NCP : शरद पवारांना आयोगाने का दिला धक्का? राष्ट्रवादीचा ‘राष्ट्रीय दर्जा’ जाण्यामागची ‘ही’ आहेत कारण
National party is snatched from ncp sharad pawar :निवडणूक आयोगाने सोमवारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेत शरद पवार यांना मोठा धक्का दिला होता.राष्ट्रवादी (NCP), तृणमुल कॉंग्रेस (TMC) आणि कम्युनिस्ट पक्षाकडून (CPI) ‘राष्ट्रीय’ दर्जा काढून घेण्याची कारणे काय आहेत ? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
National party is snatched from ncp sharad pawar : निवडणूक आयोगाने सोमवारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेत शरद पवार यांना मोठा धक्का दिला होता. राष्ट्रवादी सोबत तृणमुल कॉग्रेस आणि कम्युनिस्ट या पक्षाना देखील मोठा धक्का बसला होता. निवडणूक आयोगाने या तीन बड्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला. तसेच आंध्रप्रदेशमधील भारत राष्ट्र समिती (BRS)आणि उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोक दल (RLD)कडून प्रादेशिक पक्षाचा दर्जा काढून घेतला. या आदेशानंतर आता राष्ट्रीय लोक दल (RLD) आता अपरिचित राजकीय पक्ष आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (NCP), तृणमुल कॉंग्रेस (TMC) आणि कम्युनिस्ट पक्षाकडून (CPI) ‘राष्ट्रीय’ दर्जा काढून घेण्याची कारणे काय आहेत ? हे जाणून घेऊयात.(why the status of national party is snatched from ncp sharad pawar )
ADVERTISEMENT
…म्हणून राष्ट्रीय दर्जा गमावला
राष्ट्रवादी, तृणमुल कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला होता.मात्र हे पक्ष निवडणूकीत तितकासा निकाल देऊ शकले नव्हते. त्यामुळे पक्षाकडून हा दर्जा काढून घेण्यात आला आहे. या तिनही पक्षांची मतसंख्या देशभरात 6 टक्क्याहून कमी झाली आहे. तसेच 2 लोकसभा निवडणूका आणि 21 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी पुरेशी संधी देण्यात आली होती. त्यानंतर या पक्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला होता. मात्र निवडणूकांमध्ये या पक्षांना आपल्या कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय दर्जा मिळवता येणार आहे.
हे ही वाचा : Sachin Pilot : पायलटांसाठी वेगळी वाट अवघड, पण काँग्रेस का टाळतेय कारवाई? समजून घ्या 5 मुद्द्यात
या पक्षांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा
नागालँडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि लोक जनशक्ती पार्टी, मेघालयामध्ये तृणमुल कॉंग्रेस आणि व्हॉईस ऑफ द पीपल पार्टी, त्रिपुरामधील टिपरा मोथा यांना मान्यताप्राप्त राज्य राजकीय पक्षांचा दर्जा देण्यात आला आहे.टिपरा मोथा पार्टी, लोक जनशक्ती पार्टी, व्हॉईस ऑफ द पीपल पार्टी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय येथे झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्याचा अलिकडच्या कामगिरीवर राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
हे वाचलं का?
तज्ज्ञांचे म्हणणे काय?
कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला लहान किंवा मोठा पक्ष त्याच्या राष्ट्रीय दर्जाच्या आधारावर पाहिला जात नाही, तर राजकिय पक्षाच्या कामगिरीच्या आधारावर पाहिला जातो.देशातील चार राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला 6 टक्क्यांहून अधिक मते मिळाल्यास तो राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केला जातो. याशिवाय लोकसभेत तीन राज्य एकत्र करून एखाद्या पक्षाने 30 टक्के जागा जिंकल्या तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. तसेच 4 राज्यांमध्ये एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्यास त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो, असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.का.कुरेशी यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : शिंदे यांना हा दावा मान्य आहे? नसेल तर…; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
लालू यादव यांच्या पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावला तेव्हा…
लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा त्यांच्या काळात हिरावला होता.कारण त्यावेळी पक्षाला निवडणूकीत केवळ 5.99 टक्के मते मिळाली होती,जी 6टक्के झाली आहे. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या वकिलांनी नियम सांगितला की राष्ट्रीय पक्ष तेव्हाच स्थापन होऊ शकतो जेव्हा 4 राज्यांमध्ये त्यांचे मत 6टक्के पेक्षा कमी नसेल.
ADVERTISEMENT
प्रत्येक प्रादेशिक पक्षाला राज्याबाहेर विस्तार करायचा आहे. राष्ट्रीय पक्ष असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्टार प्रचारकांची संख्या वाढली की खर्च वैयक्तिक राहत नाही, तर पक्षनिधीत जमा होतो.अशा परीस्थितीत जास्त खर्च केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या अपात्रतेचा धोका नाही. प्रत्येक राजकिय पक्ष नोंदणीकृत होतो,परंतू मान्यता मिळणे ही मोठी गोष्ट आहे आणि ही ओळख निवडणुकीतील कामगिरीवर आधारीत आहे, असे कुरेशी यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रीय दर्जा असण्याचा पक्षाला फायदा काय?
- राष्ट्रीय पक्षाला विशिष्ट निवडणूक चिन्ह दिले जाते. राष्ट्रीय पक्षाचे निवडणूक चिन्ह इतर कोणत्याही पक्षाला वापरता येत नाही
- राज्य आणि राष्ट्रीय पक्षांना नामांकन दाखल करण्यासाठी फक्त एक प्रस्तावक आवश्यक आहे.
- निवडणूक आयोग राज्य आणि राष्ट्रीय पक्षांना मतदार यादीचे दोन संच मोफत दिले जातात. तसेच या पक्षांकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना सार्वत्रिक निवडणूकी दरम्यान मतदार यादीची प्रत मोफत मिळते.
- या पक्षांना त्यांची पक्ष कार्यालये स्थापन करण्यासाठी सरकारकडून जमीन किंवा इमारती मिळतात.
- राज्य आणि राष्ट्रीय पक्ष 40 स्टार प्रचारक घेऊ शकतात. इतर इतर पक्ष निवडणूक प्रचारा दरम्यान 20 स्टार प्रचारक ठेवू शकतात. स्टार प्रचारकांच्या प्रवास खर्चाचा त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समावेश नाही.
- निवडणूकीपुर्वी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर दुरदर्शन आणि रेडिओ प्रसारीत करण्याची परवानगी देणे जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे मुद्दे पोहोचतील.
सध्याचे देशातील राष्ट्रीय पक्ष :
- भारतीय जनता पक्ष (भाजप)
- काँग्रेस (INC)
- बहुजन समाज पक्ष (BSP)
- भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
- नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)
- आम आदमी पक्ष (AAP)
राजकिय पक्षांची विभागणी
देशातील सर्व राजकिय पक्षांची 3 श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पक्ष : निवडणूक आय़ोगाने ज्या पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.त्या पक्षांचा यामध्ये समावेश होतो.
प्रादेशिक पक्ष : निवडणूक आय़ोगाने ज्या पक्षांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिला आहे. त्या पक्षांचा यामध्ये समावेश होतो. देशात 50 हून अधिक प्रादेशिक पक्ष आहेत.
अपरिचित पक्ष : जे पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत, परंतू त्यांना मान्यता मिळालेली नाही. कारण एक तर ते अगदी नवीन आहेत किंवा त्यांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा देण्याइतपत मते मिळालेली नाहीत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT