META Down : व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबूक आणि चॅट जीपीटीही डाऊन, अडचण तुमच्या डेटाची की 'मेटा'ची?
Facebook Meta Outage : भारतात, रात्री 11 च्या सुमारास मेटा प्लॅटफॉर्मबद्दल तक्रारी येण्यास सुरुवात झाली. यूजर्सना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवताना किंवा रिसिव्ह करण्यात अडचणी येत होत्या.
ADVERTISEMENT
Meta Platforms Issue : काल रात्री (11 डिसेंबर) मेटा सर्व्हर डाउन झाल्यामुळे जगभरातील मेसेजिंग प्लॅटफॉर्म ज्यामध्ये व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेडच्या युजर्सला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. भारतात, रात्री 11 च्या सुमारास मेटा प्लॅटफॉर्मबद्दल तक्रारी येण्यास सुरुवात झाली. यूजर्सना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवताना किंवा रिसिव्ह करण्यात अडचणी येत होत्या. याशिवाय, लोकप्रिय चॅटबॉट ChatGPT आणि OpenAI च्या API आणि Sora व्हिडिओ जनरेटर प्लॅटफॉर्मवरील कामांमध्येही अडचणी येत होत्या. तसंच इन्स्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेडवर फीड अपलोड करताना समस्या येत होत्या. मेटाकडे सध्या व्हाट्सॲप व्यतिरिक्त इन्स्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेड हे प्लॅटफॉर्मसही आहेत. ज्यावर सगळीकडे सारख्याच अडचणी येत होत्या. अनेकांना हे लक्षात येत नव्हतं की ही अडचण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस्ची आहे की त्यांच्या इंटरनेटची. मात्र, नंतर ते स्पष्ट झालं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> EPF Money From ATM: 7 कोटी लोकांसाठी मोठी बातमी... आता ATM मधून थेट काढता येणार PF चे पैसे
या चारही लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या युजर्सला तासाभराहून अधिक काळ वेगवेगळ्या अडचणी येत होत्या. पहाटे 2 च्या सुमारास, मेटा आउटेजची समस्या सोडवली गेली आणि सेवा पुर्ववत झाली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मेटा प्लॅटफॉर्म बंद पडल्याबद्दलच्या मीम्सचा पूर आला होता. यावेळी युजर्सनी व्हॉट्सॲप डाऊन, इन्स्टाग्राम डाउन आणि फेसबुक डाउन ट्रेंड करण्यास सुरुवात केली. मेटा डाऊन आणि मार्क झुकरबर्ग हे शब्द ट्रेंडमध्ये होते. मिम्स, व्हिडिओ आणि पोस्टच्या माध्यमातून युजर्स मेटा आणि झुकरबर्गला ट्रोल करत होते.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>'या' मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघातात, ASI चा मृत्यू तर 9 जण जखमी
मेटा ने आपल्या एक्स हँडलवर एक निवेदन प्रसिद्ध केलं. कंपनीला आपल्या सेवांमध्ये जागतिक स्तरावर येत असलेल्या अडचणींची माहिती झाली असून WhatsApp, Facebook आणि Instagram पुन्हा आहे त्या स्थितीत सुरू ठेवण्यासाठी काम करत आहेत. फेसबुक युजर्सना लॉग इन आणि पोस्ट अपलोड करण्यात अडचणी येत होत्या. मेटाच्याच मालकीच्या असलेल्या Instagram ला देखील अशाच अडचणी येत होत्या. ॲप पुन्हा पुन्हा क्रॅश होताना दिसत होता. व्हॉट्सॲप युजर्सना मेसेज पाठवण्यात आणि रिसिव्ह करण्यात उशीर होत होता. Meta ने एक्सवर निवेदन प्रसिद्ध केल्यानंतर काही वेळातच, समस्या सोडवण्यात आली आणि रात्रीच सर्व प्लॅटफॉर्मस् व्यवस्थित सुरू झालेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT