Ajit Pawar : ईडी क्लिनचीट, अंजली दमानियाचं ट्विट; पवारांनी संपवला सस्पेन्स
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबद्दलच्या दोन बातम्या चर्चेत आल्या. एक होती शिखर बँक म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील आरोपपत्रातून ईडीने नाव वगळल्याची, तर दुसरी होती अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटची.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबद्दलच्या दोन बातम्या चर्चेत आल्या. एक होती शिखर बँक म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील आरोपपत्रातून ईडीने नाव वगळल्याची, तर दुसरी होती अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटची. या दोन्ही बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. लोकांची उत्सुकता वाढणाऱ्या या दोन्ही बातम्यांबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि सस्पेन्स संपवला.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्यात ईडीने क्लिनचीट दिल्याच्या वृत्तावर अजित पवार म्हणाले, “आज आलेल्या त्या बातमीत काहीही तथ्य नाही. चौकशी सुरू आहे. कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाही. कशाच्या आधारे बातमी देण्यात आली माहीत नाही”, असा स्पष्ट खुलासा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.
हेही वाचा >> महाराष्ट्र, सिंहासन अन् शरद पवार… 44 वर्षांपूर्वी काय-काय घडलं होतं?
अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं होतं, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची”, असं त्या म्हणाल्या.
हे वाचलं का?
त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं. “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार”, अशा शब्दात अजित पवार यांनी अंजली दमानिया यांच्या ट्वीटवर भाष्य केले.
अजित पवारांनी नाना पटोलेना सुनावलं
“कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष का अशी वक्तव्य करतात. त्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर निर्माण होवू शकते. पण त्या गोष्टी मीडियापर्यंत जाण्याऐवजी त्यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा माझ्याशी, उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे. यातून मार्ग निघू शकतो ना. टाळी एका बाजूने वाजत नाही ना. अशाप्रकारच्या बातम्या आल्या की महाराष्ट्रात काम करणारा जो कार्यकर्ता आहे (त्या- त्या पक्षाचा) तोही संभ्रमात पडतो. त्यामुळे अशा गोष्टी बंद केल्या पाहिजेत. महाविकास आघाडीची सभा होईल त्यावेळी या गोष्टी मांडणार आहे”, असेही अजित पवार यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
समजून घ्या >> राष्ट्रवादीला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो का?
“काँग्रेसअंतर्गत जो विषय त्यासंदर्भात मी बोलू इच्छित नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ज्यांनी – त्यांनी आपल्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आपापल्या स्तरावर सोडवावे. आम्हाला सुचना करण्याचा अधिकार नाही आणि नाक खुपसायचाही अधिकार नाही. मात्र आघाडी टिकावी असे वाटते”, अशी भूमिका यावेळी अजित पवार यांनी मांडली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT