भाजप आरोप करत असलेले सुजीत पाटकर संजय राऊतांचे कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. संजय राऊत यांच्यावर ते विशेषत: हल्ला चढवत आहेत. पण या सगळ्यात मागील काही दिवसांपासून सुजीत पाटकर हे नाव अचानक चर्चेत आलं आहे. जाणून घेऊयात सुजीत पाटकर यांच्याविषयी.

ADVERTISEMENT

सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर त्यांच्या या आरोपाला खुद्द संजय राऊत यांनी उत्तर देताना म्हटलं होतं की, सुजीत पाटकर आणि इतरांची जी नावं घेतली जात आहेत ते माझे फक्त मित्र आहेत आणि मी ते कधीही नाकारत नाही.

या सगळ्यात सुजीत पाटकर यांच्याविषयी भाजपकडून सातत्याने सवाल विचारले जात असताना आता स्वत: सुजीत पाटकर यांनी ‘मुंबई Tak’सोबत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

हे वाचलं का?

पाहा सुजीत पाटकर नेमकं काय म्हणाले:

‘मी संजय राऊत यांना ओळखतो. ते माझ्यासाठी कौटुंबिक मित्राप्रमाणे आहेत. पण मी त्यांच्यासोबत कोणत्याही व्यवसायात भागिदार नाही किंवा आमचे कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत.’

ADVERTISEMENT

‘प्रविण राऊत यांना मी माझ्या पहिल्या पत्नीमुळे ओळखतो. या व्यतिरिक्त माझे आणि प्रविण राऊत यांचे काहीही संबंध नाहीत. तसंच मी कधीही त्यांच्यासाठी कामंही केलेलं नाही.’

ADVERTISEMENT

‘माझ्या घरी ईडीने जी चौकशी केली त्यात त्यांना जे काही अलिबागच्या जमिनीचे पेपर मिळाले तो व्यवहार चौदा वर्षांपूर्वीचा आहे. ते देखील माझी पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे झालेला. ही जमीन घेण्यासाठी मी जे लोन घेतले होते त्याची कागदपत्रं माझ्याकडे आहेत. जे मी आपल्याला कधीही दाखवू शकतो. त्यामुळे माझ्यावर जे काही आरोप केले जात आहेत ते अगदीच निराधार आहेत.’

‘याशिवाय मी Magpie DFS Ltd मध्ये संजय राऊतांच्या मुलींसोबत भागीदार आहे असं जे म्हटलं गेलं आहे ते देखील खोटं आहे. मी एक मी व्यवस्थापन सल्लागार असल्यामुळे फर्ममध्ये अतिरिक्त संचालक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीने आजपर्यंत कोणताही व्यवसाय केला नाही. पण भविष्यात ही कंपनी वाईन, शीतपेये, खाद्यपदार्थ आदींचा व्यवसाय करेल.’

‘सगळ्यात आधी किरीट सोमय्या यांनी माझं नाव योग्यरित्या उच्चारलं पाहिजे. त्यांच्याकडून माझ्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप हे निराधार आणि बोगस आहेत. याशिवाय त्यांनी जे कोव्हिड कराराच्या संदर्भात माझ्यावर आरोप केले आहेत त्याविषयी देखील मला बोलायचं आहे. लाइफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये मी भागीदारांपैकी एक आहे. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत आहे.’

संजय राऊत मित्र परिवाराचा 100 कोटींचा जंबो कोव्हिड सेंटर घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

‘तसंच हे कंत्राट अटीनुसारच देण्यात आलं होतं आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी मनुष्यबळ आणि पॅरा मेडिकल आणि मेडिकल स्टाफचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे मी संजय राऊत यांचा फ्रंटमॅन आहे हा जो काही आरोप लावला जात आहे तो खोटा आणि निराधार आहे.’ असं म्हणत सुजीत पाटकर यांनी सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT