Vidhan Sabha election : ठाकरेंचा पुण्यावर डोळा! विधानसभेसाठी प्लॅन काय?
Maharashtra Vidhan Sabha election : विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंनी पुण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे.

ADVERTISEMENT
Maharashtra Vidhan Sabha election : विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंनी पुण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे.
Uddhav Thackeray Pune : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांचे पुण्यातील दौरे वाढले आहेत. संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुण्याचा आढावा घेऊन आले. काही दिवसांपूर्वी मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेले वसंत मोरे पुन्हा शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे ठाकरे पुण्यात पक्ष बळकट करण्यावर लक्ष देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पुण्यात 3 ऑगस्ट रोजी मेळावा पार पडला. या मेळाव्यात पुण्यातील विधानसभा जागा कशा वाटून घ्यायच्या याबाबत चर्चा झाली. सुषमा अंधारे यांनी पुण्यातले तीन जागा शिवसेनेला द्याव्यात अशी मागणी केली. पुण्यात जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेन दबावतंत्र सुरू केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचे वाटप कसे होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.