शिक्षिकेचा वर्गात अश्लील डान्स, Video व्हायरल झाला अन्…
शाळेत वर्गात शिकवत असताना एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत अश्लील डान्स केल्याचा व्हीडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यानंतर शाळा प्रशासनाने शिक्षिकेवर मोठी कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
Teacher Viral Video: मुंबई: एका महिलेला डान्स करणं हे फारच महागात पडलं आहे. कारण तिच्या डान्स करण्यामुळेच तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. हे जरासं विचित्र वाटत असलं तरी ब्राझीलच्या सिबेली फरेरासोबत (Cibelly Ferreira) असेच काहीसे घडले आहे. वास्तविक, फरेरा ही इंग्रजी विषयाची शिक्षिका आहे आणि ती एका शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती.. कथितपणे तिने तिच्या विद्यार्थ्यांशी खूपच मैत्रीपूर्ण संभाषणा केलं होतं. पण ते करत असताना तिने काहीसा ‘सेक्सी’ डान्सही केला होता. त्यानंतर त्याचा व्हिडीओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला. पण फरेराची हीच मोठी चूक झाली. सिबेलीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने तिच्यावर तात्काळ कारवाईचा बडगा उगारला आणि तिला लागलीच शाळेतून काढून टाकले. (teacher caught doing obscene dance in class video went viral lost her job)
ADVERTISEMENT
‘विद्यार्थ्यांसोबत केला अश्लील डान्स’
खरं तर, फरेरा यांच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवायचे होते. विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू होते आणि संभाषणात त्यांच्या एका विद्यार्थ्याने त्यांना त्यांच्यासोबत नाचण्यास सांगितले, त्यामुळे तिने विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले. फरेरा यांनी सांगितले की, सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीमध्ये मुलांना वर्गात केंद्रित ठेवणे किती कठीण आहे हे मला माहीत आहे. अशा परिस्थितीत मैत्रीपूर्ण वागून मी त्यांना अभ्यासाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत होते.’ पण शिक्षिकेने केलेला हाच डान्स सोशल मीडियावर लोकांना फारच अश्लील वाटला.
हे वाचलं का?
View this post on Instagram
हे ही वाचा >> Bengaluru Viral Video : केस ओढले, कानाखाली खेचली… सेलमधील साड्यांसाठी भिडल्या महिला
वर्गातील व्हिडीओ शेअर करायची सोशल मीडियावर
फरेरा गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर वर्गातील संवाद आणि पोस्ट-क्लास व्हिडिओ हे शेअर करायची. या सामग्रीसह, तिने टिकटॉकवर 9.7 दशलक्ष फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामवर 1.2 दशलक्ष फॉलोअर्स मिळवले आहेत. तिचा हा कंटेंटही लाखो लोकांना आवडतो. पण शिक्षक म्हणून तिचं हे वागणं काही जणांना अजिबात आवडत नसल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Trending : हनिमूनला झाली 20 वर्ष… पण तेव्हापासून जगभर कपड्यांशिवाय फिरतं ‘हे’ जोडपं
‘मी शाळेपेक्षा सोशल मीडियातून जास्त कमावते’
फरेरा हिने ब्राझीलमधील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ लाव्रासमधून जीवशास्त्रात (Biology) पदवी मिळवली आहे. तसेच गणित विषयात देखील तिने पुरस्कार मिळवला आहे. पण तिचे अनेक फॉलोअर्स हे तिला आता नोकरीऐवजी पूर्णवेळ सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनण्याचे सुचवत आहेत. फरेरा म्हणाले की- शाळा मला एक सुरक्षित आणि स्थिर जागा देते. तथापि, मी सोशल नेटवर्क्सवर यापेक्षा बरेच काही कमावते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT