Madhya Pradesh : ‘या’ ओपिनियन पोलने भाजप-काँग्रेसचं टेन्शन वाढवलं! आकड्यांचा खेळ काय?
एबीपी-सी व्होटर सर्वेमध्ये भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना बहुमत मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान यांना लोकांची सर्वाधिक पसंती या सर्वेत दिली गेली आहे.
ADVERTISEMENT
ABP-C Voter survey 2023 : एका सर्व्हेमुळे भाजप-शिवसेना युतीत कसं बिनसता बिनसता राहिलं, हे आपण गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राने पाहिलं. निवडणुकीची तयारी करण्यासाठी राजकीय पक्षांसाठी सर्व्हे खूप महत्त्वाचे ठरताना दिसत आहे. अशातच एका ओपिनियन पोलचे आकडे समोर आलेत आणि या आकड्यांनी सत्ताधारी भाजपबरोबरच काँग्रेसचंही टेन्शन वाढवलंय. हे आकडे आहेत निवडणुकीचे वेध लागलेल्या मध्य प्रदेशातील! ABP-C Voter ने केलेल्या या ओपिनियन पोलमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार लढत बघायला मिळणार आहे. काय आहे हा सर्व्हे आणि त्याने दोन्ही पक्षाचं टेन्शन का वाढवलंय हेच समजून घेऊयात… (C Voter survey on Madhya pradesh Assembly Elections 2023)
ADVERTISEMENT
कर्नाटकात काँग्रेसने प्रचंड असं बहुमत मिळवत भाजपला जोराचा झटका दिला. सत्ता असलेलं दक्षिणेतील एकमेव राज्य भाजपच्या हातून गेलं. या निवडणूक निकालातून धडा घेत भाजपनं सावध पावलं टाकण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय. पण, अशातच एका नव्या सर्व्हेने भाजपचं टेन्शनमध्ये आणखी भर टाकलीये.
भाजप-काँग्रेस, काय आहे सर्व्हेत?
मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडामुळे सत्ता गमवाव्या लागलेल्या काँग्रेसनेसह भाजपाने जोरदार तयारी सुरू केलीये… आता मध्य प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेत घरवापसी करणार की, काँग्रेस भाजपच्या सत्तेचा रथ रोखणार, हे निकालानंतर दिसेलच, पण एका दोन्ही पक्षांना निवडणुकीपूर्वी इशारा दिल्याचे म्हटलं जात आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> भाजपचं चार घटकांवर लक्ष! PM मोदींनी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा केला सेट
या सर्व्हेतून मध्य प्रदेशातील मतदारांच्या मनात काय चाललंय याचा धांडोळा घेतला गेला आहे. मतदार काँग्रेसच्या बाजूने आहेत की भाजपच्या? अशा प्रश्नांवर आधारित केलेल्या या सर्व्हेत मतदारांनी दिलेला कल तूर्तास भाजपसाठी आव्हानं उभं करणारा म्हटला जातोय. दुसरीकडे काँग्रेसच्या सत्तेतील वापसीचे कल यातून दिसत असले, तरी ते आव्हानात्मक असणार, असंच दिसतंय.
मध्य प्रदेशात कोण किती जागा जिंकू शकतं?
230 सदस्य संख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 116 हा बहुमताचा आकडा आहे. आणि त्यामुळेच भाजप आणि काँग्रेसची चिंता वाढलीये. ते समजून घेण्याआधी कुणाला किती जागा मिळू शकतात, हे बघुयात…
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Pune : तरुणीवर हल्ला! दर्शना पवारचा उल्लेख करत राज ठाकरेंनी कुणाला सुनावलं?
भाजप -106 ते 118
काँग्रेस – 108 ते 120
बसपा – 0 ते 4
इतर -0 ते 4
ADVERTISEMENT
कुणाला किती टक्के मतं मिळणार?
भाजप – 44 टक्के
काँग्रेस – 44 टक्के
बसपा – 2 टक्के
इतर पक्ष – 10 टक्के
काँग्रेससाठी असं बहुमत का ठरू शकतं डोकेदुखी?
ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार भाजप आणि काँग्रेस दोघेही बहुमत मिळवताना दिसत आहे. यात भाजपा जास्त जागा मिळाल्या तर भाजप सत्तेत बसेल. पण, भाजपला कमी जागा मिळाल्या म्हणजे 106 पर्यंत आणि काँग्रेसला बहुमत मिळालं, तरी सरकार स्थापन करून ते पाच वर्ष टिकवणं, ही काँग्रेससमोर प्रमुख डोकेदुखी ठरू शकते.
हेही वाचा >> ‘केसीआर यांच्या डोक्यात किडा घुसलाय’, ठाकरेंचे दोन सवाल अन् इशारा
कारण भूतकाळात डोकावलं, तर 2018 मध्ये काँग्रेसने मध्य प्रदेशात सरकार स्थापन केलं होतं. पण, ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपच्या गळाला लागले आणि काँग्रेसचं मध्य प्रदेशातील सरकार कोसळलं. भाजपवर विरोधकांकडून सातत्याने विरोधकांची राज्यातील सरकारं पाडण्याचा आरोप होत आला आहे. भाजपच्या नेत्यांकडून ऑपरेशन लोटस म्हणून या गोष्टीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला गेल्याचंही दिसलं आणि त्यामुळेच मध्य प्रदेशातील निकाल जर कर्नाटकासारखे लागले, तरच काँग्रेसची चिंता कमी झालेली दिसू शकते.
मुख्यमंत्रिपदी कुणाला सर्वाधिक पसंती?
या सर्व्हेत मुख्यमंत्री म्हणून कुणाला सर्वाधिक पसंती असेल, याबद्दलही कल जाणून घेण्यात आला. यात शिवराज सिंह चौहान यांना पहिली पसंती मिळालीये. 37 टक्के लोकांनी त्यांना पसंती दिलीये. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना 36 टक्के, ज्योतिरादित्य शिंदे यांना 12 टक्के, तर दिग्विजय सिंह यांना 1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT