डेंग्यू तापाची लक्षणं काय आहेत? उपचार काय? बचाव कसा कराल?

मुंबई तक

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. तरीही इतर आजार डोकं वर काढत आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे दोन आजारही सध्या डोकं वर काढू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच टास्क फोर्सची एक बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दोन आजारांबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. तरीही इतर आजार डोकं वर काढत आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे दोन आजारही सध्या डोकं वर काढू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच टास्क फोर्सची एक बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दोन आजारांबद्दल चिंता व्यक्त केली.

महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये डेंग्यूच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यापर्यंत राज्यात 2169 रूग्ण आढळल्याची नोंद आहे. या वर्षातील ही तिसरी सर्वाधिक क्रमांकाची डेंग्यूची रूग्णसंख्या आहे. 2018 आणि 2019 मध्येही महाराष्ट्रात डेंग्यूचा कहर होता.

डेंग्यू म्हणजे काय?

डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून या तापाची लागण होते. हा एक विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या डासामुळे हा रोग होतो. डेंग्यूलाच बोनब्रेक फिव्हर म्हणजेच हाडांमध्ये शिरणारा तापही म्हटलं जातं. कारण हा ताप आल्यानंतर अनेकांना हाडांच्या वेदनेचा आणि स्नायूंच्या वेदनांचा सामना करावा लागतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp