचे वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आता प्रशांत सुर्वे हे शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे भावना गवळीच्या विरोधात त्यांना उभं केलं जाण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर खासदार भावना गवळींनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेने भाजपसोबत जायला हवं ही विनंती केली होती. बहुतांश आमदार हे शिंदे गटात सहभागी होत होते. भावना गवळीही शिंदे गटात जाणार हे स्पष्ट होतं. नंतर तसंच झालंही. आता त्यांचे पूर्वाश्रमीचे पती प्रकाश सुर्वे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ADVERTISEMENT

भावना गवळींचा एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या जवळ असलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची हक्कलपट्टी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत होती. यामध्ये भावना गवळी यांच्या समर्थकांचा देखील समावेश होता. त्यामुळे आतापर्यंत उघड शिंदे यांचं समर्थन न करणाऱ्या भावना गवळी समोर आल्या ते थेट शिंदे यांच्यासोबतच.

ADVERTISEMENT

त्यांच्यासह इतर खासदार देखील शिंदे यांच्यासोबत दिसतायेत. त्यामुळे लोकसभेतील सदस्य गटात देखील उद्धव ठाकरे यांच्यासमोर कायदेशीरपेच निर्माण होऊ शकतो.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. तशी तक्रारकिरीट यांनी ईडीकडे केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीकडून भावना गवळी यांच्या कार्यालयांसह सात ते आठ ठिकाणी छापेमारी केली गेली. यात यवतमाळ येथील भावना गवळी यांचं कार्यालय, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे असलेल्या उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT